दालन:इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Shrimanta sardar Marne deshmukh {Gambhir rao}

🚩श्रीमंत मारणे-देशमुख घराणे🚩

मारणे या पड़ नावाचा त्रोटक शब्दातील इतिहास अथवा अर्थ सांगायचा झाल्यास "मरण्याला आणि मारण्याला न भिणारेे " असा आहे. त्यांच्यातील या निर्भीड गुणांमुळेच साळुंखे सरदारांना मारणे हे पड़नाव चिकटवून गेले. मारणे यांचे पूर्वज असलेले साळुंखे सरदार हे परान्डा येथील भुईकोट किल्ल्याचे किल्लेदार असल्याचा इतिहास सांगितला जातो. तिथूनच पुढे या साळुंखे सरदारांना मारणे हे नाव चिकटल्याची आख्यायिका ऐकवली जाते.

समजलेली हकीकत अशी की, परांडा, जि. उस्मानाबाद येथील भुईकोट किल्ला हा राजा पुलकेशी चाळुक्य उर्फ साळुंखे यांनी सातव्या शतकात बांधलेला किल्ला आहे. पुढे योगायोगाने पंधराव्या शतकात याच चाळुक्य उर्फ साळुंखे राज वंशातील वंशज असलेले साळुंखे सरदार हेच परांडा येथील किल्ल्याचे किल्लेदार होते. मात्र त्यावेळी हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यातील एक किल्ला होता. आदिलशहा एकवेळ या भागात मोहीमेवर असताना, त्याने या किल्ल्याला भेट दिली.

मात्र आदिलशहा किल्ल्यावर भेटीस आल्यानंतर साळुंखे सरदारांनी त्याला हूजरा न घालता दोन राजे एकमेकांना भेटतात तसाच त्याच्याशी बर्ताव केला. साळुंखे सरदारांच्या अशा वागण्याने आदिलशहा मनातून खूप चिडला होता, पण काय करणार! मात्र हा प्रकार जिव्हारी लागलेल्या आदिलशहाच्या मनातील हा राग काही केल्या शमत नव्हता. आदिलशहाने हा राग मनात धरून पुढे काही दिवसांनी साळुंखे सरदारांना विजापूर येथे पाचारण केले.

आदिलशहाने साळुंखे सरदारांना विजापूर येथे पाचारण करण्यामागचा उद्देश एवढाच की, हे सरदार कितीच ताठर आहेत याचीच त्याला परीक्षा घ्यायची होती. त्यासाठीच आदिलशहाने साळुंखे सरदार जेथून घोड्यावरून त्याला भेटायला येतील, अगदी त्याच जागेवर धारदार तलवार बांधली होती. तलवारी जवळ येताना जर साळुंखे सरदार झुकला, तरच त्याची गर्दन तुटन्यापासून वाचेल.. अन्यथा ती तुटेल! अशी ती तलवार बांधलेली जागा होती.

म्हणजेच यावरून एक लक्षात येते, की साळुंखे सरदारांचे आगमन तलवारीजवळ होताच तो जर खाली मान झुकवणार असला, तरच त्याचा प्रवेश दरबारात होणार हे धुतल्या तांदळाप्रमाणेच सत्य होते. मात्र मान झुकवतील ते साळुंखे सरदार कसले? साक्षात मृत्यू समोर दिसत असतानाही साळुंखे सरदारांचे सात भाऊ एकामागून एक तलवार बांधलेल्या दिशेने निघाले. तलवारीजवळ आल्यावर पहिला भाऊ झुकला तरच त्याची गर्दन वाचणार होती, पण तो झुकला नाही आणि क्षणार्धात त्याची मान धडावेगळी झाली.

हे दृश्य पाहून दुसऱ्या भावाने तरी झुकावे ना, जीव तरी वाचला असता! पण मान झुकवणे रक्तातच नसल्याने तोही कटला! एकामागून एक साळुंखे सरदारांचे भाऊ कटत होते तसतसे आदिलशहाचे आनंदाचे भरते उधाणाला येत होते. हे पाहून दरबारातील साळुंखे सरदारांचे पाहुणे असलेल्या इतर मराठा सरदारांत मात्र रोषाची भावना उत्पन्न होत होती. एकामागून एक चार साळुंखे सरदार भाऊ तलवारीने कटल्यावर इतर मराठा सरदार पुढे आले आणि त्यांनी आदिलशहाला त्याच्या या कृतिचा विरोध करणे सुरू केले.

साळुंखे सरदारांचा वंश बुडवायचा आहे काय? असा सवाल जवळपास सर्वच मराठा सरदारांनी आदिलशहाला विचारताच तो भानावर आला! असे असेल तर आम्हाला सुद्धा आपल्या चाकरीत राहणे नको, अशा पवित्र्यातिल आक्रमक मराठा सरदारांना पाहून आदिलशहाने साळुंखे सरदारांच्या उर्वरीत भावांना अभय दिले. पुढे याच तीन साळुंखे सरदार भावांनी आदिलशाहीत राहून अनेक पराक्रमी इतिहास रचले.

त्यानंतरच्या काळात मारणे सरदारांनी मनगटाच्या जोरावर मावळच्या पुणे मुठा खोऱ्यातील खोपी, आंदगाव, माळेगाव, भोडे, लव्हार्डे, कोळावडे, वेगरे इत्यादी अठरा गावांची जाहागिरी (देशमुखी) मिळविल्याचा इतिहास आहे. मावळ खोऱ्यातील जी चोवीस देशमुख घराणी आहेत, त्यातील एक म्हणजे मारणे देशमुख हे एक घराणे आहे. विशेष म्हणजे, हा घडामोडीतला सर्व काळ शिवरायांच्या जन्मा पूर्वीचा आहे.

प्रतापगड युद्धावेळी श्रीमंत सरदार नरसिंहराव मारणे देशमुख यांनी भीमपराक्रम गाजवलेला इतिहास आहे. त्यांच्या या शौर्यामुळे शिवाजी राजांनी त्यांची पुतनी म्हणजे व्यंकोजी राजांची मुलगी अनसूया हिचा विवाह नरसिंहराव मारणे यांचेबरोबर लावून दिला होता. आणि चोळी बांगडी म्हणून गवंजी येथील जमीन भेट दिली होती. तसेच सरसेनापती उदोजी पवार आणि बडोदा संस्थानचे खंडेराव गायकवाड यांच्या कन्या देखील मारणे घराण्यात दिल्या होत्या.

साळुंखे घराण्याला रणांगणातील लढताना ज्या ऐतिहासिक 62 पदव्या मिळालेल्या आहेत, त्या पदव्यांपैकी एक म्हणजे मारणे घराण्याला मिळालेली 'गभिंरराव' ही एक पदवी आहे. शिवाय स्वराज्याचे धाकले धनी राजे शाहू महाराज यांच्या राजवटीच्या काळात देखील श्रीमंत सरदार भीमराव मारणे देशमुख यांना रणांगणावर लढताना वीरमरण आल्याचा इतिहास आहे.

By : Atharva Shailesh Marne {Deshmukh}, समस्त मारणे परिवार