सोयराबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


सोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी, छत्रपती राजारामांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. राजाराम हे त्यांचे पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम हे पुढचे छत्रपती व्हावेत अशी त्यांची इच्छा होती . १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही कनिष्ठांच्या मदतीने सोयराबाईंचा दहा वर्षांचा मुलगा राजाराम रिक्त सिंहासनावर आला. तिचे सावत्र पुत्र आणि वारस संभाजी याला सोयराबाईंचा भाऊ आणि सेना प्रमुख हंबीराव मोहिते यांच्या मदतीने गादीवरून काढून टाकण्यास सक्षम होते. संभाजीने सोयाराबाईकडून सत्ता हस्तगत केल्यानंतर, तिने प्रत्येक साधन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अष्टमंडळातील अनुयायांनी ऑगस्ट १६८१ मध्ये संभाजी महाराजांना विषबाधा करण्याचा प्रयत्न केला, पण ते वाचले, आणि मंत्र्यांना व कट कारस्थाने करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्यात आले. शिवरायांचा संशियित खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपून केला गेला. ही बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच अष्टप्रधान मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले. पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य अष्टप्रधान मंत्र्यांचे हातात देणे होईल, अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना सोयराबाईंचे व मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. [ संदर्भ हवा ]

संदर्भ :- श्रीमानयोगी ग्रंथ