हुंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हुंडा ही लग्नाच्या वेळी मुलाकडून किंवा मुलीकडून विरुद्ध बाजूच्या कुटुंबाला देण्यात येणारी भेट आहे. ही भेट पैसे, मालमत्ता किंवा वस्तू सोने स्वरूपात घेतला जातो.

भारतात हुंडा देणे किंवा घेणे बेकायदेशीर आहे.


हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१[संपादन]

- १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात पारित करण्यात आला.

-हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसर्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष चीजवस्तू , स्थावर, जंगम मालमत्ता देणे अगर कबूल करणे.

-लग्नात,लग्नापूर्वी अगर लग्नानंतर चीजवस्तू, स्थावर, जंगम मालमत्ता देण्याचे कबूल करणे म्हणजे हुंडा.

- यामध्ये शरियत कायद्याअंतर्गत येणाऱ्या मेहेरचा समावेश नाही.

- सदर कायद्याच्या कलम ३ नुसार हुंडा घेणाऱ्यास ५ वर्षें सक्त मजुरी आणि रु. १५०००/- पर्यंत दंडाची शिक्षा आहे.

- हुंडा मागणे हा देखील गुन्हा असून त्यासाठी ६ महिने पर्यंतची कैद आणि रु. १००००/- दंडाची शिक्षा आहे.