गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गाय
गाय
गाय
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पॄष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: आर्टिओडॅक्टिला
कुळ: बोविडी
जातकुळी: बोस
जीव: बो. टॉरस
शास्त्रीय नाव
बोस टॉरस
लिन्नॉस, १७५८

गाय ही एक सस्तन प्राणी आहे.

गायीच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरस असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.

भारतीय गाय[संपादन]

भारतीय वंशाच्या गायी ह्या बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणी, साहिवाल, गीर, गौळाउ, देवणी, खिल्लारी, डांगी, गावठी इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.

भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनु इत्यादी नावे आहेत.

धार्मिक महत्त्व[संपादन]

हिंदू, जैन, पारशी इ. धर्मात गाईला पवित्र मानतात. तसेच प्राचीन इजिप्त, रोम, ग्रीस, पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गाईला विशेष स्थान होते.

हिंदू धर्म[संपादन]

हिंदु धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.

हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः| प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||

यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.

हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो..

अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय सार्‍या संपत्तीचे भांडार आहे.औषधी महत्त्व[संपादन]

गाईचे दूध व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधिगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे..

गाईच्या दुधात २१ प्रकारची ॲमिनो ‌‍‍ॲसिडे, ११ प्रकारचे फॅटी ॲसिडे, ६ प्रकारची व्हिटॅमिन, २५ प्रकारचे धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकाराचे फॉस्फरस व ११ प्रकारचे नायट्रोजन तत्त्व आढळून येते. (तत्त्व म्हणजे काय?)


गोहत्या बंदी[संपादन]

हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.

कारण गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे. गाईचे गोमूत्र, शेण,दूध,तूप,दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे. गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते. मात्र तिची हत्या मात्र फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.

सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघलकापासून ते मोगल बादशाह शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन शहा, हैदरअली, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.

हे ही पहा[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.