Jump to content

चक्रव्यूह (युद्धशास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चक्रव्यूह या पानावरून पुनर्निर्देशित)
दगडावर कोरलेली चक्रव्यूहाची एक कल्पित रचना

चक्रव्यूह ही युद्धातील बचावात्मक सैन्यरचना आहे.यास पद्मव्यूह असेही नाव आहे.

पृष्ठभूमी

[संपादन]

चक्रव्यूह किंवा पदमव्यूह ही एक युद्धातील बचावात्मक बहुपन्क्ति सुरक्षा रचना आहे जी वरून पाहिल्यास एका फुलत्या कमळासारखी किंवा चक्रा सारखी दिसते. सर्व पन्क्तितले योद्धे हे युद्धासाठी अत्यंत आक्रमक स्थितीत असत. ही रचना द्रोणाचार्यांनी युद्धामध्ये वापरली होती जे भीष्म पितामह यांना दुखापत झाल्यानंतर सेनापती झाले होते.

असे बरेचसे व्यूह हे कौरवांसोबत पांडवांनी देखील आत्मसात करून घेतले होते. त्यातले बरेचसे व्यूहरचने विरुद्ध प्रतिकारात्मक उपाय करून लक्ष्याला हरवू शकत होते. महाभारतामध्ये वर्णन केलेल्या युद्धाच्या रूपात निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे देखील खूप महत्त्वाचे होते की शक्तिशाली सैनिकांना अशा स्थानी ठेवणे जेथे विरुद्ध बळ सर्वात जास्त नुकसान करू शकेल अथवा विरुद्ध पक्षाच्या प्रमुख योद्ध्याकडून होणाऱ्या आक्रमणापासून रक्षा होईल.

महाभारतातील चक्रव्यूह

[संपादन]

हा व्यूह द्रोणाचार्यांनी महाभारत युद्धाच्या १४व्या दिवशी रचला. याद्वारे,द्रोणाचार्यांना युधिष्ठिरास दास बनवायचे होते. द्रोणांनी पांडवांना पत्ता न लागू देता युद्धाच्या १३व्या दिवशीच्या मध्यरात्री या चक्रव्यूहाद्वारे अर्जुनाचा पूर्ण पराभव करण्याचे हेतूने हा डाव रचल्या गेला. या चक्रव्यूहाचा भेद करणारे त्यावेळी फक्त श्रीकृष्ण,अर्जुन, कर्ण, भीष्म, स्वतः द्रोणाचार्य व काही अंशी अभिमन्यू इतकेच होते. अभिमन्यूस त्या व्यूहाचे 'उर्ध्वछेदन'(वरचे बाजूने छेद करणे) अवगत नव्हते पण तो 'अधरछेदन' (खालचे बाजूने छेद करणे) करू शकत होता. हा व्यूह म्हणजे साक्षात मृत्यु असे महाभारतात नमूद आहे. [१]

रचना

[संपादन]

याची रचना साधारणतः कांद्याच्या पाकळ्यांसारखी एकात एक अशी असते.आकाशातून बघितले असता,याची रचना एखाद्या 'सप्तदलपुष्प'(सात पाकळ्याचे फूल) या प्रमाणे दिसते. त्या ज्याप्रमाणे एकात एक घुसलेल्या असतात तद्वतच.त्याची एकूण रचनादेखील 'उर्ध्वाधर निरुंद' अश्या प्रकारे असते.खाली गुंडी व वरचे बाजूस निमुळती रचना असते.चक्रव्यूहात फक्त दक्षिण स्कंदाकडूनच प्रवेश करता येउ शकतो.[२]

हा वर्तुळाकार असतो.याचे मुखावर,प्रत्येकी दोन दोनच्या रांगेत,अश्वदळ गजदळपायदळ अशा रांगा असतात.याचे पिछाडीस व परीघावर चतुरंग सेना असते.याचे मध्यभागी सेनापती असतो.(येथे महाभारतात द्रोणाचार्य). त्याचा प्रवेशमुख हे 'सूचिरंध्र'प्रमाणे(सुईचे दोरा घालण्याचे छिद्र) असते.तेथून, भेदन करणाऱ्या योध्याचे मागे, त्याचे सैन्य मार्गक्रमण करते.याचे आतील वर्तुळासच फक्त दोन प्रवेश असतात.त्यातील एक, पराभव होतो आहे असे दिसल्यास पळून जाण्यासाठी तर दुसरा,आक्रमक योद्ध्यांची फळी फोडण्यासाठी असतो.त्यानंतर तिसरी व चौथी फळी असते.त्याचा आकार हा, सुमारे पाच किमी.व्यास असलेला असतो.यात सुमारे ८००० योद्धे असतात.[३]

भेदन(तोडणे)

[संपादन]

एखादा योद्धा या व्यूहाचे आत शिरल्यावर,त्यास चहुबाजूचे सैन्य कापावे लागते(एक विरुद्ध आठ). हे करीत असतांनाच, त्यास पुढची रचना कापावी लागते. मागे त्याचे सैन्य असते.चक्रव्यूहात फक्त पुढे जाण्याचा मार्ग असतो, पण कसलेला योद्धा त्याची तिसरी फळी फोडून परत प्रवेशमुखावर येऊ शकतो.त्यास हे न जमले तर,तो 'यामिनीभुंग्यासारखा'(कमळात ज्याप्रमाणे रसग्रहण करणारा भूंगा, रात्र झाल्यावर त्याचे पाकळ्या मिटल्यामूळे अडकून पडतो त्याप्रमाणे) अडकतो व मृत्यु पावतो.[४]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ श्रीपाद के.चितळे. तरुण भारत, नागपूर-ई-पेपर,आसमंत पुरवणी, दि. ९ मार्च,२०१४, पान क्र. २ "चक्रव्यूह म्हणजे काय?" Check |दुवा= value (सहाय्य). १५ मार्च २०१४ रोजी पाहिले. ज्ञानरंजन
  2. ^ श्रीपाद के.चितळे. तरुण भारत, नागपूर-ई-पेपर,आसमंत पुरवणी, दि. ९ मार्च,२०१४, पान क्र. २ "चक्रव्यूह म्हणजे काय?" Check |दुवा= value (सहाय्य). १५ मार्च २०१४ रोजी पाहिले. ज्ञानरंजन
  3. ^ श्रीपाद के.चितळे. तरुण भारत, नागपूर-ई-पेपर,आसमंत पुरवणी, दि. ९ मार्च,२०१४, पान क्र. २ "चक्रव्यूह म्हणजे काय?" Check |दुवा= value (सहाय्य). १५ मार्च २०१४ रोजी पाहिले. ज्ञानरंजन
  4. ^ श्रीपाद के.चितळे. तरुण भारत, नागपूर-ई-पेपर,आसमंत पुरवणी, दि. ९ मार्च,२०१४, पान क्र. २ "चक्रव्यूह म्हणजे काय?" Check |दुवा= value (सहाय्य). १५ मार्च २०१४ रोजी पाहिले. ज्ञानरंजन

बाह्यदुवे

[संपादन]