मोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
" | मोर
भारतीय नर मोर
भारतीय नर मोर
" | शास्त्रीय वर्गीकरण
वंश: [[कणाधारी
प्राणी|कणाधारी]]
जात: पक्षी
वर्ग: कुक्कुटाद्या
कुळ: कुक्कुटाद्य
जातकुळी: पावो
लिन्नॉस, १७५८

इतर नावे

पावो क्रिस्टॅटस
पावो म्युटिकस

मोर कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडू शकतात. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर जंगलांच्या किंवा झाडीच्या आसपास पाहायला मिळतात. गुजरात, राजस्थान या भागातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या घरांच्या अंगणात मोर सहजपणे वावरताना आढळतात. महाराष्ट्रातील काही गावात मोर मनुष्य वस्तीच्या जवळपास आढळले तरीही ते माणसांपासून दूर वावरतात. मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतात. मादीला म्हणजेच लांडोरीला, पिसारा नसतो. एका मोराबरोबर अनेक लांडोरी थव्याने शेतात दाणे टिपताना आढळतात. मोराचे अन्न पाने,किडे,सरडे,सॅप हे आहे

भारतात मोर पाळायला कायद्याने परवानगी काढावी लागते. जवळपास मोर असले आणि मोरांना नियमित खायला दिले तर मोर नियमित त्या घरात वावरतात. मोर आता दुर्मिळ झाले आहे.मोर हा सुंदर पक्षी आहे.

चोचीपासून शेपटीपर्यंत त्याची लांबी १०० ते ११५ सें.मी. असते. पूर्ण वाढलेला पिसारा १९५ ते २२५ सें.मी. लांबीचा असू शकतो. मोराचे वजन ४ - ६ किलो असते. लांडोर (मादी) आकाराने लहान असतात. त्यांची लांबी साधारणतः ९५ सें.मी. आणि वजन २.७ - ४ किलो असते. लांडोरीला किंचितही पिसारा नसतो.

खाद्य[संपादन]

मोराचे अन्न हे झाडाची पाने, किडे, साप, सरडे,आळी आहे. ते काही फळेही खातात.

वास्तव्य[संपादन]

मोर पानझडी जंगलांत व अरण्यात राहतात व ते रात्री आसऱ्यासाठी झाडांवर जातात.

महाराष्ट्रात मोरांचे स्थान[संपादन]

महाराष्ट्रात बऱ्याच गावांजंलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हा पक्षी सरस्वती देवीचे वाहन आहे असे काही समूहांकडून मानले जाते. अर्थात अनेक प्राण्यांना विशिष्ट देवतांशी वा दैवतांशी जोडून त्यांचे जतन केले जावे व नैसर्गिक जीवसाखळी अबाधित राखावी असा विचार त्यापाठी असावा. या श्रद्धेपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्यपाणी देत असतात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या 'मोराची चिंचोली'[१] नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात. इतर क्षेत्रातही मोर मोठ्या प्रमाणात आढळतात.

आवाज[संपादन]

मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात.केकारव म्यॉंव म्यॉंव किंवा म्यूॅंहू...म्यूॅंहू... असा भासतो . Indian Peafowl.ogg मोराचा आवाज ऐका

जंगल क्षेत्रातील त्यांच्या जोरदार केकारवामुळे त्यांचा सहजपणे शोध घेता येतो.

प्रकार[संपादन]

पांढरा मोर[संपादन]

पांढरा मोर दुर्मिळ आहे. हे प्रामुख्याने मोकळ्या  जंगलात  किंवा शेतात आढळतात, जेथे त्यांना फीडसाठी बेरी आणि धान्य मिळते परंतु साप, मांजर, उंदीर आणि खार(गिलहरी) इ. खातात.वपावसाची चाहूल लागताच मोर त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो म्हणूनच आपल्याला पावसाळ्यात जास्त करून मोर दिसतात.

सांस्कृतिक संदर्भ[संपादन]

मोर हे सरस्वती तसेच कार्तिकेय यांचे वाहन आहे. मोराच्या रंगीत पिसाऱ्यामुळे तसेच डौलदार मानेमुळे मोराने पैठणी या मराठी महावस्त्रावर स्थान मिळवले आहे.

क्षणचित्रे[संपादन]

Peacock
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

भारतीय मोर[संपादन]

हिरवा रंगाचा मोर[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]