मल्लिका शेरावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मल्लिका शेरावत
Mallika Sherawat at Dasavathaaram release by IndiaFM.jpg
मल्लिका शेरावत
जन्म २४ ऑक्टोबर, १९७६ (1976-10-24) (वय: ४०)
रोहतक, हरयाणा,भारत


मल्लिका शेरावत (ऑक्टोबर २४, १९७६[१]) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. हीचे खरे नाव रीमा लांबा हे असून पडद्यावर मल्लिका शेरावत हे नाव वापरते. ही हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये बोल्ड भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचा पहिला प्रमुख चित्रपट ख्वाइश या चित्रपटात विक्रमी चुंबन दृश्ये चित्रीत केल्यामुळे चर्चेत आली व तेव्हापासून सतत चर्चेत राहिली. सध्या बॉलिवूडची अनभिषीक्त सेक्स सिंबॉल झाली आहे.[१][२]

सुरुवातीचे जीवन[संपादन]

तिचे खरे नाव रिमा लांबा असून चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वी ते मल्लीका शेरावत असे केले. शेरावत हे तिच्या आईच्या माहेरील आडनाव आहे तर मल्लीका सम्राज्ञी या अर्थाने वापरले. आईने केलेल्या मदतीमुळे आईचे आडनाव वापरते असे तिने सांगितले होते. तिने भारतीय तत्त्वज्ञान या विषयातील दिल्ली विद्यापीठाची पदवी मिळवली आहे. तिचे एकदा लग्न व घटस्फोट झाला आहे.

चित्रपटातील भूमिका[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका नोंदी
२००२ जीना सिर्फ मेरे लिये सोनिया रीमा लांबा या नावाखाली
२००३ ख्वाइश लेखा कोर्झुवेकर
२००४ किस किस की किस्मत मीना माधोक
२००४ मर्डर सिमरन सेहगल
२००५ बचके रहेना रे बाबा पद्मिनी
२००५ द माईथ भारतीय राजकन्या चीनी चित्रपट
२००६ प्यार के साईड इफ्केट्स त्रिशा
२००६ शादी से पहेले सानिया
२००६ ड‍रना जरुरी है
२००७ गुरु नर्तिका आयटेम गाण्यात खास भूमिका
२००७ प्रिती एके भूमी मेलिडे आयटेम गाणे
२००७ आप का सूरूर- द रियल लव्ह स्टोरी रुबी खास भूमिका
२००७ फौज मे मौज प्रदर्शन विलंबित
२००७ वेलकम इशिका
२००८ अनव्हेल्ड जाहिर
२००८ दशावतारम जास्मिन तमिळ भाषेत
२००८ अग्ली और पगली कुहू
२००८ मान गये मुघले आझम शबनम

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ Sariff, Faisal (June 5, 2003). 'Buying condoms on the wedding night was hilarious'. Rediff.com. Retrieved on November 18, 2007.
  2. Ten best Bollywood actresses of 2005. Rediff.com. Retrieved on November 18, 2007.