चर्चा:रांगोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .लेख विकी मानकानुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.आर्या जोशी (चर्चा)

लेख छान झाला आहे. अजून थोडेसे काम केल्यास मुखपृष्ठ सदरासाठीही नामांकीत करता येऊ शकेल असे वाटते. मी सुद्धा जरासे काम यावर नक्कीच करेन.
सोबतच पंगती, नैवेद्य ताट, पुजा भोवती रेखाटलेल्या रांगोळीची छायाचित्रे सुद्धा काळाच्या ओघात उपलब्ध करता आल्यास पहावे अशी विनंती आहे कारण रांगोळी, समया सहीतच्या पारंपारीक पंगतीचे छायाचीत्र बहुधा आंतरजालावरही उपलब्ध नसावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३९, २६ सप्टेंबर २०१७ (IST)

लेखाचे काही पैलु १[संपादन]

या लेखाच्या निमीत्ताने काही पैलूंकडे लक्ष वेधायचे आहे.

ज्ञानकोशीय लेखन साक्षेपी म्हणजे टिकात्मक समिक्षणांची दखल घेणारे असावे लागते. अर्थात सर्वच विषयांबद्दल पुरेसे समिक्षात्मक लेखन झालेले असते नाही आणि मग समिक्षा पोकळी जाणवते. समिक्षापोकळी जाणवणाऱ्या स्थितींकडे पुढे चालून लक्ष वेधायचे आहे पण त्यापुर्वी रांगोळी या विषयावर योगायोगाने किमान स्वरुपाची दखल अभ्यासकांनी घेतली आणि आपल्याला त्याची नोंद रांगोळी लेखात घेता आल्यामुळे लेख साक्षेपी होण्यास मदत झाली आहे.

आता पहिल्या परिच्छेदातील एक वाक्य पाहू " भारतीय संस्कृती कोशानुसार रांगोळी काढणे ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधाने झाला आहे. " यातील अनुबंध शब्दाला लावलेला हा प्रत्यय दोन गोष्टी सुचीत करतो, १) आग्रही भूमिकेची मांडणी, एखाद्या अभ्यासकाची भूमिकेची मांडणी आग्रही असेल तर त्यामागे काही कार्यकारण भाव असावयास हवा आणि तो त्या लेखकाने भारतीय संस्कृती कोशात किंवा इतरत्र कुठे मांडला असेल तर त्या कार्यकारण भावाची दखल ज्ञानकोशीय लेखातील नंतरच्या विभागातून घेतली जावयास हवी जी अद्यापतरी नाही आहे. (क्वचित नुसतीच आग्रही भूमिका मांडली पण कार्यकारण भाव मांडला नाही असे होऊ शकते. पण त्याला पर्याय नाही पण असेल तर दखल घ्यावयास हवी) २) दुसरे या प्रत्ययाने कुठेतरी कुणीतरी शंका व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यास हे आग्रही उत्तर आहे हे सुचीत होते , मग ही शंका नेमकी काय होती ? ज्ञानकोशीय लेख हा एकांगी होऊ नये म्हणून शंकेचाही उहापोह होणे श्रेयस्कर असावे.

योगायोगाने डॉ. नयना तडवळकर आणि माधुरी बापटांचा भारतीय रांगोळी ग्रंथाची नोंद घेता आली आहे. त्यांच्या ग्रंथात रांगोळी समकक्ष जगाच्या पाठीवरच्या इतरत्रच्या कला तसेच केवळ सांस्कृतीक म्हणून विकासाची शक्यताही लक्षात घेतली आहे. रांगोळी कलेचा विकास केवळ सांस्कृतीक, मुख्यत्वे सांस्कृतीक आहे व ध्रार्मिकतेची पुस्ती आहे, अंशत: सांस्कृतिक मुख्यत्वे धार्मिक आहे, किंवा मुलत: धार्मिक आहे पण धार्मिक बाजू विस्मृतीत जाऊन केवळ सांस्कृतीक रुप उरले आहे अशा वेगवेगळ्या भूमिकांचा विचार मानववंशशास्त्र म्हणजे ॲंथ्रॉपॉलॉजीच्या अंगाने होईल. विकिपीडियात लिहिताना आपल्याला स्वत:ला एखादी भूमिका व्यक्तिश: अधिक पटणारी असेल असेही होऊ शकते. पण ज्ञानकोशीय लेखकाच्या भूमिकेतून आपण अभ्यासकांप्रमाणेच तटस्थता बाळगणे अभिप्रेत असते आणि म्हणून होता होईतो तर्कसुसंगत आणि ससंदर्भ असलेल्या भूमिकांची समतोल दखल लेखातून घेतली जावयास हवी. आणि पुरेसे संदर्भ उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला या लेखातून तसे करणे शक्य झाले आहे.

याच मुद्द्याची साहित्यिक समिक्षणाच्या अंगानेही दखल घेण्याची या लेखास संधी मिळाली ती केशवसुतांची कविता, त्या अनुषंगाने जोगांची टिका आणि त्या टिकेचा वि.स. खांडेकरांनी घेतलेला परामर्ष. मुख्य म्हणजे रांगोळीच्या कलेचा उद्गम ते व्यवहारातील उपयोग हा सांस्कृतीक आहे की धार्मिक या बद्दल वैचारीक अथवा समिक्षा पोकळी न राहता वेगेवेगळ्या बाजू पुढे येतात ही या लेखाची जमेची बाजू झाली आहे असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:२०, २९ सप्टेंबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: वर समिक्षण उपलब्ध असलेल्या आणि टिकेची समतोल दखल घेता आलेल्या लेखाच्या स्थितीची चर्चा केली आहे. .मराठी भाषेत जाणवणाऱ्या समिक्षा पोकळीची चर्चा काळाच्या ओघात करणार आहे. शिवाय इतरही काही पैलूंची चर्चा करणार आहे. आपलाही सहभाग असावा असे वाटले म्हणून निर्देश केला. धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:००, ३ ऑक्टोबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgमाहितगार: धन्यवाद ! रांगोळी शोधण्याचा प्रयत्न करते. दिवाळीत अशा रांगोळ्या शोधता येतील. त्यांची छायाचित्र काढते.आर्या जोशी (चर्चा)

लेख परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: पूर्वी या लेखावर मी काही काम केले आहे पण त्यांचे संदर्भ मला सुधारावेत असे वाटते आहे. हे आधीचे संदर्भ काढू आणि मग नवीन घालू असे चालेल का?आर्या जोशी (चर्चा) ११:५२, ७ मे २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी, QueerEcofeminist, Rajendra prabhune, ज्ञानदा गद्रे-फडके, अभय नातू:, हा लेख परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील भर घालावी असे वाटते - रांगोळीचा जागतिक संदर्भ पहायला हवा. तसेच उत्पादन प्रक्रिया, स्थान इ. तपशील. यात मानवी / यांत्रिक पद्धत, कालानुरूप बदल.. वडार, पाथरवट अशा कोणत्या कौशल्यगट/समाज या व्यवसायात होते? माहितगार यांनी दिलेले संदर्भ पाहून वेगळ्या मुद्द्यांची भर घालणेही शक्य आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:४९, ३१ ऑक्टोबर २०१८ (IST) Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १२:३२, ३१ ऑक्टोबर २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: लेख पूर्ण तयार झाला असल्यास त्यातील निर्माणाधीन साचा काढावा. --वि. नरसीकर , (चर्चा) १०:४९, १ नोव्हेंबर २०१८ (IST) Gnome-edit-redo.svg[[:सदस्य::V.narsikar|V.narsikar]]: किरकोळ बदल बाकी आहेत, ते करते आणि मग साचा काढते.सुबोध यांनी काही सूचना केल्या आहेत पण आता वेळेअभावी कदाचित मला लगेच भर घालता नाही येणार धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १७:०८, १ नोव्हेंबर २०१८ (IST)

संदर्भ शोधण्यासाठीचे दुवे[संपादन]

स्रोत शोधा: "रांगोळी" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोधQueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ११:०२, ३१ ऑक्टोबर २०१८ (IST)

बाह्य दुवे[संपादन]

तात्पुरती संदर्भ यादी[संपादन]

संदर्भ क्र. संदर्भ क्र. संदर्भ प्रथम उधृत संदर्भ पुर्नवापर टिपा
[१] <ref name="सुधीर बोराटे (मवि: रांगोळी)">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = सुधीर | आडनाव = बोराटे | शीर्षक = [[मराठी विश्वकोश]] | मालिका = खंड १४ | प्रकरण = रांगोळी | भाषा = मराठी भाषा | संपादक = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | आवृत्ती = ऑनलाईन | दिनांक = | महिना = | वर्ष = (पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष) | फॉरमॅट = (उदा. पेपरबॅक, हार्डबॅक, इ.) | अन्य = (आवृत्तीविषयक इतर माहिती) | पृष्ठ = | पृष्ठे = | आयएसबीएन = (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) | दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand14/index.php/component/content/article?id=10306 | संदर्भ = | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ | अ‍ॅक्सेसमहिना = सप्टेंबर | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७ | अवतरण = }}</ref> <ref name="सुधीर बोराटे (मवि: रांगोळी)" />
[२] <ref name="माधुरी बापट (भारतीय रांगोळी)">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = माधुरी | आडनाव = बापट | शीर्षक = भारतीय रांगोळी | भाषा = मराठी भाषा | संपादक = | प्रकाशक = पद्मगंधा प्रकाशन | आवृत्ती = | दिनांक = | महिना = | वर्ष = (पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष) | फॉरमॅट = पेपरबॅक, | अन्य = (आवृत्तीविषयक इतर माहिती) | पृष्ठ = | पृष्ठे = १५२ | आयएसबीएन = 9789382161158 | दुवा = http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5314056725989702619 | संदर्भ = | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ | अ‍ॅक्सेसमहिना = सप्टेंबर | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७ | अवतरण = }}</ref> <ref name="माधुरी बापट (भारतीय रांगोळी)" />
3 [३] <ref name="नयना तडवळकर(रांगोळी)">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = डॉ. नयना | आडनाव = तडवळकर | शीर्षक = रांगोळी | भाषा = मराठी भाषा | संपादक = | प्रकाशक = राजेंद्र प्रकाशन | आवृत्ती = | दिनांक = | महिना = | वर्ष = (पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष) | फॉरमॅट = पेपरबॅक, | अन्य = (आवृत्तीविषयक इतर माहिती) | पृष्ठ = | पृष्ठे = १५६ | आयएसबीएन = 9789384631062 | दुवा = http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4888289842294393646 | संदर्भ = | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ | अ‍ॅक्सेसमहिना = सप्टेंबर | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७ | अवतरण = }}</ref> <ref name="नयना तडवळकर(रांगोळी)" />
[४] <ref name="वि.स. खांडेकर(रेषा आणि रंग)">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = विष्णू सखाराम | आडनाव = खांडेकर | शीर्षक = रेषा आणि रंग (केशवसूत) | भाषा = मराठी भाषा | संपादक = | प्रकाशक = मेहता पब्लिशिंग हाऊस | आवृत्ती = | दिनांक = | महिना = | वर्ष = (पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष) | फॉरमॅट = | अन्य = (आवृत्तीविषयक इतर माहिती) | पृष्ठ = | पृष्ठे = | आयएसबीएन = | दुवा = https://books.google.co.in/books?id=JFEYDgAAQBAJ&pg=PT64&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjN5NPt_sTWAhWLLY8KHWvWCnoQ6AEIMzAC#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&f=false | संदर्भ = | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ | अ‍ॅक्सेसमहिना = सप्टेंबर | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७ | अवतरण = }}</ref> }
  1. ^ बोराटे, सुधीर ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). [[मराठी विश्वकोश]] (मराठी भाषा मजकूर) (ऑनलाईन आवृत्ती.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. आय.एस.बी.एन. (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) Check |isbn= value (सहाय्य). २६ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य); Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  2. ^ बापट, माधुरी ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). भारतीय रांगोळी (मराठी भाषा मजकूर). पद्मगंधा प्रकाशन. pp. १५२. आय.एस.बी.एन. 9789382161158. २६ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)
  3. ^ तडवळकर, डॉ. नयना ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). रांगोळी (मराठी भाषा मजकूर). राजेंद्र प्रकाशन. pp. १५६. आय.एस.बी.एन. 9789384631062. २६ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)
  4. ^ खांडेकर, विष्णू सखाराम ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). रेषा आणि रंग (केशवसूत) (मराठी भाषा मजकूर). मेहता पब्लिशिंग हाऊस. २६ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)