Jump to content

"औरंगजेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 223.196.189.25 (चर्चा) यांनी केलेले बदल Rahuldeoke यांच्या आवृत्तीकडे पूर्वप...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४६: ओळ ४६:

== राजकीय कारकिर्दीची सुरुवात ==
== राजकीय कारकिर्दीची सुरुवात ==
१६३४ मधे [[शाहजहान]]ने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार [[दख्खन]]चा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते [[औरंगाबाद]] केले. इ.स.१६३७ साली औरंगजेबाने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. [[जहान‍आरा]] बेगम ही औरंगजेबाची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबाची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारी वरुन पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीँ. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. येथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान ([[अफगाणिस्तान]]) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.
१६३४ मधे [[शाहजहान]]ने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार [[दख्खन]]चा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते [[औरंगाबाद]] केले. इ.स.१६३७ साली औरंगजेबाने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. [[जहान‍आरा]] बेगम ही औरंगजेबाची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबाची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीँ. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. येथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान ([[अफगाणिस्तान]]) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.

=== सत्तासंघर्ष ===
=== सत्तासंघर्ष ===
ओळ ५२: ओळ ५२:

== मराठ्यांविरुद्ध युद्ध ==
== मराठ्यांविरुद्ध युद्ध ==
मुघल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे, आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा काल्पनिक दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
मुघल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे, आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा काल्पनिक दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

=== सुरतेची पहिली लूट ===
=== सुरतेची पहिली लूट ===
ओळ ५९: ओळ ५९:
=== मिर्झाराजे जयसिंहाची मोहीम ===
=== मिर्झाराजे जयसिंहाची मोहीम ===
इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.

आग्र्याहून सुटका
आग्ऱयाहून सुटका
=== शिवाजीची आग्र्‍यातील नजरकैद ===
=== शिवाजीची आग्र्‍यातील नजरकैद ===
इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.
इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

==सर्वत्र विजयी घोडदौड==
==सर्वत्र विजयी घोडदौड==
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. इ.स. १६७९ मध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या फौजेसह दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला. याच दरम्यान o3 एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्यानंतर संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. इ.स.१६८९ मध्ये संभाजीराजे यांना ठार मारले. २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजेबाच्या हाती काहीच लागले नाही.
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. इ.स. १६७९ मध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या फौजेसह दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला. याच दरम्यान एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्यानंतर संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. इ.स.१६८९ मध्ये संभाजीराजे यांना ठार मारले. २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजेबाच्या हाती काहीच लागले नाही.

औरंगजेब कडवा धर्मवेडा होता. त्याने अनेक हिंदूना जबरदस्तीने इस्लामचा स्वीकार करायला भाग पाडले. त्यातच दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्याला काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्मपरिवर्तनाच्या धोरणांमुळे औरंगजेबाच्या इस्लामकेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. त्यातच वृद्ध झालेल्या औरंगजेबाचा ३ मार्च, इ.स. १७०७ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मृत्यू झाला, त्याच्या निधनानंतर राजपुतांनी मोठी बंडाळी केली. औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की पेशव्यांना "अहमदिया" करार करून दिल्लीच्या आणि "शहेनशहाच्या" संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.
औरंगजेब कडवा धर्मवेडा होता. त्याने अनेक हिंदूना जबरदस्तीने इस्लामचा स्वीकार करायला भाग पाडले. त्यातच दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्याला काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्मपरिवर्तनाच्या धोरणांमुळे औरंगजेबाच्या इस्लामेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. त्यातच वृद्ध झालेल्या औरंगजेबाचा ३ मार्च, इ.स. १७०७ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मृत्यू झाला, त्याच्या निधनानंतर राजपुतांनी मोठी बंडाळी केली. औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की पेशव्यांना "अहमदिया" करार करून दिल्लीच्या आणि "शहेनशहाच्या" संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.

==औरंगजेबावरील मराठी पुस्तके==
==औरंगजेबावरील मराठी पुस्तके==
ओळ ७७: ओळ ७७:
* औरंगजेब : कुळकथा (लेखक : प्रा. रा.आ. कदम)
* औरंगजेब : कुळकथा (लेखक : प्रा. रा.आ. कदम)
* औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका (लेखक : रवींद्र गोडबोले)
* औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका (लेखक : रवींद्र गोडबोले)
* मराठे व औरंगजेब (लेखक : सेतु माधव पगडी ..
* मराठे व औरंगजेब (लेखक : सेतुमाधव पगडी)
* शहेनशहा (लेखक : [[ना.सं इनामदार]]). हिंदी रूपांतर शाहंशाह
* शहेनशहा (लेखक : [[ना.सं इनामदार]]). हिंदी रूपांतर शाहंशाह
* India of Aurangzeb : Topography, Statistics and Roads (१९०१) (लेखक : यदुनाथ सरकार)
* India of Aurangzeb : Topography, Statistics and Roads (१९०१) (लेखक : यदुनाथ सरकार)

==अौरंगजेब रोड==
नवी दिल्लीतील अौरंगजेब रोडचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम रोड करण्यात आले. (२९-८-२०१५)

{{मराठा साम्राज्य}}
{{मराठा साम्राज्य}}

२३:०१, २१ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

औरंगजेब
बादशाह
औरंगजेब कुराण पठण करताना, इसवी सनाच्या १८ व्या शतकातील अनामिक चित्रकाराने रंगविलेले चित्र
अधिकारकाळ १६५९-१७०७
पूर्ण नाव अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर
जन्म नोव्हेंबर ३, १६१८
दाहोद, भारत
मृत्यू मार्च ३, १७०७
औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
पूर्वाधिकारी शाह जहान
उत्तराधिकारी पहिला बहादुर शाह
वडील शहाजहान
पत्नी रबीया दुराणी, दिलरास बानो बेगम
संतती * पहिला बहादूर शाह, पुत्र
राजघराणे मुघल

औरंगजेब (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हा मोगल सम्राट होता. त्याने त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता.[ संदर्भ हवा ] गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारा तो पहला मुसलमान राज्यकर्ता होता.[ संदर्भ हवा ] त्याने आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्‍नांत घालवला.

राजकीय कारकिर्दीची सुरुवात

१६३४ मधे शाहजहानने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते औरंगाबाद केले. इ.स.१६३७ साली औरंगजेबाने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. जहान‍आरा बेगम ही औरंगजेबाची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबाची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीँ. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. येथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान (अफगाणिस्तान) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.

सत्तासंघर्ष

सन् १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला. त्याचा मृत्यू जवळ आला आहे असे वाटू लागले. दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगजेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते त्या शाह सुज़ाला औरंगजेबाकडून हार पत्करून बर्मायेथील अराकानक्षेत्री जावे लागले. १६५९ साली औरंगजेबाने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला; दारा शिकोहचा शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहाँला मारण्यासाठी औरंगजेबाने दोनदा विष पाठवले होते. पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहाँला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.

मराठ्यांविरुद्ध युद्ध

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे, आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा काल्पनिक दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

सुरतेची पहिली लूट

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.

मिर्झाराजे जयसिंहाची मोहीम

इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले. आग्ऱयाहून सुटका

शिवाजीची आग्र्‍यातील नजरकैद

इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

सर्वत्र विजयी घोडदौड

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. इ.स. १६७९ मध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या फौजेसह दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला. याच दरम्यान ३ एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्यानंतर संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. इ.स.१६८९ मध्ये संभाजीराजे यांना ठार मारले. २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजेबाच्या हाती काहीच लागले नाही.

औरंगजेब कडवा धर्मवेडा होता. त्याने अनेक हिंदूना जबरदस्तीने इस्लामचा स्वीकार करायला भाग पाडले. त्यातच दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्याला काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्मपरिवर्तनाच्या धोरणांमुळे औरंगजेबाच्या इस्लामेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. त्यातच वृद्ध झालेल्या औरंगजेबाचा ३ मार्च, इ.स. १७०७ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मृत्यू झाला, त्याच्या निधनानंतर राजपुतांनी मोठी बंडाळी केली. औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की पेशव्यांना "अहमदिया" करार करून दिल्लीच्या आणि "शहेनशहाच्या" संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.

औरंगजेबावरील मराठी पुस्तके

  • अकबर ते औरंगजेब (१९२३) : मूळ इंग्रजी लेखक विल्यम हॅरिसन मूरलँड (१८६८ - १९३८). मराठी भाषांतर राजेंद्र बनहट्टी
  • औरंगजेब : कुळकथा (लेखक : प्रा. रा.आ. कदम)
  • औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका (लेखक : रवींद्र गोडबोले)
  • मराठे व औरंगजेब (लेखक : सेतुमाधव पगडी)
  • शहेनशहा (लेखक : ना.सं इनामदार). हिंदी रूपांतर शाहंशाह
  • India of Aurangzeb : Topography, Statistics and Roads (१९०१) (लेखक : यदुनाथ सरकार)

अौरंगजेब रोड

नवी दिल्लीतील अौरंगजेब रोडचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम रोड करण्यात आले. (२९-८-२०१५)