सौराष्ट्र
सौराष्ट्र हा भारताच्या गुजरात राज्यातील भाग आहे. सौराष्ट्राचे जुने नाव काठेवाड किंवा सौराष्ट्र
या काठेवाडात ‘अ’वर्गीय १४, ‘ब’वर्गीय १७ व अन्य १९१ अशी एकूण २२२ संस्थाने होती. या सर्व संस्थानांना एकत्रित करून त्यांचे एक संयुक्त राज्य बनविण्याची सरदार वल्लभभाई पटेलांची योजना होती. त्यासाठी १८ कलमांचा ‘एकत्रीकरणनामा’ तयार ठेवला होता. १५ जानेवारी १९४८ रोजी पटेलांनी सर्व संस्थानिकांसमोर गुजरातीत भाषण करून एकत्रित येऊन एक संयुक्त राज्य स्थापन करण्याचे कळकळीचे आवाहन केले. त्यानंतर या कामाची जबाबदारी त्यांनी त्यांचे सचिव मेनन यांच्याकडे सोपवून दिली. तिसऱ्या दिवशी मेनन यांनी संस्थानिकांची बैठक बोलावून सांगितले की, ‘आपण आवश्यक त्या संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र व्यवहार या तीन विषयांपुरते हिंदुस्थान देशात विलीन झाला आहांत. परंतु, ती काही अंतिम उपाययोजना होऊ शकत नाही. ..हिंदुस्थान सरकार जनतेच्या हक्कांचे समर्थक आहे.. त्यांना वाटते की, राजेशाहीविरुद्ध उठाव न होता शांततेच्या मार्गाने जनतेकडे सत्तांतर झाले पाहिजे.. एकत्रीकरणापासून तुमची सुटका नाही.. तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व टिकविणे अशक्य आहे.. तो धोका पत्करायचा आहे का, हे तुम्हीच ठरवा..’ संध्याकाळपर्यंत प्रमुख संस्थानिकांनी एकत्रीकरणास मान्यता देऊन टाकली. सर्वाच्या सह्या घेण्यात चार-पाच दिवस लागले. १५ फेब्रुवारी १९४८ रोजी सरदार पटेलांच्या हस्ते या ‘काठियावाड संयुक्त राज्या’चे उद्घाटन करण्यात आले.
शंभराधिक संस्थाने ज्या प्रदेशात होती त्या काठेवाडला सौराष्ट्र हे सयुक्तिक नाव ठेवण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |