महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य शासन ही भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील सरकारी यंत्रणा आहे. या यंत्रणेचे निर्वाचित आणि नियुक्त असे दोन मुख्य भाग आहेत. राज्य संविधानानुसार लोकशाही मार्गाने निवडणूकांत जिंकलेले उमेदवार राज्याच्या मंत्रीमंडळाचा भाग असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर मार्गांनी नियुक्त झालेले अधिकारी व सेवकवर्ग हा शासनाचा दुसरा भाग आहेत.
विशेष लेख
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माणकरुन औद्योगीक व कृषी क्षेत्रास साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ८ ऑगस्ट १९५७ ला “ॲग्रिकल्चर प्रोडयूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६” अन्वये स्थापन झाले.सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२” पारित झाल्यानंतर, १९५६ चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे.
संरचना
महामंडळाचे भाग भांडवल - महाराष्ट्र शासन ५०% + केंद्रीय वखार महामंडळ ५०%
एकूण मंजूर भाग भांडवल - रु.१५.०० कोटी
प्राप्त भाग भांडवल - रु.८.७१ कोटी
वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ च्या तरतुदीप्रमाणे महामंडळ संचालक मंडळाच्या अखत्यारीत काम करते.
या संचालक मंडळात केंद्रीय वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन यांनी नामनिर्देशित केलेले प्रत्येकी पाच संचालक असतात.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान भवन) हे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे मुख्यालय असून महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांची अधिवेशने भरण्याचे नियमित स्थळ आहे. विधिमंडळाच्या मूळ संकल्पनेनुसार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात अधिवेशनांच्या माध्यमामधून महाराष्ट्र राज्याशी संबंधित अनेकविध विषयांवर कायदे केले जातात. याच विधिमंडळाच्या इमारतीत असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधान परिषद या दोन लोकतांत्रिक सभागृहांमध्ये राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पााला आकार दिला जातो तसेच जनतेशी निगडित विविध समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन त्यांचे निराकरण देखील करण्यात येते. विधिमंडळ अनेक महत्त्वाच्या विषयांवर अधिक अभ्यासपूर्ण चर्चा घडाव्यात या हेतूने त्या विषयांशी संबंधित समित्यांची स्थापना देखील करते. जनतेने आपल्यातून निर्वाचित करून शासनात आपले प्रतिनिधित्त्व करण्यासाठी पाठवलेले लोकप्रतिनिधी सामुदायिकरीत्या आपले जनतेप्रति कर्तव्य बजावण्याचे काम येथून करीत असल्यामुळे विधिमंडळाला यथार्थापणे 'लोकशाहीचे मंदिर' असे संबोधले जाते. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान नागपूर या वैदर्भीय शहरास प्राप्त आहे. त्यामुळे सन १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारा़न्वये [१] महाराष्ट्र विधिमंडळाच्या उन्हाळी, पावसाळी व हिवाळी या तीन अधिवेशनांपैकी हिवाळी अधिवेशन हे नागपूर या शहरातील महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या इमारतीत आयोजित केले जाते. महाराष्ट्र विधिमंडळाबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण इंटरनेटवरील या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
तुम्ही काय करू शकता
हे दालन महाराष्ट्र शासन, त्याचे अनेक विभाग आणि त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सरकारी तसेच निमसरकारी संस्थांबद्दलची माहिती पुरवते. यातील लेखांच्या विस्तारीकरणाचे व अन्य संबंधित कामांचे सहयोगी पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन हा विकिप्रकल्प चालवला जात आहे. या विकिप्रकल्पात सहभागी होऊन आपण अन्य उत्सुक सदस्यांच्या साथीने नवीन लेख तयार करू शकता, तसेच विस्ताराच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांमध्ये भर घालू शकता.
नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे आणि अधिक माहिती आणि मदतीकरिता विकिपीडिया:चावडी येथे भेट द्यावी.