२०२० इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीगचा २०२० | |||
---|---|---|---|
तारीख | १९ सप्टेंबर – १० नोव्हेंबर | ||
व्यवस्थापक | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ | ||
क्रिकेट प्रकार | २०-२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | दुहेरी साखळी आणि बाद फेऱ्या | ||
यजमान | संयुक्त अरब अमीराती | ||
विजेते | (४ वेळा) | ||
सहभाग | ८ | ||
सामने | ६० | ||
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ | ||
|
इंडियन प्रीमियर लीगचा २०२०चा मोसम हा आयपीएल १३ किंवा आयपीएल २०२० म्हणूनही ओळखली जाणारी स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० मध्ये खेळवली गेली. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा तेरावा हंगाम होता. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले.
यजमान आणि कार्यक्रम
[संपादन]सुरुवातीस ही स्पर्धा १५ मार्चपासून सुरू होणार होती परंतु कोव्हिड महामारीमुळे ही १५ एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आली. १४ एप्रिल रोजी भारतातील लॉकडाउन ३ मे पर्यंत लागू झाल्यावर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. २ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा कार्यक्रम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान निश्चित केला गेला. त्याच वेळी या स्पर्धेचे स्थळ भारतातून संयुक्त अरब अमिरातींमध्ये हलविण्यात आले.[१][२][३] १० ऑगस्ट रोजी भारत सरकारने स्पर्धा संयुक्त अरब अमिरातींमध्ये हलविण्यास परवानगी दिली.[४] ६ सप्टेंबर रोजी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.[५]
याआधी ४ ऑगस्ट रोजी विवोने या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक पदावरून माघार घेतली.[६][७] ड्रीम११ या काल्पनिक खेळाचे आयोजन करणाऱ्या कंपनीने २ अब्ज २२ कोटी रुपये बीसीसीआयला देउन विवोची जागा घेतली.[८][९][१०] याचबरोबर अनअकॅडेमी या भारतीय शिक्षणतंत्रज्ञान कंपनीला २०२२ पर्यंत सहकारी करून घेतले गेले.[११]
कोव्हिड-१९चा प्रभाव
[संपादन]जगात पसरलेल्या कोव्हिड-१९च्या साथीमुळे स्पर्धेचा कार्यक्रम आणि स्थळ बदलले गेले. स्पर्धा संयुक्त अरब अमिरातींमध्ये हलविताना २० ऑगस्ट पासून स्पर्धा सुरू करण्याचा बेत केला गेला होता परंतु अमिरातींवरील प्रवासबंधनांमुळे हा पुढे ढकलण्यात आला.[१२] स्पर्धेच्या आधी करण्यात आलेल्या कोव्हिड चाचण्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या अकरा खेळाडूंना लागण झाल्याचे आढळून आले.[१३][१४] स्पर्धा सुरू असताना खेळाडू व संघातील इतर सदस्यांवर २०,००० चाचण्या घेतल्या जातील.[१५][१६] मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेदरम्यान स्मार्ट रिंग नावाचे उपकरण वापरेल. याद्वारे खेळाडूंच्या तब्येतीबद्दलची माहिती गोळा केली जाईल.[१७][१८]
संघ
[संपादन]संघ | मार्गदर्शक | नायक | प्रायोजक |
---|---|---|---|
चेन्नई सुपर किंग्स | स्टीवन फ्लेमिंग | एम.एस. धोणी | मुतूट ग्रुप |
दिल्ली कॅपिटल्स | रिकी पाँटिंग | श्रेयस अय्यर | जेएसडब्ल्यू |
किंग्स XI पंजाब | अनिल कुंबळे | के.एल. राहुल | ईबिक्स कॅश |
कोलकाता नाइट रायडर्स | ब्रेंडन मॅककुलम | दिनेश कार्तिक | एमपीएल |
मुंबई इंडियन्स | माहेला जयवर्दने | रोहित शर्मा | सॅमसंग |
राजस्थान रॉयल्स | अँड्रु मॅकडोनल्ड | स्टीवन स्मिथ | टीव्ही९ भारतवर्ष |
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू | सायमन कटिच | विराट कोहली | मुतूट पप्पचन ग्रुप |
सनरायझर्स हैदराबाद | ट्रेव्हर बेलिस | डेव्हिड वॉर्नर | जे.के. लक्ष्मी सिमेंट |
मैदाने
[संपादन]संयुक्त अरब अमिराती | ||
---|---|---|
दुबई | शारजा | अबु धाबी |
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान | शारजा क्रिकेट मैदान | शेख झायेद क्रिकेट मैदान |
क्षमता: २५,००० | क्षमता: १६,००० | क्षमता: २०,००० |
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map/multi मध्ये 13 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/United Arab Emirates" nor "Template:Location map United Arab Emirates" exists. |
संदर्भ
[संपादन]- ^ "IPL 2020 TO BE PLAYED FROM 19TH SEPTEMBER TO 10TH NOVEMBER 2020". Indian Premier League,BCCI. 2 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Dates confirmed for 2020 Indian Premier League". International Cricket Council. 3 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Indian government gives IPL 2020 the green signal". ESPN Cricinfo. 2 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "IPL 2020: BCCI gets government go-ahead to conduct tournament in UAE". ESPN Cricinfo. 10 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "IPL 2020: Mumbai Indians to begin against Chennai Super Kings". BBC Sport. 6 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "Chinese Firm VIVO Pulls Out As IPL Title Sponsor For This Season Amid Row". NDTV Sports. 4 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "BCCI confirms that Vivo will not sponsor IPL 2020". ESPN. 6 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "BCCI ANNOUNCE DREAM11 AS TITLE SPONSOR FOR IPL 2020". 19 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Dream 11 bags IPL 2020 title sponsorship". Cricbuzz. 18 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Dream11 to be IPL title sponsor for 2020; BCCI rejects their 2021 and 2022 bid". Times of India. 20 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "BCCI ANNOUNCES UNACADEMY AS OFFICIAL PARTNER FOR IPL". Indian Premier League,BCCI. 29 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Still no IPL 2020 schedule as Covid-19 protocols in Abu Dhabi raise concerns". ESPN Cricinfo. 28 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "India player among at least ten CSK squad members to test positive for Covid-19". ESPN Cricinfo. 28 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "IPL 2020 - One more Chennai Super Kings player tests positive for Covid-19". ESPN Cricinfo. 29 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "IPL 2020: BCCI to spend Rs 10 crore on more than 20,000 coronavirus tests". India Today (इंग्रजी भाषेत). 1 September 2020. 1 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "IPL 2020: BCCI Set to Spend Around 10 Crore for 20,000-plus Coronavirus Tests in UAE". news18 (इंग्रजी भाषेत). 1 September 2020. 1 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "IPL 13: Mumbai Indians introduce NBA-style 'smart ring'". times of india (इंग्रजी भाषेत). 5 September 2020. 5 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "IPL 2020: Mumbai Indians Introduce NBA-Style Smart Ring To Track Vital Stats". Sports.NDTV (इंग्रजी भाषेत). 5 September 2020. 5 September 2020 रोजी पाहिले.