विकिपीडिया:महिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:महि या पानावरून पुनर्निर्देशित)
People icon.svg

महिला प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .

सुयोग्य चित्र वापरा विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प
आणि
विकिपीडिया:महिला प्रकल्प
लघुपथ विपी:महि महिला प्रकल्पाकडे नेतो, लघुपथ विपी:स्त्री स्त्री अभ्यास प्रकल्पाकडे जातो.
लघुपथ:
विपी:महि
लघुपथ:
विपी:स्त्री
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
उद्देश[संपादन]

 1. विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व सधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात विकिपीडिया:महिला दालनःमहिला सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. साधारणतः स्त्री अभ्यास महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण,विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.

फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयही चालू शकतील अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.

 1. स्त्री अभ्यास
 2. विकिपीडिया:स्त्री अभ्यास

कार्यक्षेत्र आणि व्याप्ती[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

आकारास आलेले लेख[संपादन]

व्यक्तीरेखा[संपादन]

===== अहिल्याबाई होळकर =====
अहिल्याबाई होळकर (इ.स.१७२५-१७९५ ) यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्यातील चोंडी या गावी झाला. सुभेदार मल्हाररावहोळकर यांचा मुलगा खंडेराव याच्याशी इ.स. १७३३ मध्ये वयाच्या ८ व्या वर्षी तचे लग्न झाले.मल्हारराव होळकर यांनी तिला उत्तम मार्गदर्शन केले. त्यातूनच तिचे कर्तबगार जीवन घडले.इ.स. १७५४ मध्ये सुरजमल जाटबरोबरील युद्धात खंडेराव यांना मरण आले. खंडेराव यांच्या इतर बायका त्यांच्या बरोबर सती गेल्या परंतु मल्हाररावयांनी तिला तसे न करण्याविषयी सांगितले.व्यक्तिगत इच्छेपेक्षा प्रजेचे हित महत्वाचे मानून तिने आपल्या सासरयाननंतर जवळपास २८ वर्षे राज्यकारभार केला . तिच्या चारित्र्याने आणि कर्तृत्त्वाने तिने पर्जेमध्ये आदराचे स्थान मिळविले होते.
अहिल्याबाईनचे नाव आजही भारतात आदराने घेतले जाते. तिने संपूर्ण भारतभर देवळे,नद्यांचे घाट, व धर्मशाळा ,अन्नछत्रे निर्माण केली.मनीषा शेटे (चर्चा)भारतीय संस्कृती कोश-खंड १०

काम चालू असलेले लेख[संपादन]

येत्या "जागतिक महिला दिन" (८ मार्च २०१४) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०१४ उपक्रमाचे आयोजन करण्याविषयी[संपादन]

Women-edithoan-14.jpg

नमस्कार ,

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे अवचीत्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे. सर्व महिला सदस्यना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..! - राहुल देशमुख १३:४३, ७ मार्च २०१४ (IST)

विस्तारावयाचे प्रस्तावित लेख[संपादन]

पाहिजे असलेले लेख[संपादन]

 1. स्त्री अभ्यास

मासिक सदर (featured article) म्हणून निवडले गेलेले लेख[संपादन]

ती

    तिचं आणि त्याच काही तरी चालूय.... सगळ्या ऑफिसमध्ये गॉसिप उर्फ कुजबुजण चालू होतं. ती विवाहित आणि तोही. दोघही एकाच टीमचे सदस्य. त्यांचं बोलण, एकत्र कॉफी, जेवण घेणं, साऱ्यांनाच त्यांच्या एकत्र वावरण्यावर कारण नसताना विचार करायला लावणारं! ती आणि तो एकत्र दिसले म्हणजे नक्कीच ‘दाल मे कुछ काला है’ प्रकारचं फीलिंग येतं. आपल्या सध्या मराठीत सांगायचं तर काहीतरी ‘लफडं’ आहे यांचं असा(च) विचार मनात चमकतो. आपल्याला अशी कुणाची सोबत नाही म्हणून जळणारा एक गट तर स्वतःच्या कामात लक्ष देण्यापेक्षा इतरांच्या चांगल्या कामावर चिखलफेक करायची म्हणून अफवा पसरविण्यात धन्यता मानणारा दुसरा गट असं चित्र जवळपास सगळीकडे सर्रास दिसत. पण ती आणि तो यांच्यात आपल्या कामाचा चांगला समन्वय साधून उच्च दर्जाचं काम व्हावं यासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक मैत्री सोडून इतर कसलाही लवलेश नव्हता. हे असं काही आपल्या बौद्धिक क्षमतेपलीकडचं! ही अशी मैत्री आपल्याला मान्य नसतेच कारण तशी सवय आपल्याला नाही. या अशा सवयी नसणे ही आपली पारंपारिक सवय! असो. असं चित्र जिथं जिथं दिसत तिथं तिच्याबद्दल काय काय(नको ते) बोललं जातं. त्याच्याबद्दलही दुर्गंधी पसरवली जातेच. पण तरीही बदनामी जास्त तिचीच! मग समाज यातून धडा घेतो, तिच्यात आणि त्याच्यात फक्त ‘मैत्री’ असण अशक्य. असेल तर फक्त ‘भानगड’(‘प्रेम’ म्हणायला सुद्धा लोकांची जीभ चाचरते!) असा एकंदरीत स्त्री-पुरुष समानता मानणारा(दाखवणारा) आपला समाज! एकीकडे ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ म्हणजे ‘येथे नारी पूजनीय आहे’ अशी सुवचन उधळायची तर दुसरीकडे आपण शिव्यांची लाखोली कशा आणि कोणत्या प्रकारे वाहतो हा एक अभ्यासाचा विषय! हा विरोधाभास आपल्या देशातच शोभण्यासारखा!
   ती नाही म्हटली, मग फेका तिच्यावर अॅसिड, सोशल मीडियावर करा तिची बदनामी! याला खरचं ‘प्रेम’ म्हणता येईल का? तिला ‘फ्लर्ट’ करताना त्यानं त्याच्या मनातला वॉचमन जागा ठेवणं इष्ट! मुळात हे असं ‘फ्लर्ट’ करणं तुमची नैतिक पातळी आणि विचारांची खोली यांच निदर्शक. कारण असले उद्योग करणे म्हणजे खूप मोठा भीमपराक्रम, पुरुषार्थ गाजवणे नव्हे. खरा पुरुषार्थ आणि कर्तृत्व समजून घेण्यासाठी ज्यांच्या नावावर राजकारण करून स्वतःला मोठं सिद्ध केलं जातं, त्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करावाच! नुसत्याच त्यांची जयंती, पुण्यतिथी उत्सव धुमधडाक्यात साजरे करून त्यांचा पोकळ अभिमान मिरविण्यापेक्षा त्यांचे विचार अमलात आणले तर त्यांनाही बरे वाटेल. पण स्वतः कुठलेही कर्तृत्व न करता असा फुकाचा अभिमान मिरवणे केव्हाही सोपेच! त्यामुळे असा दिखावा करण्यातच आमची धन्यता! ती ‘उपभोगाची वस्तू’ नाही. तिला स्वतःचे विचार आहेत. तिच्या अस्तित्वाचा नको तिथे, नको तेव्हा, नको तसा खटकणारा वापर करणं कितपत योग्य? तुमचं आयुष्य तुम्हाला वाटेल तसं सुखी करण्यासाठी, तुमचं उत्पादन, तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी तिचा तिच्या मनाविरुद्ध आणि आक्षेपार्ह वापर करणार का?
   तिचा रंग, तिचं दिसण एकंदरीत तिच्या व्यक्तिमत्वावर प्रश्न उठवून चर्चा करण्याचा अधिकार कुणाला? जिथं ‘त्याच्या’कडून सांगितलं जातंय की ‘तिला’ आम्ही स्वातंत्र्य दिलंय. पण तिला स्वातंत्र्य कुणी दिलंय? त्याने? भारतीय राज्यघटनेनुसार तिला स्वातंत्र्य आहे..इतरांसारखच! जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्रच असते. फक्त स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये. पण आपण काचेच्या भिंती असलेल्या गुलामीत जगतोय, २१व्या शतकातही तिला हेच अजून कळत नाहीये, किंबहुना तिला अज्ञानात ठेवण्यातच आमची संस्कृती, परंपरा आणि आजची माध्यमं सुद्धा महानता मानते तेव्हा काय करायचं? ‘बाईच बाईची दुश्मन’ असं फसवं चित्र रंगवलं गेलय, पूर्वीपासून! मग घरोघरी चवीने पाहिल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये एकीकडे ती अगदी अशक्य कोटीतील आदर्श, सहिष्णू, घरंदाज आणि त्याच घरात दुसरी ती अगदी तिच्याउलट..कारस्थाने शिजवणारी. त्याचा एकाधिकार टिकून राहावा यासाठी हा सुरक्षा झडपेचा सिद्धांत हुशारीने वापरला जातोय; अगदी आजही! दुर्दैवाने हे ती लक्षात घेत नाही आणि जिला हे लक्षात येत, ती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला ‘आगाऊ’ हे विशेषण चिकटवलं जातं. तिने कितीही स्वतःला सिद्ध केलं तरी घरात त्याच्या आज्ञेनुसारच वागणे योग्य ठरविले जाते.
    तो कमवून आणतो, ती त्याच्या कृपेवर संसार करते, हे आपलं पारंपारिक चित्र. पण याउलटचं चित्र..ती कमवते आणि तो तिच्यासारखा संसार करतो.थोडक्यात ‘हाउस हजबंड’ होतो, हे समाजाला पचेल का? महिलांना आरक्षण....कायदे त्यांच्याच बाजूने,आमच्यावर अन्याय होतोय, हे एकांगी होतय!असं अजीर्ण झाल्यासारखं लोक बोलू लागलेत. पण आरक्षण, नोकरी, लग्न हे आताच्या काळातील तीव्र प्रश्न समाजरचना आणि परंपरा यांचा परिपाक आहेत. तिला मिळणारे कायद्याचे संरक्षण, आरक्षण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातय. पण तिच्या आरक्षणावर, तिच्या नावाखाली वेगळेच लोक कारभार करतात. मग महिला सबलीकरण फक्त कागदावर उरतं.
    तिने स्वतःला यशस्वीपणे सिद्ध केलय.. केवळ त्याच्यासाठीच ‘राखीव’ असलेल्या क्षेत्रातही ती वावरतेय, आत्मविश्वासाने! केवळ ‘बाई’ आहे म्हणून तिला वेगळी, सहानुभूतीची वागणूक देण्यापेक्षा तिला असुरक्षित वाटेल, तिच्या कर्तृत्वाला अडथळा निर्माण होईल असं वातावरण आपण का निर्माण करायचं? तिने कसे कपडे घातले म्हणजे तिच्यावर अन्याय होणार नाही यावर पांडित्य करण्यापेक्षा रानटी नराधमांना स्वतःच्या वासनांवर नियंत्रण ठेवायला शिकवलं तर मोठा बदल शक्य आहे. कारण इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे केव्हाही सोपेच! तिच्यावरच्या अन्यायाला जातीय रंग देण्यापेक्षा असं काही घडणारच नाही याची दक्षता घेणे इष्ट! अन्याय करणारा उजळ माथ्याने फिरणार आणि ती अपराध्यासारखी स्वतःला डांबून घेणार किंवा स्वतःला संपवणार..जो तिने केलाच नाहीये त्याची शिक्षा तिला का? किती काळ हे चालणार? हा महिला विरुद्ध पुरुष असा संघर्ष नसून तिला ‘व्यक्ती’ म्हणून स्वीकारण्याची धडपड आहे. तिला तिच्या आकाशात झेप घेण्यासाठी पाठिंबा देऊ शकत नसलात तरी हरकत नाही; मात्र त्यात अडथळा तरी होऊ नका. तिच्या स्वप्नांचा, अस्तित्वाचा स्वीकार मनमोकळेपणाने आपण करणार का?

हेसुद्धा पहा[संपादन]

साचे[संपादन]

वर्गीकरणे[संपादन]

प्रकल्प वर्गीकरणे[संपादन]

इतर प्रकल्पात[संपादन]

बाह्यदुवे आणि शोध[संपादन]

संदर्भ[संपादन]


नोंदी[संपादन]