चर्चा:मुखपृष्ठ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू[संपादन]

@अभय नातू आणि V.narsikar: मुख्य पृष्ठावरील "अलीकडील मृत्यू" मध्ये नवे नाव नोंदवावे ही विनंती आहे. त्यातील सर्वात नवीन व्यक्तीचे पण आता वर्षश्राद्ध झाले आहे! इ.स. २०२० आणि इ.स. २०१९ सालांमधून काही नावे घ्यावी. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:२८, ७ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]

@Dharmadhyaksha: लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच हे करतो.

अभय नातू (चर्चा) ००:४६, ८ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]

बंगाली विकिपीडिया[संपादन]

@अभय नातू: बंगाली विकिपीडिया वर अलीकडेच १ लक्ष पेक्षा जास्त लेख तयार झाले आहेत. म्हणून कृपया मुख्य पानावरील ५०,०००+ मधून तिचे नाव काढून १,००,०००+ मध्ये जोडावे, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:१९, २९ डिसेंबर २०२० (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) २२:४९, ३० डिसेंबर २०२० (IST)[reply]

मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा[संपादन]

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा किरण राउत (चर्चा) १६:५४, २७ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

विशेष लेख बदलावा[संपादन]

मराठी विकिपीडीयाच्या मुखपृष्ठावरील विशेष लेख हा खुप दिवसांपासून तोच आहे, कृपया तो बदलाना--Omega45 (चर्चा) ००:०६, १ मार्च २०२२ (IST)[reply]

@Omega45: पुढील सदरासाठीचे उमेदवार लेख सुधारुन ते तयार करावेत.

अभय नातू (चर्चा) ०९:४९, १ मार्च २०२२ (IST)[reply]

... ...

आणि हे आपणास माहीत आहे का?[संपादन]

@अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, संतोष गोरे, Sandesh9822, Rahuldeshmukh101, Abhijitsathe, सुभाष राऊत, आणि V.narsikar:
"आणि हे आपणास माहीत आहे का?" ह्या सदरातील माहिती बराच काळ बदललेली नाही. नवीन लेखांमधली काही मनोरंजक माहिती जी सादर केली जाऊ शकते ती खालीलप्रमाणे आहे:

  1. ... की जवळपास ११ वर्षे पश्चिम बंगालच्या राज्यपालाचे पद सांभाळणाऱ्या पद्मजा नायडू ह्या सर्वाधीक काळ पदस्ठ असलेल्या महिला राज्यपाल होत्या?
  2. ... की १४ जुलै २०२३ रोजी, भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३च्या मदतीने, चंद्रयान ३ मोहीम प्रक्षेपित करण्यात आली ज्यामध्ये अंदाजे ३,९०० किलो भार होता?

धर्माध्यक्ष (चर्चा) १३:४८, २० जुलै २०२३ (IST)[reply]

नमस्कार, नजरेत आणून दिल्या बद्दल धन्यवाद. उपयुक्त माहिती आपण साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp येथे भरावी.
cc @अभय नातू
- संतोष गोरे ( 💬 ) ०९:१५, २४ जुलै २०२३ (IST)[reply]

विशेष लेख - हंपी[संपादन]

ह्या लेखात व मुखपृष्ठावर लिहीले आहे की "हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग १३० आणि ४९ च्या मध्ये असले तरी येथून कोणताही महामार्ग जात नाही."
राष्ट्रीय महामार्ग १३०राष्ट्रीय महामार्ग ४९ (जुने क्रमांकन) हे दोन्ही कर्नाटकामध्ये नाही. राज्य महामार्ग १३० (कर्नाटक) हा हंपी जवळून जातो. ४९ क्रमांकाचा कोणता मार्ग असेल हे मला माहित नाही. तरी ही चूक सुधारावी. धर्माध्यक्ष (चर्चा) २३:१८, १० नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

@Dharmadhyaksha:
गूगल मॅप्सवर पाहिले असता हे दोन महामार्ग दिसतात.
चित्र:हंपी-महामार्ग.png
हंपीजवळील महामार्ग
अभय नातू (चर्चा) २३:३७, १० नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
तरीसुद्धा शहानिशा होईपर्यंत मुखपृष्ठावरुन हा तपशील काढला आहे.
१३० क्रमांकाचा महामार्ग जो हंपी जवळ दिसतो तो कर्नाटाकातील राज्य महामार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग १३० नाही, जो छत्तीसगढ मधून जातो. तसेच ४९ क्रमांकाचा पण कर्नाटाकातील राज्य महामार्ग आहे; राष्ट्रीय महामार्ग ४९ नाही, जो छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल मधून जातो. तपशील न काढता "राष्ट्रीय महामार्ग" च्या ऐवजी "कर्नाटाक राज्य महामार्ग" असे लिहीता येईल. धर्माध्यक्ष (चर्चा) १२:५०, १६ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]