दासबोध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिस्रोत
दासबोध हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

दासबोध हा रामदासांनी १७व्या शतकात, त्यांचे पट्टशिष्य आणि लेखनिक कल्याणस्वामींकरवी लिहवून घेतलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील त्या काळात निबिड अरण्यात विसावलेल्या शिवथरच्या घळी शेजारच्या गुहेत लिहिला गेला.

रचना[संपादन]

दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.

समर्थांनी दासबोध दोनदा लिहिला. जुना २१ समासी दासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा २०० समासी दासबोध.. त्या जुन्या दासबोधाच्या आवृत्त्या बाबाजी अनंत प्रभु तेंडुलकर, आशिष करंदीकर, केशव जोशी, रा.शि. सहस्रबुद्धे, सुनीती सहस्रबुद्धे आदींनी संपादन करून प्रकाशित केल्या आहेत.

दासबोधाचे जन्मस्थळ[संपादन]

समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ शिवथघळ येथे बसून लिहिला. शिवथरघळ ही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाडपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. धुळ्याचे इतिहासतज्ज्ञ शंकर श्रीकृष्ण देव यांनी १९१६मध्ये झाडाझुडपांत लपलेली ही घळ शोधून काढली.

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे.[१] :-

भक्तांचेनि साभिमानें।कृपा केली दाशरथीनें।समर्थकृपेचीं वचनें।तो हा दासबोध॥श्रीराम॥
वीस दशक दासबोध।श्रवणद्वारें घेतां शोध।मनकर्त्यास विशद।परमार्थ होतो ॥श्रीराम॥
वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥
ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

दासबोधातील दशकांची नावे[संपादन]

 1. स्तवनाचा दशक
 2. मूर्खलक्षणांचा दशक
 3. स्वगुण परीक्षा
 4. नवविधा भक्ति
 5. मंत्रांचा दशक
 6. देवशोधन
 7. चौदा ब्रह्मांचा
 8. मायोद्भवनाम ज्ञानदशक
 9. गु्णरूप
 10. जगज्जोतिनाम
 11. भीमदशक
 12. विवेक वैराग्य
 13. नामरूप
 14. अखंड ध्याननाम
 15. आत्मदशक
 16. सप्ततिन्वयाचा दशक
 17. प्रकृतिपुरुष
 18. बहुजिनसी
 19. शिकवण
 20. पूर्णदशक


जुन्या दासबोधातील २१ समास[संपादन]

 1. मंगलाचरण
 2. रघुनाथध्यान
 3. वक्तृश्रोतृलक्षण
 4. सद्गुरुलक्षण
 5. सच्छिष्यलक्षण
 6. वैराग्यनिरूपण
 7. सगुणध्यान
 8. आत्मनिवेदन
 9. निरभिमानशांती
 10. विविध शिकवण
 11. प्रारब्ध प्रयत्‍न
 12. संतस्तवन
 13. मीपणनिरसन
 14. पूर्ण समाधान
 15. रघुनाथचरित्र
 16. गुरुशिष्यसंवाद
 17. दृश्य-उच्छेद
 18. एकंकारनिरसन
 19. सत्संगमहिमा
 20. शुद्धज्ञानावरण ऊर्फ अहंकार
 21. अनिर्वाच्य ब्रह्म

॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑

दासबोधावरील विविध भाषांतील ग्रंथ[संपादन]

मराठीत दासबोधाच्या अनेकांनी संपादित केलेल्या आवृत्ती आहेत, आणि दासबोधाचे गुणावगुण सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. खास दासबोधात वापरल्या गेलेल्या शब्दांचा एक शब्दकोशही आहे. अशा पुस्तकांची यादी. :-

 • दासबोध (लेखक : सूर्यकांत कुलकर्णी)
 • दासबोध (इंग्रजी, खंड १, २ - अनुवादक : शिवराज पाटील चाकुरकर)
 • दासबोध ऑफ समर्थ रामदास (इंग्रजी - लेखक : डी.ए. घैसास)
 • श्री दासबोध कणिका (लेखक : कमल जोशी)
 • दासबोध दशकसार (लेखक : अरविंद ब्रह्मे)
 • श्री दासबोध नित्यपाठ (लेखक : अरुण गोडबोले)
 • दासबोध : भावपराग (लेखक : पुरुषोत्तम नगरकर)
 • दासबोध (हिंदी-माधवराव सप्रे)
 • दासबोधाची कल्याणस्वामीकृत प्रत (शंकर श्रीकृष्ण देव)
 • दासबोधाचे मानसशास्त्र (लेखक : सुनील चिंचोलकर)
 • दासबोधातील कर्मयोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
 • दासबोधातील भक्तियोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
 • दासबोधातील ज्ञानयोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
 • दैनंदिन दासबोध (लेखक : माधव कानिटकर)
 • निवडक दासबोध (लेखक : रा.रा. जांभेकर)
 • मराठींत दासबोध (मनकर्णिका पब्लिकेशन)
 • मला दासबोधीच लाभेल बोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
 • मुलांचा दासबोध (लेखक : सुधा दीक्षित) * रामदास वचनामृत (लेखकः गुरुदेव रानडे)
 • रामदास : वाङ्मय आणि कार्य (न.र.फाटक)
 • श्रीमत् दासबोध (लेखक : डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख)
 • 'श्रीमत् दासबोधा'तील निवडक ३८५ सार्थ अमृतवचने (लेखक: यशश्री य. भवाळकर)
 • श्रीमत्‌ लक्ष दासबोध (शंकर धोंडो क्षीरसागर)
 • श्रीमंत दासबोध सार (लेखक : सुरेखा बापट)
 • श्रीमद् दासबोध - गद्यरूपांतरासहित - दशक १ ते ८ (कमलताई वैद्य)
 • श्रीसमर्थ रामदास वाङ्मय : शब्दार्थ संदर्भ कोश (मु.श्री. कानडे)
 • समर्थ रामदासस्वामीकृत दासबोध (स्वामी निश्चलानंद सरस्वती)
 • समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती (लेखक : डॉ. सुधीर निरगुडकर)
 • सार्थ एकवीरा समाधी - अर्थात्‌ जुना दासबोध (डॉ. सुनीती सहस्रबुद्धे)
 • सार्थ दासबोध (ल.रा. पांगारकर)
 • सार्थ श्रीदासबोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
 • सार्थ श्रीमत्‌ दासबोध (लेखक : प्रा. के वि बेलसरे)
 • सुबोध दासबोध (लेखक : डॉ. सी.ग. देसाई)

हे सुद्धा पहा[संपादन]

दासबोध.भारत==संदर्भ==

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. [१], समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...