कलश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलश

आपले पूर्वज जीवनात भावनेला प्राधान्य देत असत. भावपूर्ण जीवन म्हणजेच वैदिक जीवन. म्हणूनच आपले पूर्वज सूर्याला नुसता जड गोळा न समजता देव समजून त्याची पूजा करीत होते. तसेच पाऊसाला वरुण देव समजून त्याची पूजा करीत होते आणि कलश हे वरुण पूजनाचेच प्रतिक आहे.

मानव जेव्हा सुसंस्कृत होऊ लागला त्यावेळी मानवाला वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते. पाऊस आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण आली. पाऊस तर फक्त चारच महिने येतो, तो देखील रोज नाही. आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला. विहिर, तलाव, नदी इ. सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे. तेव्हा त्यांनी कलशात ते पाणी घेऊन त्याची पूजा सुरु केली.

कलशाला जरा व्यापक केले म्हणजे तो कुंभ बनतो. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील आहे. जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवित राहावे अशी मंगल कामना त्याच्या पाठीमागे आहे.

स्थापत्यशास्रातही कलशाचे आगळे महत्त्व आहे. मंदिर आले की कलश असणारच. कलश म्हणजे शेवटचे शिखर, पूर्णतेचे प्रतीक. पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा ह्या कलशाचे सार्थक दर्शन घेऊन आपणही पूर्ण बनले पाहिजे.हेदेखील पहा[संपादन]

वैदिक प्रतीक-दर्शन