संत सोयराबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संत सोयराबाई
संत सोयराबाई

संत सोयराबाई या १४व्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या.

सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले पण केवळ ९२ उपलब्ध आहेत. तिच्या अभंगांमध्ये ती स्वतःला चोखामेळ्याची महारी म्हणते. चोखोबाची बायको असे अभिमानाने म्हणवून घेत असली तरी तिने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य होय. त्या काळी सवर्ण लोक शूद्राच्या सावलीचाही विटाळ मानीत असताना, संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात आणि देवाला विचारतात, देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?,

सोयराबाईंना असा विश्वास होता की "केवळ शरीर अपवित्र किंवा प्रदूषित असू शकते परंतु आत्मा कधीही अशुद्ध नसतो. ज्ञानार्जन हे शुद्धच असते. "

देहासी विटाळ म्हणती सकळ |

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ||

देहीचा विटाळ देहीच जन्मला |

सोवळा तो झाला कवण धर्म ||


 Hindi