२०१८ इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१८_इंडियन_प्रीमियर_लीग
Ipl.svg
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी आणि बाद फेऱ्या
यजमान भारत भारत
विजेते चेन्नई सुपर किंग्स
सहभाग
सामने ६०
मालिकावीर सुनिल नारायण (केकेआर)
सर्वात जास्त धावा केन विल्यमसन (एसआरएच)
सर्वात जास्त बळी अँड्रु टाय (केएक्सआयपी)
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
२०१७ (आधी) (नंतर) २०१९

२०१८ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ११ ही इंडियन प्रीमियर लीगचा अकरावा हंगाम आहे. ही क्रिकेट स्पर्धा ७ एप्रिल ते २७ मे दरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेत २०१७ च्या हंगामाप्रमाणे आठ संघ खेळतील. २०१७मधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्सच्या ऐवजी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ खेळतील. रॉयल्स आणि सुपर किंग्स संघांवर २०१६ आणि २०१७ च्या हंगामांत अवैध जुगारात आणि मॅच फिक्सिंगमध्ये भाग घेतल्याबद्दल बंदी घालण्यात आलेली होती. या स्पर्धेचे दूरचित्रवाणीवरून २०१८-२०२३ हंगामाचे प्रसारण करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सने १६३ अब्ज ४७ कोटी ५० लाख रुपये बीसीसीआयला दिले आहेत.

या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव २७ जानेवारी, २०१८ रोजी झाला.

मैदाने[संपादन]

या स्पर्धेतील सामने नऊ मैदानांवर खेळले जातील. प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात व पाहुणा म्हणून उरलेले सात सामने खेळेल. किंग्स XI पंजाब आपल्या घरच्या मैदानावर मोहाली येथे चार आणि इंदूर येथे तीन सामने खेळेल. स्पर्धेचा पहिला आणि अंतिम सामना मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम येथे होईल.[१]

चेन्नई मुंबई मोहाली
एम.ए. चिदंबरम मैदान
प्रेक्षक क्षमता: ३९,०००
वानखेडे स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ३३,१०८
आयपीसीए मैदान
प्रेक्षक क्षमता: २७,०००
MAC Chepauk stadium.jpg Wankhede-1.jpg LightsMohali.png
कोलकाता बंगळूर इंदूर
इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता:६८,०००
एम. चिन्नस्वामी मैदान
प्रेक्षक क्षमता:३८,०००
होळकर क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३०,०००
Eden Gardens.jpg MChinnaswamy-Stadium.jpg
हैदराबाद दिल्ली जयपूर
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ५५,०००
फिरोझ शाह कोटला
प्रेक्षक क्षमता: ४२,०००
सवाई मानसिंग मैदान
प्रेक्षक क्षमता: २५,०००
Uppal stadium.jpg Feroz Shah Kotla - WI vs RSA03.jpg
चिंचवड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षकक्षमता: ४२,०००
Sahara Stadium Pune 4.jpg

परदेशी खेळाडूंची सुची[संपादन]

अफगाणिस्तान
* अफगाणिस्तान रशीद खान
* अफगाणिस्तान मुजीब उर रहमान

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "आयपीएलचे बाद फेरीतील सामने खेळविण्याची पुण्याची मागणी". ईएसपीएन क्रिकइन्फो. 13 February 2018 रोजी पाहिले.