तुळस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुळस
तुळस
तुळस
तुळशीचे फूल
तुळशीची पाने

तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लेबियाटी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया, युरोपआफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुर्‍यासारख्या फुलानां मंजिरी म्हणतात. त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात.

तुळशीच्या जाती[संपादन]

  • औषधी तुळस - Fever plant of Sierra Leone (Ocimum viride)
  • कापूर तुळस - Camphor basil (Ocimum kilimandscharicum)
  • काळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- Hoary basil (Ocimum americanum)
  • कृष्ण तुळस - Sacred basil (Ocumum sanctum/tenuiflorum)
  • रान तुळस - Sweet basil (Ocimum basilicum)
  • राम तुळस - Shrubby basil (Ocimum gratissimum)हिंदू धर्मातील स्थान[संपादन]

मुख्य पान: तुळशी विवाह

हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.

तुळस आणि दुर्वा[संपादन]

गणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात. कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत.

आयुर्वेदीय ग्रंथ सांगतात - दुर्वा कषाया मधुराश्च शीता । पित्ततृषारोचक वान्तिहज्यः ॥, तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत।. म्हणजे दुर्वा या तुरट-गोड तर तुळ्स ही कडू-तिखट. दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण. दुर्वा पित्ततृषारोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस पित्त आणि भूक वाढवणारी.

दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालत असल्याने दुसरी चालत नाही.

आयुर्वेदातील स्थान[संपादन]

औषधी उपयोग[संपादन]

  • या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत. एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुवेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टोनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुलसीचा रस पाचक म्हणून उपयोग होतो. नायटा झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात. कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणुन पानाचा रस उपयुक्त ठरतो . उष्णतेच्या त्रासापासुन आराम देते . तुळसीचे बी पाण्यात 2 ते ६ तास पाण्यात भिजवतात . याचे दुध साखरेबरोबर सेवन केल्यास उष्णता कमी होते .मधमाशीचा दंश झाल्यास तुळसीतली माती वापरल्यास आराम पडतो

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत