Jump to content

"रांगोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५२: ओळ ५२:


=== बंगाल ===
=== बंगाल ===
अलिपना हा एक [[बंगाल]]चा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात आलिपना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे.त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यावरून तिथल्या लोकांच्या चालीरिती,धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास,आणि कलात्मक जीवन यांच्यावर प्रकाश पडतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=l70XAAAAIAAJ&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj6mt3fu5neAhWVdn0KHStQBBg4ChDoAQg3MAI|title=Bhāratīya lokadarśana|last=Pañcolī|first=Badrīprasāda|date=1991|publisher=Arcanā Prakāśana|language=hi}}</ref>लग्न मंडपातील अलिपना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अलिपना रेखाटणे आवश्यक असते.विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. ताराव्रताची अलिपना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे.या अलिपनेत वरच्या बाजूला [[चंद्र]],[[सूर्य]], मध्यभागी सोळा तारका,शिवलिंगे आणि [[पार्वती]] ,ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून [[पृथ्वी]] अशी चित्ररचना असते.माघमंडळ व्रताच्या अलिपनेत विविध रंग वापरतात.भाताची रोपे,धान्य कोठार [[घुबड|,घुबड]],कुंकवाची डबी ,[[नांगर]] ,विळा,सूर्य,मापटे ही चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जाते.[[मासा]] मात्र प्रत्येक अलिपनेत असतो कारण तो समृद्धीचे प्रतीक आहे.<ref>जोशी महादेवशास्त्री ,भारत दर्शन -२ (बंगाल),१९८९</ref>
अलिपना हा एक [[बंगाल]]चा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात आलिपना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे.त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यावरून तिथल्या लोकांच्या चालीरिती,धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास,आणि कलात्मक जीवन यांच्यावर प्रकाश पडतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=l70XAAAAIAAJ&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj6mt3fu5neAhWVdn0KHStQBBg4ChDoAQg3MAI|title=Bhāratīya lokadarśana|last=Pañcolī|first=Badrīprasāda|date=1991|publisher=Arcanā Prakāśana|language=hi}}</ref>लग्न मंडपातील अलिपना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अलिपना रेखाटणे आवश्यक असते.विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. ताराव्रताची अलिपना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे.या अलिपनेत वरच्या बाजूला [[चंद्र]],[[सूर्य]], मध्यभागी सोळा तारका, शिवलिंगे आणि [[पार्वती]], ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून [[पृथ्वी]] अशी चित्ररचना असते. माघमंडळ व्रताच्या अलिपनेत विविध रंग वापरतात. भाताची रोपे, धान्याचे कोठार, [[घुबड|,घुबड]], कुंकवाची डबी, [[नांगर]], विळा, सूर्य, मापटे ही चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जाते. [[मासा]] मात्र प्रत्येक अलिपनेत असतो कारण तो समृद्धीचे प्रतीक आहे.<ref>जोशी महादेवशास्त्री ,भारत दर्शन -२ (बंगाल),१९८९</ref>


=== राजस्थान ===
=== राजस्थान ===
ओळ ५८: ओळ ५८:


=== महाराष्ट्र ===
=== महाराष्ट्र ===
[[महाराष्ट्र]]ातील संस्कृतीचा महत्वाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणे हे सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yKw3AAAAIAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwix-Nmd8KXeAhUXfCsKHbsdBx0Q6AEIYDAI|title=Mahāvidarbhātīla lokagītāñce saṅgīta|last=Coraghaḍe|first=Vimala|date=1987|publisher=Manohara Granthamāla Prakāśana|language=mr}}</ref> अलीकडील काळात युवकही या कलेचे प्रशिक्षण घेताना दिसतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/professional-rangoli-1159485/|शीर्षक=ठिपक्यांच्या घरगुती रांगोळीपासून ‘प्रोफेशनल्स’नी काढलेल्या रांगोळीपर्यंत!|last=भावे|first=दिनकर|date=११. ११. २०१५|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> महाराष्ट्रातील खेडेगावात घराच्या दारात रांगोळी काढण्याअगोदर ती जागा शेणानी सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाची उखडलेली जमीन शेणाने सारवून घेतल्यानंतरही तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे.
[[महाराष्ट्र]]ातील संस्कृतीचा मोलाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणे हे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yKw3AAAAIAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwix-Nmd8KXeAhUXfCsKHbsdBx0Q6AEIYDAI|title=Mahāvidarbhātīla lokagītāñce saṅgīta|last=Coraghaḍe|first=Vimala|date=1987|publisher=Manohara Granthamāla Prakāśana|language=mr}}</ref> अलीकडील काळात युवकही या कलेचे प्रशिक्षण घेताना दिसतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/professional-rangoli-1159485/|शीर्षक=ठिपक्यांच्या घरगुती रांगोळीपासून ‘प्रोफेशनल्स’नी काढलेल्या रांगोळीपर्यंत!|last=भावे|first=दिनकर|date=११. ११. २०१५|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> महाराष्ट्रातील खेडेगावांत घराच्या दारात रांगोळी काढण्याअगोदर ती जागा शेणानी सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाची उखडलेली जमीन शेणाने सारवून घेतल्यानंतरही तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे.
महाराष्ट्रात [[हरितालिका]] ह्या हिंदू स्त्रीयांकडून, तसेच मंगळागौरी, बोडण कोकणस्थ ब्राह्मण स्त्रीयांच्या व्रतातही<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.karmarkarfoundationmumbai.org/karmarkar/html/Kulkatha.html|शीर्षक=चित्पावन ब्राह्मणांची वैशिष्ट्यपूर्ण व्रते|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> महाराष्ट्रात रांगोळी काढली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=MJPOSEmPlIkC&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiAz-WS_KXeAhWQbn0KHU9DBsgQ6AEIWTAH|title=Mahārāshṭra mānasa|date=1988|publisher=Sūcanā va Janasamparka Mahāsañcālanālaya, Mahārāshṭra Śāsana|language=hi}}</ref>
महाराष्ट्रात [[हरितालिका]] ह्या हिंदू स्त्रियांच्या, तसेच मंगळागौरी, बोडण या कोकणस्थ ब्राह्मण स्त्रियांच्या व्रतांतही<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.karmarkarfoundationmumbai.org/karmarkar/html/Kulkatha.html|शीर्षक=चित्पावन ब्राह्मणांची वैशिष्ट्यपूर्ण व्रते|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> रांगोळी काढली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=MJPOSEmPlIkC&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiAz-WS_KXeAhWQbn0KHU9DBsgQ6AEIWTAH|title=Mahārāshṭra mānasa|date=1988|publisher=Sūcanā va Janasamparka Mahāsañcālanālaya, Mahārāshṭra Śāsana|language=hi}}</ref>


[[चित्र:Alpana 5.jpg|thumb|बंगाल येथील अल्पना]]
[[चित्र:Alpana 5.jpg|thumb|बंगाल येथील अल्पना]]
ओळ ७२: ओळ ७२:
=== दक्षिण भारत ===
=== दक्षिण भारत ===
[[चित्र:Onam flower decoration.jpg|thumb|ओणमची पुष्प रांगोळी]]
[[चित्र:Onam flower decoration.jpg|thumb|ओणमची पुष्प रांगोळी]]
[[दक्षिण भारत]]ात पुककलम या नावाने रांगोळी ओळखली जाते. [[फुले]], पाने, पाकळ्या सहा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ती काढली जाते. या प्रांतात महिला आणि मुले दररोज घरापुढे अशी रांगोळी काढतात. कोलम या दाक्षिणात्य प्रकारात तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ZR-yDQAAQBAJ&pg=PA90&dq=rangoli+in+various+religions&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMyfzcka3eAhVJqo8KHVBNAZMQ6AEIODAD#v=onepage&q=rangoli%20in%20various%20religions&f=false|title=Eva and Shiva: Scientific exploration of basic concepts in Indian culture and spirituality|last=Borkar|first=Gaurish|date=2016-10-17|publisher=P & J Publications|language=en}}</ref>
[[दक्षिण भारत]]ात पुककलम या नावाने रांगोळी ओळखली जाते. [[फुले]], पाने, पाकळ्या सहा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ती काढली जाते. या प्रांतात महिला आणि मुले दररोज घरापुढे अशी रांगोळी काढतात. कोलम या दाक्षिणात्य प्रकारात तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ZR-yDQAAQBAJ&pg=PA90&dq=rangoli+in+various+religions&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMyfzcka3eAhVJqo8KHVBNAZMQ6AEIODAD#v=onepage&q=rangoli%20in%20various%20religions&f=false|title=Eva and Shiva: Scientific exploration of basic concepts in Indian culture and spirituality|last=Borkar|first=Gaurish|date=2016-10-17|publisher=P & J Publications|language=en}}</ref>


== संत साहित्यामध्ये ==
== संत साहित्यामध्ये ==
* इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक '''रंगमाळीका''' भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मतानुसार यातील '"'रंगमाळीका''" हा उल्लेख रांगोळी बद्दल असू शकतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.loksatta.com/daily/20070319/raj05.htm|शीर्षक=loksatta.com|संकेतस्थळ=www.loksatta.com|अॅक्सेसदिनांक=2018-10-31}}</ref>''
* इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक '''रंगमाळीका''' भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मतानुसार यातील '"'रंगमाळीका''" हा उल्लेख रांगोळी बद्दल असू शकतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.loksatta.com/daily/20070319/raj05.htm|शीर्षक=loksatta.com|संकेतस्थळ=www.loksatta.com|अॅक्सेसदिनांक=2018-10-31}}</ref>''
* [[संत जनाबाई]] यांच्या 'विठोबा चला मंदिरांत' या अभंगात ' ''रांगोळी घातली गुलालाची'' ', असा उल्लेख येतो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.transliteral.org/pages/z71227205910/view|शीर्षक=संत जनाबाई - विठोबा चला मंदिरांत । गस्...|work=TransLiteral Foundation|access-date=2018-10-31}}</ref>
* [[संत जनाबाई]] यांच्या 'विठोबा चला मंदिरांत' या अभंगात ' ''रांगोळी घातली गुलालाची'' ', असा उल्लेख येतो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.transliteral.org/pages/z71227205910/view|शीर्षक=संत जनाबाई - विठोबा चला मंदिरांत । गस्...|work=TransLiteral Foundation|access-date=2018-10-31}}</ref>
* [[संत एकनाथ]]ांच्या गाथेत अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे पुढीलप्रमाणे वर्णन येते.

* [[संत एकनाथ]]ांच्या गाथेत पुढील प्रमाणे आंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे वर्णन येते.
<poem>
<poem>
रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।
रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।<br />
रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥
रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥<br />
-संत एकनाथ गाथा<ref>http://www.transliteral.org/pages/z100202034319/view</ref>
-संत एकनाथ गाथा<ref>http://www.transliteral.org/pages/z100202034319/view</ref>
</poem>
</poem>


* कवि [[केशवसूत]] ([[कृष्णाजी केशव दामले]]- इ.स. १८८६ ते इस १९०५) यांनी त्यांच्या [[:s::रांगोळी घालतांना पाहून|रांगोळी घालतांना पाहून]](विकिस्रोतप्रकल्प दुवा) या कवितेत, मंगल प्रहरी रांगोळी घालणाऱ्या स्त्रीयांचे भावपूर्ण वर्णन केले आहे.
* कवि [[केशवसुत]] ([[कृष्णाजी केशव दामले]]- इ.स. १८८६ ते इस १९०५) यांनी त्यांच्या [[:s::रांगोळी घालतांना पाहून|रांगोळी घालतांना पाहून]](विकिस्रोतप्रकल्प दुवा) या कवितेत, मंगल प्रहरी रांगोळी घालणाऱ्या स्त्रियांचे भावपूर्ण वर्णन केले आहे.
<poem>
<poem>
होते अंगण गोमयें सकलही संमार्जिले सुंदर
होते अंगण गोमयें सकलही संमार्जिले सुंदर<br />
बालाके आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर
बालाके आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर


तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;<br />
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.


आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,<br />
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;<br />
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,<br />
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.<br />
....उर्वरीत कविता वाचन दुवा: [[:s::रांगोळी घालतांना पाहून|रांगोळी घालतांना पाहून]] (विकिस्रोत बंधूप्रकल्प दुवा)
....उर्वरित कविता वाचन दुवा: [[:s::रांगोळी घालतांना पाहून|रांगोळी घालतांना पाहून]] (विकिस्रोत बंधुप्रकल्प दुवा)


</poem>
</poem>
ओळ १११: ओळ ११०:


* स्पर्धा- दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.patrika.com/narsinghpur-news/113-participants-displayed-talent-in-rangoli-and-rosemary-competition-3642389/|शीर्षक=रंगोली और मेंहदी स्पर्धा में ११३ प्रतिभागियों ने दिखाई प्रतिभा|work=www.patrika.com|access-date=2018-10-31|language=hi-IN}}</ref>
* स्पर्धा- दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.patrika.com/narsinghpur-news/113-participants-displayed-talent-in-rangoli-and-rosemary-competition-3642389/|शीर्षक=रंगोली और मेंहदी स्पर्धा में ११३ प्रतिभागियों ने दिखाई प्रतिभा|work=www.patrika.com|access-date=2018-10-31|language=hi-IN}}</ref>

* पुण्यांतील हौदांच्या पाण्यावर रांगोळ्या काढणारे अनेक कलावंत आहेत. दिवाळीमध्ये तिकीट काढून लोक या रांगोळया बघायला येतात.


== चित्रदालन ==
== चित्रदालन ==

२०:३४, ७ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

Rangoli (es); Rangoli (eu); rangoli (ca); रङ्गोली (mai); 蓝果丽 (zh); رنگولی (pnb); ランゴーリー (ja); רנגולי (he); 藍果麗 (zh-hant); रंगोली (hi); ముగ్గు (te); ਰੰਗੋਲੀ (pa); Ռանկոլի (hyw); நிறக்கோலம் (ta); रंगोली (bho); আলপনা (bn); Rangoli (fr); रांगोळी (mr); ମୁରୁଜ (or); rangoli (sl); Indiske bakketeikningar (nn); रंगोली (ne); Ранголі (uk); Rangoli (id); Rangoli (pl); രംഗോളി (ml); Rangoli (nl); Ранголи (ru); 藍果麗 (zh-hk); ರಂಗವಲ್ಲಿ (kn); আল্পনা (as); Rangoli (en); رانغولي (ar); 蓝果丽 (zh-hans); رنگولی (ur) tradicionalna umetnostna oblika Indije, pri kateri se na tleh ustvarjajo barvni vzorci z uporabo prahov (sl); برصغیر کا ایک روایتی ہندو فن (ur); motifs géométriques faits par des femmes à partir de poudres de pigments de couleur en Inde (fr); भारतातील एक कला आणि संस्कृती (mr); ఇంటి వాకిట్లో నేలపై ముగ్గుపిండితో వేసే అలంకరణ విశేషం (te); traditional art form of India, in which coloured patterns are created on the ground (en); লেপন করে করা কারুকার্য (bn); भारत के परंपरागत कला जेह में फर्श पर रंग से पैटर्न बनावल जाला (bho); भारत में रंग कला का स्वरूप (hi) రంగవల్లులు, రంగవల్లి, ముగ్గులు (te); अल्पना (hi); raṃgolī, ramgoli (fr); Rangoli (or); ramgoli (en); আল্পনা, আলিপনা (bn); रंगावली (mr); ரங்கோலி (ta)
रांगोळी 
भारतातील एक कला आणि संस्कृती
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारकला
वापर
  • beautification
संस्थापक
धर्म
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
विकिपीडियाचे बोधचिन्ह असलेली रांगोळी

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.[] भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.[]

हेतू

दिवाळीच्या प्रसंगी गोवा येथे काढलेली रांगोळी

संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून व रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. रांगोळी ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते.[][] प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीयांच्याजवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात.[] गोपद्मव्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढणे अशासारखे आचारही परंंपरेने केले जातात.[] सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पहायला मिळते. शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात. हिंदू धर्माप्रमाणेच पारशी धर्मातही रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली गेली आहे.[ संदर्भ हवा ]

प्राचीनत्व

रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्स्यायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश केला आहे. [] इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत.सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फ़ुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत.वरांग चरित या ग्रंथात (सातवे शतक) पंचरंगी चूर्णे, धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख आहेत. .नलचम्पू ग्रंथात (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत.[]गद्यचिंतामणी ,देशीनाममाला,मानसोल्लास या ग्रंथातही रांगोळीचे संदर्भ सापडतात.[] गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे.जमिनीवर केलेले सुशोभन हा जगातील विविध संस्कृतींमध्ये आधुनिक येणारा कलाप्रकार आहे. आफ्रिका, प्राचीन अमेरिका, क्यूबा,तिबेट येथील वांशिक जनजाती अशा प्रकारच्या चित्ररचना जमिनीवर करीत असत. प्रजननासाठी तसेच सुप्त शक्तीना प्रसन्न करणे अशा विविध हेतूंनी या जनजाती अशा आकृती रेखाटत असत.[] भारतातही वांशिक जनजातींनी ही पद्धती आत्मसात केली असावी असे मानले जाते. मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धुलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.[][]

रांगोळीतील प्रतीके

सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत.रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो.रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था आणि त्रिकाळ यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्त्वाचे प्रतीक अाहे असे मानले जाते. शंख,स्वस्तिक,चंद्र,सूर्य ही आणखी प्रतीके होत.साखळी ही नागयुग्माचे,अष्टदल हे अष्टदिशातत्मक विश्वाचे, कमल हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्त्व आहे.याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यांत काढल्या जातात. प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते.[] रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशीही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते.[१०] साधारणत: रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पावले, सूर्य देवेतेचे प्रतीक, श्री, कासव इत्यादी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.[११] चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे.यात झुल्यात बसलेली देवी, राधाकृष्ण, चंद्र, सूर्य, गणपती, गोपद्म, गणपती, सरस्वतीचे रेखांकन, अशी विविध प्रतीके काढली जातात.[११]

प्रकार

आधुनिक व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी

रांगोळीचे आकृतीप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृतीप्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो तर वल्लरीप्रधान मध्ये वेळी, पाने, फुले यांचे आकार असतात.ठिपक्यांची रांगोळी हा आणखी एक प्रकार.प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देतात व ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यातून मोर,कासव,कमळ,वेल इ.आकृती निर्माण करतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयकही रांगोळ्या काढल्या जातात. मुक्त हस्त चित्रात्मक रांगोळी असा कलाप्रकारही विकसित झालेला दिसून येतो.[१२]

साहित्य

रांगोळीचे रंग

रांगोळीसाठी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलाल,रंग यांचाही वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तवंग देऊन त्यावर वरील साहित्य वापरूनही रांगोळी काढली जाते.सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवली असेल तर त्यावर बाजारात मिळणाऱ्या साधनांच्या सहायाने रांगोळी काढली जाते. बाजारात अनेक प्रकाराचे छाप उपलब्ध आहेत.तसेच रांगोळी काढण्यासाठी विविध साधने, जाळीच्या रांगोळ्या, लेखणीसदृश साधन अशी साधने उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून रांगोळी काढण्याची पद्धती नव्याने विकसित होताना अनुभवाला येते.

रांगोळी भुकटी तयार करण्याची पद्धत

डोलोमाइट नावाचा एक प्रकारचा दगड प्रथम भट्टीत भाजून, बारीक कुटून मग वस्त्रगाळ करून वा चाळून काढतात.रांगोळीच्या दगडाला शिरगोळे असे म्हणतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे शिरगोळे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार केला जातो.[१३] पांढऱ्या रांगोळीला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन रंगीत रांगोळी तयार करतात. संगमरवराच्या कारखान्यात ते कापत असताना जी भुकटी तयार होते, ती पण रांगोळी म्हणून आजकाल वापरतात.[ संदर्भ हवा ]

प्रांतानुसार रांगोळीची नावे आणि परंपरा

बंगाल

अलिपना हा एक बंगालचा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात आलिपना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे.त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यावरून तिथल्या लोकांच्या चालीरिती,धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास,आणि कलात्मक जीवन यांच्यावर प्रकाश पडतो.[१५]लग्न मंडपातील अलिपना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अलिपना रेखाटणे आवश्यक असते.विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. ताराव्रताची अलिपना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे.या अलिपनेत वरच्या बाजूला चंद्र,सूर्य, मध्यभागी सोळा तारका, शिवलिंगे आणि पार्वती, ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून पृथ्वी अशी चित्ररचना असते. माघमंडळ व्रताच्या अलिपनेत विविध रंग वापरतात. भाताची रोपे, धान्याचे कोठार, ,घुबड, कुंकवाची डबी, नांगर, विळा, सूर्य, मापटे ही चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जाते. मासा मात्र प्रत्येक अलिपनेत असतो कारण तो समृद्धीचे प्रतीक आहे.[१६]

राजस्थान

राजस्थानातील रांगोळीचा प्रकार हा भिंतीवरही रेखाटला जातो. साध्या सोप्या रचना हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे[१७].

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील संस्कृतीचा मोलाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणे हे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.[१८] अलीकडील काळात युवकही या कलेचे प्रशिक्षण घेताना दिसतात.[१९] महाराष्ट्रातील खेडेगावांत घराच्या दारात रांगोळी काढण्याअगोदर ती जागा शेणानी सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाची उखडलेली जमीन शेणाने सारवून घेतल्यानंतरही तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे. महाराष्ट्रात हरितालिका ह्या हिंदू स्त्रियांच्या, तसेच मंगळागौरी, बोडण या कोकणस्थ ब्राह्मण स्त्रियांच्या व्रतांतही[२०] रांगोळी काढली जाते.[२१]

बंगाल येथील अल्पना

ओडिशा

ओडिशा प्रांतात तीन प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध आहेत.[२२]

१.गोलाकार अल्पना
२.रांगोळी पद्धतीची अल्पना
३.गुदना

दक्षिण भारत

ओणमची पुष्प रांगोळी

दक्षिण भारतात पुककलम या नावाने रांगोळी ओळखली जाते. फुले, पाने, पाकळ्या सहा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ती काढली जाते. या प्रांतात महिला आणि मुले दररोज घरापुढे अशी रांगोळी काढतात. कोलम या दाक्षिणात्य प्रकारात तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जाते.[२३]

संत साहित्यामध्ये

  • इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मतानुसार यातील '"'रंगमाळीका" हा उल्लेख रांगोळी बद्दल असू शकतो.[२४]
  • संत जनाबाई यांच्या 'विठोबा चला मंदिरांत' या अभंगात ' रांगोळी घातली गुलालाची ', असा उल्लेख येतो.[२५]
  • संत एकनाथांच्या गाथेत अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे पुढीलप्रमाणे वर्णन येते.

रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।

रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥

-संत एकनाथ गाथा[२६]

होते अंगण गोमयें सकलही संमार्जिले सुंदर

बालाके आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर

तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,

मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;

पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,

देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

....उर्वरित कविता वाचन दुवा: रांगोळी घालतांना पाहून (विकिस्रोत बंधुप्रकल्प दुवा)

व्यावसायिक स्वरूप

भारतात महिला- पुरुष रांगोळी कलाप्रकाराद्वारे व्यवसाय करतात. हे कलाकार स्वतंत्रपणे किंवा मंगल कार्यालय, इ.च्या माध्यमातून रांगोळी काढून अर्थार्जन करतात. [ संदर्भ हवा ]

गेल्या दशकात पुण्यातील कलावंत भारती माटे यांनी आधुनिक म्यूरल स्वरूपात रांगोळीची रचना केली हा कलाप्रकार महाराष्ट्रात प्रसिद्धी पावला आहे.[२७]

परिषदा, प्रदर्शने, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नियोजित कार्यक्रम , मिरवणूक अशा विविध सामाजिक स्तरावरील कार्यक्रमासाठी सुशोभन म्हणून रांगोळी काढली जाते.[२८]

  • सेवा- याखेरीज देवदेवतांच्या पालखी, उत्सव अशा प्रसंगी सेवाभावाने रांगोळी काढणारे कलाकारही पहायला मिळतात.[२९]
  • स्पर्धा- दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते.[३०]
  • पुण्यांतील हौदांच्या पाण्यावर रांगोळ्या काढणारे अनेक कलावंत आहेत. दिवाळीमध्ये तिकीट काढून लोक या रांगोळया बघायला येतात.

चित्रदालन

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ व नोंदी

  1. ^ Babar, Sarojini Krishnarao (1972). Nandādīpa. Maharashtra Lokasāhitya..
  2. ^ Dutta, Swaroop. "The Mystery of Indian Floor Paintings". The Chitrolekha Journal on Art and Designs. E-ISSN 2456-978X I DOI: 10.21659/cjad I Included in Art Full Text (H.W. Wilson), EBSCO.
  3. ^ a b c जोशी , होडारकर, महादेवशास्त्री, पदमजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड सातवा. भारतीय संस्कृति कोश मंडळ प्रकाशन.
  4. ^ Pappala, Appalanaidu. Religion, Beliefs and Customs (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 978-1-329-29282-6.
  5. ^ Khānolakara, Cintāmaṇi Tryambaka (1973). Vārā vāje ruṇajhuṇā. Ameya Prakāśana.
  6. ^ a b c Bhāratīya sãskrṭikośa: Sampādaka Mahādevaśāstrī Jośī. Sahasampādaka Padmajā Hodạ̄rakara,[Prathamāvrṭti]. Bhāratīya S̃āskr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
  7. ^ a b c (PDF) http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/4605/7/07_chapter%201.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ Agravāla, Bhānu (1991). Bhāratīya citrakalā ke mūla srota: Saṃskr̥ta sāhitya ke ullekhoṃ para ādhārita (हिंदी भाषेत). Alagāridam Pablikeśansa.
  9. ^ बोराटे, सुधीर. मराठी विश्वकोश (खंड १४) - रांगोळी (मराठी भाषा भाषेत). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ Samui, Mahuya (2017-09-26). WOW RANGOLI (इंग्रजी भाषेत). BookRix. ISBN 978-3-7438-3374-6.
  11. ^ a b Vāgha, Nirmalā Ha (1991). Amola ṭhevā, Hindū saṇa va sãskāra. Morayā Prakāśana.
  12. ^ . १९. १०. २०१८ https://www.loksatta.com/vastu-lekh-news/article-about-rangoli-1774493/. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ Yangalwar, Pro Vijay (2013-12-21). Nagpur Darshan / Nachiket Prakashan: नागपूर दर्शन. Nachiket Prakashan.
  14. ^ Sharma, Hari Shanker; Sharma, Mohan Lal (1992). Geographical Facets of Rajasthan (इंग्रजी भाषेत). Kuldeep Publications. pp. २५२.
  15. ^ Pañcolī, Badrīprasāda (1991). Bhāratīya lokadarśana (हिंदी भाषेत). Arcanā Prakāśana.
  16. ^ जोशी महादेवशास्त्री ,भारत दर्शन -२ (बंगाल),१९८९
  17. ^ India Today (इंग्रजी भाषेत). Thomson Living Media India Limited. 2004.
  18. ^ Coraghaḍe, Vimala (1987). Mahāvidarbhātīla lokagītāñce saṅgīta. Manohara Granthamāla Prakāśana.
  19. ^ भावे, दिनकर (११. ११. २०१५). https://www.loksatta.com/pune-news/professional-rangoli-1159485/. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ http://www.karmarkarfoundationmumbai.org/karmarkar/html/Kulkatha.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ Mahārāshṭra mānasa (हिंदी भाषेत). Sūcanā va Janasamparka Mahāsañcālanālaya, Mahārāshṭra Śāsana. 1988.
  22. ^ Utkala darśana (हिंदी भाषेत). Sāhitya Saṅgama. 1973.
  23. ^ Borkar, Gaurish (2016-10-17). Eva and Shiva: Scientific exploration of basic concepts in Indian culture and spirituality (इंग्रजी भाषेत). P & J Publications.
  24. ^ www.loksatta.com http://www.loksatta.com/daily/20070319/raj05.htm. 2018-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ TransLiteral Foundation http://www.transliteral.org/pages/z71227205910/view. 2018-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  26. ^ http://www.transliteral.org/pages/z100202034319/view
  27. ^ bharatimate.com (इंग्रजी भाषेत) http://bharatimate.com/about-bharatis-rangavali/. 2018-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ Bureau, Odisha Sun Times. odishasuntimes.com (इंग्रजी भाषेत) https://odishasuntimes.com/these-flower-rangolis-at-an-exhibition-in-odisha-capital-will-make-you-drool-over-the-vibrant-designs/. 2018-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  29. ^ Loksatta. 2017-06-18 https://www.loksatta.com/vari-news/rangoli-on-the-way-of-vari-palkhi-sohla-samarth-rangawali-group-1495360/. 2018-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  30. ^ www.patrika.com (हिंदी भाषेत) https://www.patrika.com/narsinghpur-news/113-participants-displayed-talent-in-rangoli-and-rosemary-competition-3642389/. 2018-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)