"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १११: | ओळ १११: | ||
*[[गणपती स्तवन]] |
*[[गणपती स्तवन]] |
||
== कल्याणस्वामींवरील पुस्तके == |
|||
== संकीर्ण माहिती == |
|||
* दासविश्रामधाम या ग्रंथातील अध्याय क्र.११५ व ११६ मध्ये श्री कल्याण स्वामींचे चरित्र आहे. |
|||
धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेने कल्याणस्वामींच्या जीवनावर व साहित्यरचनेवर ''समर्थशिष्य कल्याण''' नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. |
* धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेने कल्याणस्वामींच्या जीवनावर व साहित्यरचनेवर ''समर्थशिष्य कल्याण''' नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. |
||
* कल्याण स्तवन (कवी - रामचंद्रपंत पंत अमात्य) |
|||
[[रामचंद्रपंत पंत अमात्यकृत कल्याण स्तवन]] |
|||
* योगीराज श्रीकल्याणस्वामी (लेखक - सचिन जहागीरदार, शिवराम राजाराम ऊर्फ संजय रामदासी). सुयोग प्रकाशन, पुणे |
|||
* समर्थशिष्य योगिराज श्री कल्याणस्वामी चरित्र (हिंदी, लेखक सचिन अशोक जहागिरदार) |
|||
* श्री कल्याणस्वामी चरित्र (मराठी, लेखक - सुव्रतसुत) |
|||
==डोमगावला जाण्याचे मार्ग== |
==डोमगावला जाण्याचे मार्ग== |
२०:१५, १३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
कल्याण स्वामी (मराठी लेखनभेद: कल्याणस्वामी)), पूर्ण नाव : अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म : बाभुळगांव येथे अंदाजे (शा.श. १५५८ की १५४०?), अर्थात इ.स. १६३६ किंवा १६१८ - समाधी : अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी, शा.श. १६३६; डोमगाव, उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र). हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. [ संदर्भ हवा ].
बालपण व प्रारंभिक जीवन
मूळच्या नाशिक परिसरातील कृष्णाजीपंत कुलकर्णी हे पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तीर्थयात्रेसाठी कोल्हापूरला आले होते. तेथे पाराजीपंत (बरवाजीपंत) कुलकर्णी यांच्या रखुमाबाई नावाच्या बहिणीशी कृष्णाजीपंतांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले झाली. पहिला म्हणजे, अंबाजी (जन्म शा.श. १५५८ म्हणजे इ.स. १६३६) व दुसरा दत्तात्रेय. या दोघांना एक बहीणही होती. रामदासस्वामी कीर्तनासाठी कोल्हापूरला आले असता पाराजीपंतानी आपली बहीण व तिच्या मुलांसह समर्थांचा अनुग्रह घेतला. त्यानंतर अंबाजी, दत्तात्रेय व त्यांच्या मातोश्री, समर्थांबरोबर तीर्थयात्रेस निघाले. वाटेत शिरगाव येथे समर्थांनी दत्तात्रेय स्वामींना मठ स्थापून दिला. ते व त्यांच्या मातोश्री तेथेच राहिले. अंबाजी मात्र पुढे आजन्म समर्थसेवेत राहिले. अंबाजींचेच नाव पुढे समर्थांनी कल्याण असे ठेवले.
समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी
सन १६४८ ते सन १६७८पर्यंत कल्याणस्वामी हे समर्थ रामदास स्वामी यांच्या बरोबर होते. रामदास स्वामींनी कल्याण स्वामींच्या शिष्यत्वाच्या अनेक परीक्षा घेतल्या. त्या सर्व परीक्षांमध्ये ते पूर्णपणे उत्तीर्ण झाले. रामनवमीच्या रथयात्रेत रामाचा रथ आडव्या आलेल्या एका झाडाच्या फांदीमुळे अडला. तेव्हा रामदासांनी ती फांदी तोडण्याची आज्ञा केली. परंतु ती फांदी जो तोडेल तो तिच्या खाली असलेल्या खोल विहिरीत पडेल, अशी परिस्थिती होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता अंबाजीने ती फांदी तोडली व ते विहिरीत पडले, आणि रथ पुढे गेला. संध्याकाळी सर्व शिष्यांना अंबाजीची आठवण झाली. इतक्या वेळ पाण्यात राहिल्याने अंबाजी मृत झाले की काय अशी भीती सर्व शिष्यांना होती. ते समर्थांना घेऊन त्या विहिरीजवळ आले. समर्थांनी अंबाजीला विचारले 'अंबाजी, कल्याण आहे ना ?' तेव्हा आत पाण्यातून उत्तर आले 'स्वामी, आपल्या कृपेने कल्याण आहे'. तेव्हापासून अंबाजी हे कल्याण स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. ही घटना मसूर येथे घडली.
एकदा, सज्जनगडावर गडाच्या टोकाशी रामदास उभे राहिले असताना, त्यांची छाटी(वस्त्र) वाऱ्याने उडाली. तेव्हा समर्थ उच्चारले 'कल्याणा, छाटी उडाली'. हे ऐकताच गुरुभक्त कल्याण स्वामींनी कड्यावरून खाली उडी घेतली व ती छाटी हवेतच झेलली. ती जागा आजही सज्जनगडावर कल्याण छाटी या नावाने दाखवतात.
एकदा चाफळला रात्री समर्थ अंथरुणात पहुडले होते.त्यांचा लाडका शिष्य कल्याण त्यांचे पाय चेपत होता.रात्रीचे जवळजवळ साडे बारा वाजले होते.पाय चेपताना कल्याण स्वामीना शंका आली कि, भांडार घरात चोर शिरले असावेत.कल्याणस्वामींचे अर्धे लक्ष पाय दाबण्याकडे तर अर्धे लक्ष चोरांकडे होते.कल्याणने जेव्हा समर्थांना चोर आले असावेत असे सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले - 'अरे जाऊ दे, भांडारघरातील धान्य आपल्या एकट्याचे थोडेच आहे.त्या अन्नावर जर त्यांचे नाव लिहिले असेल तर ते त्यांना मिळेल.'कल्याणने जेव्हा भांडारघरात भिक्षेचे पैसे आहेत म्हणून सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले - 'अरे जाऊदे आपण साधू आहोत. आपल्याला पैशाचा मोह काय करायचा?'समर्थ तसे पक्के व्यवहारी होते.पण मुद्दाम कल्याणाची परीक्षा पाहण्यासाठी ते तसे बोलत होते.म्हणून कल्याण म्हणाला - 'लोकांपुढे चुकीचा आदर्श ठेवल्यासारखा होईल.'आपला शिष्य वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेला पाहून समर्थांना कौतुक वाटले .समर्थांनी कल्याणास त्या चोरांना भांडारघरात कोंडून ठेवायला सांगितले. कल्याण अत्यंत बलदंड होते.भलीमोठी काठी हातात घेऊन ते भांडारघरात शिरले. कल्याणांचा रुद्रावतार पाहून सारे चोर घाबरले. समर्थदेखील त्या ठिकाणी पोहोचले.
समर्थ त्या चोरांशी अत्यंत प्रेमाने बोलले. समर्थ म्हणाले, - 'तुम्हाल मी भांडारघरात काम दिले आणि पगार दिला तर तुम्ही चोरी बंद कराल का?' तेव्हा सारे चोर म्हणाले, 'कष्ट करून आमचा संसार चालणार असेल तर आम्ही या क्षणापासून चोरीचा व्यवसाय सोडून देऊ.समर्थांनी त्या सर्वांना चाफळ मठात वेगवेगळी कामे दिली.त्यामुळे त्या चोरांनी समर्थांच्या मठात नवे जीवन सुरु केले.
समर्थ रामदासस्वामींनी एकदा ब्रह्मपिशाच्चाचे सोंग घेतले. तेव्हा कल्याण स्वामींनी त्यांची प्रार्थना करून त्यांना शांत केले. ते ठिकाण सज्जनगडावर 'ब्रह्मपिसा' या नावाने ओळखले जाते.
समर्थांनी शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी एकदा मध्यरात्री विड्याची पाने आणण्याची आज्ञा केली. पण भर रात्री पाने आणायला कोणीही तयार झाले नाही. यावेळी कल्याण स्वामी तत्काळ निघाले, परंतु जंगलातून जात असताना त्यांना एका विषारी नागाने दंश केला. कल्याण स्वामी मूर्च्छित झाले.बराच वेळ ते का आले नाहीत हे पाहण्यासाठी समर्थ आले असता त्यांना रस्त्यात मूर्च्छित कल्याण स्वामी दिसले. नंतर समर्थांनी त्यांचे विष उतरवले. अशी कल्याणांची गुरुनिष्ठा होती.
एकदा औरंगाबादला समर्थ रामदास स्वामी कीर्तन करत होते.त्यावेळी कल्याण स्वामी त्यांच्या साथीला होते. समर्थांनी अभंग सांगण्यासाठी त्यांच्याकडे पहिले.पण कल्याण स्वामींना अभंग आठवला नाही.यावेळी समर्थांनी त्यांना हातातील टाळ फेकून मारला .तो कल्याण स्वामींच्या डोक्याला लागला व रक्ताची धार लागली.त्याच्यानंतर कल्याण स्वामींना तो अभंग आठवला.नंतर समर्थांनी स्वहस्ते ती जखम भरली.व पुढे समर्थ म्हणत .. आम्ही रांधतो ते सेवुनी । अवशिष्ट देतो मज काढुनी॥
अशा अनेक बोधप्रद कथा समर्थ चरित्रात आहेत.
समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर असताना कल्याणस्वामी रोज त्यांच्या स्नानासाठी 'उरमोडी' नदीतून पाण्याने भरलेले हंडे सज्जनगडावर घेऊन येत असत. हे हंडे आजही तेथे पहायला मिळतात.या ३० वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी समर्थांचे सर्व साहित्य लिहून दिले. ते समर्थांना कीर्तनामध्ये साथ करत असत. तसेच त्यांच्या बरोबर सर्वत्र भ्रमण करत असत. समर्थ रामदासांनी त्यांना समाधिअवस्थेची अनुभूती दिली होती. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवथर घळ या ठिकाणी समर्थ रामदासांनी त्यांच्याकडून आपला दासबोध हा ग्रंथ लिहून घेतला. रामदासांनी कल्याणस्वामींना दासबोधाचे तात्त्विक सारही सांगितले; ते सोलीव सुख या नावाने प्रसिद्ध आहे. सध्या समर्थांचे जे काही साहित्य उपलब्ध आहे, त्याचे बहुतेक लिखाण कल्याणस्वामींच्या लेखणीतून झाले आहे. कल्याणस्वामींचे गुरुबंधू अनंत कवी लिहितात : "स्वामींचा कवितासमुद्र अवघा कल्याण लिहितसे ।"
सन १६७८ मध्ये समर्थ रामदासांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली.
जेव्हा समर्थ रामदास स्वामींनी १६८१ मध्ये समाधी घेतली, त्यावेळी कल्याणस्वामी डोमगावला होते. गुरूंच्या विरहाने व्याकुळ होऊन ते सज्जनगडावर गेले, तेव्हा समाधी दुभंगून समर्थांनी त्यांना दर्शन दिले. त्याची प्रसंगाची खूण म्हणून समर्थांच्या समाधीवरील 'चीर' दाखवतात. त्यानंतर मात्र कल्याण स्वामी सज्जन गडावर कधीही गेले नाहीत. कारण त्यांना संपूर्ण सज्जनगडच समर्थरूप भासत होता. सन १६८१मध्ये रामदासस्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या अस्थी चाफळ येथील वृंदावनामध्ये ठेवण्यात आल्या. त्यांची पूजाअर्चा कल्याणस्वामींचे शिष्य, केशवस्वामी हे करत असत. सन १७१४मध्ये केशवस्वामींनी समर्थांच्या अस्थी वृंदावनामधून बाहेर काढल्या असतां, योगबलाने कल्याणस्वामींनी परांडा येथे आपला देह ठेवला. गुरुशिष्य (समर्थ रामदासस्वामी व कल्याणस्वामी) या दोघांच्या अस्थी केशवस्वामींनी गंगेमध्ये एकत्र विसर्जित केल्या .ही गुरुनिष्ठा पाहून केशव स्वामींनी खालील उद्गार काढले:
धन्य धन्य हे गुरुशिष्यपण । धन्य धन्य हे सेवाविधान । धन्य धन्य अभेदलक्षण । धन्य धन्य लीला अगाध ॥
श्री कल्याणस्वामींनी त्यांचे सर्व जीवन समर्थसेवेत अर्पण केले होते.
व्यक्तिमत्त्व
कल्याणस्वामींचे हस्ताक्षर अतिशय वळणदार होते. त्यांच्या हातचे २५० पानांचे बाड धुळे येथे आहे. ते रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत, त्यामुळे त्यांची शरीरयष्टी अत्यंत बलदंड होती. नदीच्या पुरामध्ये उडी घेणे, सज्जनगडावरून खाली झेप घेणे अशी कामे ते लीलया करू शकत. त्यांची वस्त्रे हुर्मुजी (भगव्या) रंगाची असत .ते कौपीन परिधान करत. ते रुद्राक्षमाळा, यज्ञोपवीत, मुद्रिका, दाढी व जटा इत्यादी धारण करत असत. ते सर्वांगाला भस्म लावत. ते पातंजल योगामध्ये अधिकार असलेले योगी होते. कल्याणस्वामींना 'योगिराज' उपाधीने संबोधले जाते. त्यामुळेच त्यांचे चित्र योगमुद्रेमध्ये बसलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यांच्या चित्रामध्ये त्यांनी पायाला 'योगपट्ट' बांधलेला दिसतो. कल्याण स्वामी हे चांगले चित्रकार होते. त्यांनी रेखाटलेले वीर मारुतीचे चित्र उपलब्ध आहे. समर्थांचे शिष्य किती विविध विषयांमध्ये निपुण होते याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे हे चित्र होय. त्यांच्याकडे असलेली झोळी 'गोणी (पोत्या) एवढी' मोठी असे. त्यामध्ये लेखन साहित्य, संदर्भ ग्रंथ इत्यादी गोष्टी असत. एका दिवसामध्ये ते शेकडो ओव्या लिहून काढत. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या भागात कल्याणस्वामींनी २५०पेक्षा अधिक रामदासी मठांची स्थापना केली आहे. ते उत्तम कीर्तनकार होते. वळणदार अक्षर, उत्तम पाठांतर, तेजःपुंज शरीरयष्टी, प्रतिभावंत कवी, योगी व एकनिष्ठ गुरुभक्त इत्यादी गुण आपणास कल्याणस्वामींमध्ये आढळतात.
साहित्यरचना
कल्याणस्वामीनी ७०० ओव्यांचे महावाक्य पंचीकरण हे प्रकरण आणि ध्रुवाख्यान(१४), श्रीरामदास(८), रुक्मिणीस्वयंवर(हिंदी-३४), श्रीशुकाख्यान(१८), संतमाळा(१०), सोलीवसुख(५०अभंग)व आणखी सहा प्रकरणे रचली आहेत. याशिवाय, ५ श्लोक, ८ आरत्या,९७ पदे, ३ भूपाळ्या आणि ८२ चौचरणी ओव्या रचल्या आहेत. [ संदर्भ हवा ].
डोमगाव येथील समाधिमंदिर
सज्जनगडाहून निघाल्यावर कल्याण स्वामी शिरगाव,पंढरपूर,तुळजापूर या मार्गे डोमगावला आले. डोमगाव येथे आल्यावर स्वामींनी रामदासी कार्यास सुरुवात केली.वर्षातील ४ महिने डोमगाव ,४ महिने डोणजे व ४ महिने डोमगाव येथील कडा येथे त्यांचे वास्तव्य असे.सन १६७८ ते सन १७१४ पर्यंत कल्याणस्वामी डोमगाव येथे होते. या भागात त्यांनी विपुल प्रमाणात शिष्यवर्ग निर्माण केला. त्यांच्या ४४ शिष्यांची यादी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या परांडा नामक गावी रामकथा संपूर्ण सांगून झाल्यावर आषाढ शुद्ध त्रयोदशी, शा.श. १६३६(इसवी सन १७१४) रोजी कल्याणस्वामींनी देह ठेवला. त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार डोमगाव येथे झाले. सीना नदीकाठी असलेल्या डोमगावच्या या समाधिस्थळी सुमारे २५० वर्षे जुने असलेले कल्याणस्वामी समाधिमंदिर आहे. डोमगाव मधून वाहणाऱ्या सीना नदीचे कल्याण स्वामींनी 'श्रमहरणी' असे नामकरण करून तिची आरतीही रचली आहे.वर्तमान समाधिमंदिर हे त्यांचे उत्तराधिकारी श्री मुद्गल स्वामींच्या काळात, म्हणजे कल्याणस्वामी समाधिस्थ झाल्यानंतर ५९ वर्षांनंतर बांधले गेले.या मंदिरामध्ये ४ शिलालेख आहेत . मंदिरामधील भव्य लाकडी सभामंडप मठपती श्रीरामबुवा यांनी सन १९१४ ते १९१८ या कालावधीमध्ये बांधला. कल्याणस्वामींची समाधी ही वालुकामय पाषाणाची आहे. या समाधिमंदिरात, जसा समर्थ रामदासस्वामींनी सांगितला व कल्याणस्वामींनी लिहून घेतला, अशा त्या दासबोधाची आद्य हस्तलिखित प्रत, कल्याणस्वामींची जपमाळ इत्यादी स्मृतिवस्तू ठेवल्या आहेत. दरवर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीला कल्याणस्वामींची पुण्यतिथी असते .
डोमगाव मठ परंपरेमध्ये पुढे सखाराम महाराज नावाचे सत्पुरुष होऊन गेले. रामदास>कल्य़ाण>मुद्गल>भिवाजी>महारुद्र>हनुमंत>सखाराम अशी त्यांची शिष्यपरंपरा आहे. त्यांनी कीर्तनांद्वारे रामदासी संप्रदायाचा प्रसार केला. संकेत कुबडी, लघुवाक्यवृत्ती इत्यादी ग्रंथांचे कर्ते हंसराजस्वामी हे यांचे जवळचे स्नेही होते. श्री सखाराम महाराज यांचा समाधीकाळ सन १८४०(?)आहे. त्यांची समाधी हैदराबाद येथे आहे. तसेच पुढे शंकराचार्य झालेले कल्याणसेवक महाराज तरुणपणी डोमगाव येथे साधनेसाठी राहिले होते. थोर समर्थभक्त अण्णाबुवा कालगावकर यांनी डोमगाव येथेच साधना करून साक्षात्कार करून घेतला. तसेच श्रीधर स्वामी यांच्या आई-वडिलांनी कल्याण स्वामी परंपरेमधील दत्तात्रेय स्वामींचा अनुग्रह घेतला होता. शंकर श्रीकृष्ण देव हे अनेक दिवस डोमगाव मठात येऊन राहिले होते. त्यांनी तेथून मूळ दासबोधाची शुद्ध प्रत लिहून घेतली व त्यावरून दासबोध प्रसिद्ध केला.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना श्री तुकाराम चैतन्य महाराजांकडे पाठवणारे श्री रामकृष्ण स्वामी हे कल्याण स्वामी शिष्य परंपरेतील होते .हि परंपरा खालील प्रमाणे:- समर्थ रामदास स्वामी -श्री कल्याण स्वामी-श्री बाळकृष्ण स्वामी-श्री चिंतामणी स्वामी -श्री रामकृष्ण स्वामी- श्री तुकाराम चैतन्य-श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
समर्थ रामदासांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी समाधिस्त होताच गादीवर कोणी बसावे, याबाबतीत तेथल्या शिष्यगणात मनस्वी भांडाभांड, दंगल झाली. प्रकरण मारामारीपर्यंत जाऊन कित्येकांची डोकी फुटली. ही बातमी सातारच्या छत्रपती शाहू महाराजांपर्यंत जाताच त्यांनी तात्काळ 'आम्ही जातीने येऊन काय तो निर्णय ठरवू' असा तातडीचा संदेश गडावर पाठवला. त्याप्रमाणे छत्रपती गडावर गेले. चौकशी केली. 'श्रेष्ठीच्या वंशातील कोणी आहेत काय? असल्यास आमच्यासमोर त्यांना हजर करा.' वंशज येऊन दाखल झाले. समर्थांच्या गादीवर बसायला कोण तयार आहे? असा प्रश्न टाकला. जो तो काकू करू लागला. मुख्य अडचण होती काटेकोर ब्रह्मचर्याच्या व्रताची! महाराजांपुढे ती मांडण्यात आली. 'ठीक आहे आम्ही ती अडचण दूर करतो. या गादीवरील मठाधिपतीने विवाह केला तरी चालेल.' अडचण दूर होताच एक मुलगा तयार झाला. श्रीफळ, महावस्त्र अर्पण करून छत्रपतींनी त्याची समर्थांच्या गादीवर अधिपती म्हणून नेमणूक केली आणि 'आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिकारी नेमण्याचे अधिकार छत्रपतींना आहेत त्याप्रमाणे चालावे' असा लेखी हुकूम जारी केला.'[१]
।। पतित प्राणी पदा लागुनी कल्याण झाले ।।
प्राचीन श्रुतींमधील धौम्य -आरुणी तसेच रामायणातील वसिष्ठ -श्रीराम किंवा नंतरचे मत्स्येंद्र -गोरक्ष असा गुरु शिष्य परंपरेचा गंगौघ आपल्या भारत भूमीमध्ये अविरत प्रवाहीत आहे.अगदी अलीकडे म्हणजे ३०० वर्षापूर्वी या परंपरेतील एक सुवर्णपर्व साकारले.समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्योत्तम कल्याण स्वामी म्हणजे अद्वैताचे रोकडे प्रमाण ."याचेनि योगे मज बहु विश्रांती " असे समर्थ रामदास स्वामी कल्याण स्वामींच्याबद्दल म्हणतात.कल्याण स्वामी समर्थांचे बहिश्चर प्राण होते असे ग्रंथ सांगत आहेत.रामघळीमध्ये सर्पदंश झाल्यावर समर्थांनी कल्याण स्वामींसाठी तेथील श्री भैरवनाथाला नवस केला होता.धन्य ते कल्याण स्वामी ज्यांच्यासाठी समर्थांनी नवस केला.
रोज १२०० सूर्यनमस्कार आणि अखंड चालणारा रामनामाचा अजपा - जप,महावाक्य पंचीकरणातील वेदांत आणि सज्जनगडावरील पाण्याचे हंडे,दासबोधाची हस्तलिखित प्रत आणि योगपट्ट बांधून योगमुद्रेमध्ये बसलेले कल्याण स्वामी यांच्याकडे थोडे विचारपूर्वक पहिले असता त्यांनी समर्थांचे तत्त्वज्ञान किती अचूकपणे धारण केले होते हे कळते.समर्थांच्या समाधीनंतर सर्वार्थाने ज्येष्ठ असूनदेखील,ते सर्वांपासून अलिप्त राहून समर्थकार्य करत राहिले. मात्र एका पत्रात ते लिहितात . 'कलहामुळे श्रीच्या धर्मस्थापनेस अंतर पडेल ऐसे न करणे. " हा बोध आपणा सर्वांसाठी आहे.
जवळ जवळ वयाच्या पन्नाशीला आल्यावर कल्याण स्वामी डोमगावला आले.त्यानंतर तिथे त्यांनी केलेल्या समर्थ कार्याच्या खुणा आजही गावागावांत सापडतात.ती परंपरा आजही अखंडित आहे.
समर्थांच्या अस्थिविसर्जनाचा योग साधून त्याबरोबरच पंचत्वात विलीन होणारे कल्याण स्वामी म्हणजे गुरुभक्तीची परिसीमा होय.ज्यांच्या अस्थींमधून 'विठ्ठल विठ्ठल ' नामाचा गजर चालू होता ते श्री संत चोखामेळा काय किंवा श्री कल्याण स्वामी काय यांची दिव्य चरित्रे पाहून बुद्धी खुंटते ,शब्द तोकडे पडतात.. आजही सज्जनगडावर समर्थांच्या समाधीसमोर 'श्रमहरणीनिवास माझे कल्याण माये।' हे भजन म्हटले जाते.ती श्रमहरणी सीना नदी ,त्यांचे समाधीस्थान डोमगाव ,त्यंच्या वास्तव्याने पुनीत झालेला तो परिसर यांना तीर्थक्षेत्रत्व प्राप्त झाले आहे.
आपले चित्त श्री कल्याण स्वामी चरणी लागले कि सर्वांचे कल्याण होईल असा स्वामींचा आशीर्वाद आहे.
||पतित प्राणी पदा लागुनी कल्याण झाले ||
शिष्य परिवार
कल्याणस्वामींचे अनेक शिष्य होते. त्यांच्या मठांची संख्या २५०च्या जवळपास असून[ संदर्भ हवा ] हे सर्व मठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक या भागात आहेत.दासविश्रामधाम हा १२१ अध्यायांचा ग्रंथ कल्याण स्वामींच्या शिष्य शाखेमध्ये लिहिला गेला.ती परंपरा पुढील प्रमाणे समर्थ रामदास स्वामी ->श्री कल्याण स्वामी ->श्री शिवराम स्वामी आपचंदकर->श्री रामचंद्र स्वामी->आत्माराम स्वामी.
उपलब्ध माहितीनुसार काही शिष्यांची नावे :
- केशव स्वामी -उंब्रज मठ
- जगन्नाथ स्वामी - तडवळे मठ
- दिगंबर स्वामी
- नरहरी स्वामी
- पुरुषोत्तम स्वामी
- मुद्गल स्वामी, पट्टशिष्य - डोमगाव मठ उत्तराधिकारी
- रामजी बाबा -बारामती मठ
- शाम स्वामी
- शिवराम स्वामी(१)
- शिवराम स्वामी(२) -आपचंद मठ
- सामराज
- हरिबोवा भूमकर
- स्वामीदास-तेलंगसी मठ
कल्याण स्वामींच्या काही स्वतंत्र रचना
- महावाक्य पंचीकरण-अध्यात्मतत्त्वज्ञान विशद करणारे अभंगबद्ध प्रकरण
- रुक्मिणीस्वयंवर
- ध्रुव आख्यान
- सोलीव सुख
- दासगीता
- समर्थ कल्याण संवाद
- समर्थ कल्याण संवाद--२
- गणपती स्तवन
कल्याणस्वामींवरील पुस्तके
- दासविश्रामधाम या ग्रंथातील अध्याय क्र.११५ व ११६ मध्ये श्री कल्याण स्वामींचे चरित्र आहे.
- धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेने कल्याणस्वामींच्या जीवनावर व साहित्यरचनेवर समर्थशिष्य कल्याण' नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
- कल्याण स्तवन (कवी - रामचंद्रपंत पंत अमात्य)
- योगीराज श्रीकल्याणस्वामी (लेखक - सचिन जहागीरदार, शिवराम राजाराम ऊर्फ संजय रामदासी). सुयोग प्रकाशन, पुणे
- समर्थशिष्य योगिराज श्री कल्याणस्वामी चरित्र (हिंदी, लेखक सचिन अशोक जहागिरदार)
- श्री कल्याणस्वामी चरित्र (मराठी, लेखक - सुव्रतसुत)
डोमगावला जाण्याचे मार्ग
रेल्वेने पुण्याहून कुर्डूवाडी जंक्शन(जिल्हा सोलापूर ) येथे जावे व तेथून परांडामार्गे डोमगावला जाता येते.
संदर्भ ग्रंथ
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://www.prabodhankar.com/book/भाग-८३ मराठी मजकुर वेबसाईट पाहिले तारीख १३ जुलै २०१२
समर्थशिष्य कल्याण - संपादक : गणेश शंकर देव, सत्कार्योत्तेजक सभा, धुळे.
दासायन -श्री अनंतदास रामदासी
बाह्य दुवे
- ऐतिहासिक चित्रावरून रेखाटले कल्याणस्वामी
- dasbodh.com - Site dedicated to Dasbodh and Samarth Ramdas Swami (contains Dasbodh in various languages plus all the liturature of Samarth Ramdas Swami)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |