Jump to content

विकिपीडिया:दैनिक दिनविशेष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिनविशेष या पानावरून पुनर्निर्देशित)

११ मार्च दिनविशेष :

या तारखेच्या महत्वाच्या घटना:-

१८८६ :पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िया विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली

२०११ : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सुनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्युमुखी पडले.

जन्मदिवस / जयंती :

१९१६ : इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म. (मृत्यू : २४ मे १९९५)

१९१२ : नाटककार शं गो. साठे यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन :

१६८९ : ॵरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली.

१९७० : अमेरिकन लेखक आणि वकीलअर्ल स्टॅनले गार्डनर यांचा मृत्यू . (जन्म: १७ जुलै १८८९)

१९५५ : नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटलंड शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा मृत्यू. (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)