भारतीय मुस्लिम महिला आंदोलन
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
दि. ३ ते ५ ऑगस्ट २००७ या काळात रोजी पुण्यात एक राष्ट्रीय बैठक झाली. ही बैठक भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाची बैठक होती. देशभरातील सुमारे तीस मुस्लिम महिला प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होत्या.[१]
उत्तर प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान तसेच काश्मीर इत्यादी राज्यांमधून भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाला पाठिंबा मिळाला असून महिलांची सदस्यसंख्या वाढत आहे.
२००५ साली या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली होती. वेगवेगळया प्रांतांमध्ये मुस्लिम महिलांशी संपर्क करताना रझिया पटेल, झकिया गौहर नूरजहॉं, सफिया नियाझ तसेच नाईश हसन यांना असे आढळून आले की, मुस्लिम महिलांचे प्रश्न केवळ बुरखा आणि तलाक इतकेच नसून त्या पलीकडील आहेत.
शिक्षण, सुरक्षा, रोजगार आणि कायदे हे प्रश्न तर मुख्यत्वे करून आहेतच शिवाय धर्माची परिभाषा करायचा अधिकार मिळणे, समाजाचे प्रतिनिधित्व करायचा हक्क मिळणे, मुस्लिम स्त्री नेतृत्व पुढे येणे हे देखील तिचे मुद्दे आहेत.[२]
अंतर्गत पुरुषशाही आणि धर्ममार्तंडांशी मुस्लिम स्त्रीला तिला लढायचे आहे, त्यातून शाहबानो, इमराना, गुडिया घडत राहतात, तर दुसरीकडे `समाजासाठी तिला लढायचे आहे. एकीकडे ती `मायनॉरिटी विदिन मॉयनारिटी' आहे तर दुसरीकडे तिचे स्वतःचे प्रश्न आहेत. समाज आणि स्वतःच्या समाजाची स्थिती यापेक्षा वेगळे प्रश्न असू शकत नाहीत.
अंतर्गत पुरुष प्रधानतेशी लढताना बहुसंख्याक समाजातील सांप्रदायिकतेवर आणि पुनरुज्जीववादावर मुस्लिम स्त्रीच्या प्रश्नांचा वापर तिच्याच समाजाविरुद्ध जेव्हा करत असतो, तेव्हा तिचा लढा गुंतागुंतीचा होतो. दुसरीकडे समाज प्रचंड प्रमाणावर मागे फेकला जाण्याचीही ती किंमत चुकवते. तिसरीकडे जागतिकीकरणाची किंमत चुकवणारी ती बनारसच्या धंदा बुडालेल्या विणकर कुटुंबातील स्त्री म्हणून समोर येते.
भारतीय मुस्लिम स्त्री म्हणून तिचे जे प्रश्न आहेत त्यात केवळ बुरखा आणि तलाक हे प्रश्न आणि केवळ आपल्या समाजातील पुरुषांविरुद्ध तिचा लढा इतकेच नसून, तिचा लढा जसा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे. या प्रश्नांवर लढा उभारून मुस्लिम महिला आज समाजाचे केवळ प्रतिनिधित्वच करण्याचा प्रयत्न करत नाहीत, समाजाच्या केवळ भावनिक प्रश्नांचं राजकारण करणाऱ्या सामाजिक, धार्मिक नेतृत्वालाच केवळ नाही, तर संसदेपर्यंतच्या नेतृत्वालादेखील प्रश्न करत आहेत.[३]
भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाची बांधणी गावपातळी ते तालुका, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्नीय या स्वरूपाची असून, भारतीय घटना हा आधारभूत घटक आहे.
हे स्वरूप बघता रचनात्मक आणि संघर्षात्मक, खालून वर तसेच सामाजिक आणि राजकीय अशा स्वरूपात आंदोलनाची बांधणी आहे असे दिसते.
पुण्याला झालेल्या राष्ट्नीय बैठकीत मुस्लिम महिलांचे मुस्लिम म्हणून असलेले प्रश्न, अल्पसंख्याक म्हणून असलेले प्रश्न, तसेच प्रांतनिहाय प्रश्न असे वेगवेगळया स्वरूपात समोर आले.
संदर्भ
[संपादन]- ^ http://www.miloonsaryajani.com/node/70 Archived 2010-06-30 at the Wayback Machine. ची कॅश आहे. 19 Oct 2009 16:26:57 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
- ^ http://www.miloonsaryajani.com/node/70 Archived 2010-06-30 at the Wayback Machine. ची कॅश आहे. 19 Oct 2009 16:26:57 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
- ^ http://www.miloonsaryajani.com/node/70 Archived 2010-06-30 at the Wayback Machine. ची कॅश आहे. 19 Oct 2009 16:26:57 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.