वात्स्यायन
Appearance
वात्सायन हा गुप्त काळातील भारतीय तत्त्वज्ञ व संस्कृत तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ गुप्त साम्राज्याच्या काळात इ.स. ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला कामसूत्र नावाचा ग्रंथ आणि अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला न्यायसूत्रभाष्य नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात. दि.बा. मोकाशी यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- "वात्सायनाच्या साहित्यकृती (फ्रेंच व इंग्रजी भाषांतील अनुवाद)" (इंग्रजी and फ्रेंच भाषेत).