विशेष लेख
|
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.
आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते. मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.
पुढे वाचा...
मागील अंक: ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक
मोबाईल ?
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
|
|
|
पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग
|
|
|
|
|
अलीकडील मृत्यू : सतीश कौशिक (९ मार्च २०२३), गिरीश बापट (२९ मार्च २०२३), तारिक फतेह (२४ एप्रिल २०२३), प्रकाशसिंग बादल (२५ एप्रिल २०२३), एस.पी. हिंदुजा (१७ मे २०२३), सुलोचना लाटकर (४ जून २०२३), गुफी पेंटल (५ जून २०२३)
|
|
२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरस (साथीचा रोग) च्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. राज्यात ४ एप्रिल २०२० पर्यंत ६३५ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले आहेत.
या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. भारतभर लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बसणे आवश्यक आहे. पर्यटनावर याचा मोठा परिणाम झालेला असून अजिंठा, वेरुळ, घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया यांसह राज्यभरातील पर्यटनस्थळांवरील गर्दी नाहीशी झाली आहे. होटेल, भाड्याच्या गाड्यांचे गिऱ्हाईकांनी आपल्या यात्रा बव्हंश रद्द केल्या आहे.
रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर राज्य सरकारने अनेक धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला. यात मुंबईतील सिद्धिविनायक, मुंबादेवी, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानीचे मंदिर, पुण्यातील दगडूशेट हलवाई गणपती, शिर्डीतील साईबाबा मंदिर यांसह अनेक मोठ्या यात्रास्थळांचा समावेश आहे.
राज्यातील ५० टक्के पेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. एमएमआर- पुणे जिल्ह्याचा पट्टा हा देशातील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावासाठी एक 'हॉटस्पॉट' बनला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ११ मार्चपासून अंदाजे २०,००० बसफेऱ्या रद्द केल्या तर भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातून निघणाऱ्या २३ गाड्या रद्द केल्या. याशिवाय मुंबई उपनगरी रेल्वेच्या सगळ्या फेऱ्या २२ मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या. यात मुंबई मेट्रोचाही समावेश होता. २२ मार्च होजी राज्य सरकारच्या आणि खाजगी सगळ्या बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या. तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाणाऱ्या लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी सीमेवर चार केंद्रे उभारली आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करुनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला दिलेली सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरु नये या साठी पोलिस यंत्रणा यंत्रणा झटत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात व्यस्त आहे. मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे व्यक्त केले.
(पुढे वाचा...)
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
- ...की, मराठी २६ जानेवारी, २०२० रोजी मराठी विकिपीडियावर एकूण ८,०२३ चरित्रलेख होते. यांपैकी २,३२६ म्हणजेच २८% लेख स्त्री चरित्रलेख तर उर्वरित पुरुष चरित्रलेख होते? इंग्लिश विकिपीडियावर हे प्रमाण १८% आहे.
- ...की, २८ जानेवारी, १९६८ ते ६ जुलै, १९६९ या दीड वर्षांत बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाच वेळा बदल झाले?
- ...की, बांगलादेश जगातले तिसरे सर्वात मोठे हिंदू राष्ट्र असून तेथील १,२४,९२,४२७ व्यक्ती हिंदू धर्म पाळतात?
- ...की, एरबस ए३४०-५०० प्रकारच्या विमानात प्रवास चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी विशेष कपाट असते?
- ...की इ.स. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये पोलंडमधील नाझी राजवटीच्या काळातील ऑश्विझ छळछावणीत विषारी वायूच्या चेंबरमध्ये कोंडून युध्दकैद्यांना ठार करणे थांबवले गेले.
वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.
|
|
|
मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
- "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
- येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
- विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
|
|
|
१०,००,०००+ : इंग्लिश
१,००,०००+ : हिंदी , उर्दू , तमिळ, बंगाली.
५०,०००+ : तेलुगू, मल्याळम.
१०,०००+ : नेपाळी, गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, सिंधी.
१,०००+ : संथाली, मैथिली, काश्मिरी.
संपूर्ण यादी
|
|
|
|
|