विकिपीडिया:धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


आपण केवळ एखाद्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवल तर केवळ तसाच प्रश्न पुन्हा आला तरच ते उत्तर उपयोगात आणता येऊ शकते.पण क्रिटीकल थिंकींग अथवा (चिकित्सक/चिकित्सामक) विचार शिकलो तर अनेक समस्यांची उत्तरं शोधण सुलभ होतं.

चिकित्सामक विचार करताना, उपलब्ध माहितीचे अधिक आपल्या विचारांचे पद्धतशीर मुल्यमापन करण्याकरीता, वैविध्यपुर्ण संबंधीत बौद्धीक कौशल्यांची जरूरी असते जसे की: विश्लेषण, संकल्पनीकरण, व्याख्या निश्चिती,परिक्षण,अनुमान,ऐकणे,प्रश्न विचारणे,तर्क/युक्तीवाद/विधान मांडणी,संश्लेषण (सिंथेसीस) इत्यादी.

जेव्हा आपण विचारकर्ते म्हणून आपल्या स्वतःच्या क्षमता तपासून पहाण्यास तयार आणि सक्षम असतो आणि आपल्या दुर्बलता आणि समस्या स्विकारतो तेव्हा आपल्याला स्वतःची विचार करण्याची पद्धत परिष्कृत होण्यास मदत होते.म्हणजे मग आपण माहितीची पडताळणी आणि विचार अधिक व्यापक करण्यास शिकतो आणि उणीवा यूक्त कल्पना आणि आयडीऑलॉजीज ओळखून नाकारण्यास अधिक सक्षम होतो.

चिकित्सामक विचार म्हणजे खूप विचार करणे नव्हे . एखादी व्यक्ती खूपशी बौद्धीक शक्ती चुकीचा विचाराच्या समर्थनात/बचावात अथवा अशा चुकीच्या प्रश्नाच्या शोधाकरता खर्ची घालू शकते, की ज्या प्रश्नास समस्येची उकल होण्यात प्रगती होण्यापूर्वी संबंधीत प्रश्नाच्या पुर्नरचनेची गरज असू शकते.जसे की, समस्येची उकल होण्यासाठी कदाचित 'कोण' पेक्षा 'कसे' हे अधिक महत्वाचे असू शकते.


आपण आपल्या विचाराच्या पद्धतीतले दोष आणि कल(बायस) ओळखले नाही तर ती चिकित्सामक विचार पद्धती ठरत नाही. आपल्यात संगोपनातून आणि संस्कृतीतून आपल्या विचारसरणीत अंगिकारले गेलेले कल(बायस) लक्षात घेऊन ते कमीत कमी करण्यासाठी, आपल्यात, विचार करण्यात अधिक चांगला असण्याची इच्छा आणि इच्छाशक्ती असणे आवश्यक असते.मनात बाळगलेले पुर्वापार विश्वास नाकारले जाणार असतील तरी त्याची तयारी ठेवत, वस्तुस्थितीशी मेळ खाणारे पुरावे आणि ज्ञान मिळवणे आणि त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण करण्याची तयारी असली पाहीजे.वस्तुस्थितीशी मेळ खाणार्‍या पुराव्यांनी आणि ज्ञानाने आपले विश्वास निराधार असल्याचे सिद्ध केले तर वस्तुस्थितीतील फरक स्विकारणे हीच योग्य प्रतिक्रीया ठरते.

चिकित्सामक विचारकर्ते जिज्ञासूपणा,दृष्टीकोण व्यापक करण्याची आणि आपल्या ज्ञानाचा परीघ विस्तारण्याची उत्कंठा जोपासतात.संबंधीत विषयाबद्दल योग्य माहिती करून घेण्याच्या दिशेने कार्यरत असतात.

'एक्सप्लनेशन मस्ट बी वर्दी ऑफ सिरीयस कंसीडरेशन'.योग्य सिद्धांत स्वतःचा पराभव स्विकारण्याची स्थिती उघडरित्या डिफाईन करतो.क्रिटीकल थिंकींग शंकेखोरपणा स्विकारते, असा शंकेखोरपणा म्हणजे संकल्पनांना स्वैरपणे लाथाडणे नव्हे तर आपण ज्या दाव्यांचं प्रतिनिधीत्व करतो त्या बाबत निरसन होई पर्यंत निर्णयास स्थगिती देण्याची तयारी, जेणे करून सुयोग्य नसलेले दावे आपण जसेच्या तसे स्विकारणार नाही तर त्यांना समजून घेण्यास वेळ देणे, त्यामागचे कार्यकारण, गृहीततत्वे कल (बायसेस) पडताळणे.कार्यकारण हे सुस्पष्ट साधार सुसंगत तर्कावर आधारीत हवे, न की भावना अथवा सामाजीक दडपणाने प्रभावीत झालेले.कारण, वस्तुनिष्ठ दाव्यांची सत्यता, त्याच्याशी निगडीत भावनांनी अथवा एखादा समूह विश्वास ठेवतो म्हणून ठरत नाही.

काही लोक वस्तुनिष्ठता आनि सुयोग्य कार्यकारण सुसंगत तर्क ह्या केवळ मानवी संकल्पना आहेत असे सांगत. 'रिझन हॅज नो व्हॅल्यू'(कारणास काहीच मुल्य नाही.) असे म्हणून त्याचे महत्व कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, पण, असे करणे म्हणजे शेखचिल्ली प्रमाणे 'आपण ज्या फांदीवर बसलो आहोत तीच कापत आहोत' अशी आत्मघातकी क्रिया करणे होय. ते सुयोग्य कार्यकारण नाकारण्याची त्यांची भूमीका जर सुयोग्य कार्यकारण असेल तर तीही नाकारली जात आहे, हे लक्षात घेतले जात नाही.ज्याच्या बळावर तुम्हाला भूमीका मांडावयाची तीच तुम्ही नाकारत आहात असा त्याचा अर्थ होतो .


कार्य मोठे असो अथवा नगण्य,आपण दैनंदीन जीवनात कार्य करताना, चांगल्या निर्णयक्षमतेकरीता सुसंगत तर्काची नितांत आवश्यकता असते. आपल्या युक्तीवादात उणीवा असतील तर आपली समजून घेण्याची क्षमता कशाने वाढेल ? सुसंगत तर्कांना नाकारल्याने की आपल्या स्वतःच्या उणीवा प्रामाणिकपणे अभ्यासण्याने ?; पुरावे आणि सुसंगत तर्कांबद्दल अनादर,ऐकण्याची मनस्थिती नसणे,बौद्धीक आळस, अथवा बौद्धीक मग्रूरी असे स्वभावदोष चिकित्सामक विचारप्रक्रीयेच्या क्षमतेत गंभीर अडथळे आणतात.

जटील समस्या सोडवण्यातील मोठ्या अडथळ्यातील एक म्हणजे, समस्यांकडे केवळ काळ्या किंवा पांढर्‍या या दोन रंगांशिवाय पहाण्याची तयारी नसणे. असे लोक अधिक पर्याय उपलब्ध असतांना देखील त्यातील खरे तर आपल्याला हवा असलेला एकच पर्याय पाहू इच्छितात. दुसरा पर्यायाचा एकच गट केलेला असतो तो म्हणजे अस्विकार्ह पर्यायांचा .हे उपलब्ध पर्यांयांना चुकीच्या पद्धतीने दुभागणे असते.

चुकीच्या दुभाजनाची निष्पत्ती चुकीच्या निष्कर्षात होते. 'जर पर्याय 'अ' चुकीचा असेल तर पर्याय 'ब' बरोबर असलाच पाहीजे.' ;एखाद्याचा दृष्टीकोण 'क्ष' नसेल तर तो 'ज्ञ' असलाच पाहीजे.

केवळ काळ्या किंवा पांढर्‍या दोनच रंगांशिवाय इतर पर्याय विचारात घेण्याबद्दल अनिच्छा अथवा नकारार्थी दृष्टीकोणामागे बहूधा , समस्येस निश्चित एकमेव उत्तरांचा अभाव आणि समस्येतून उद्भवणारी अनिश्चित संदीग्ध स्थिती हाताळण्यातील अक्षमता ही संभाव्य कारणे असतात.एखादी गोष्ट स्पष्ट अथवा माहित नसण्यातून येणारी संदीग्धता अथवा अनिश्चितीते बद्दल असंयम उणीवयुक्त निष्कर्शाप्रत पोहोचण्याची घाई हि सत्याप्रती असलेल्या उत्सुकतेचा भाग नसून कम्फर्ट हवी असल्याने हा उताविळपणा घडतो.


चिकित्सामक विचारकर्त्याची वैशिष्ट्ये म्हणजे तो अनिश्चितता हाताळू शकतो.आपल्याला कोणत्या भागाबद्दल काय माहित नाही हे माहित करून घेण्यास प्राधान्य देतो.ते ग्राह्य पुराव्यांकरता आणि ग्राह्य पुराव्यांवर आधारीत उत्तराची वाट पहाण्याची तयारी ठेवतात.

चिकित्सामक विचार प्रत्येकाच्या स्वतःच्या बौद्धीक स्वातंत्र्याची गुरूकिल्ली आहे.प्रश्नाच्या सर्व बाजू समजून घेण्यास आणि स्वतःची स्वतः उकल करण्यास मदत करतो. चिकित्सामक विचार प्रक्रीया आपल्याला अविचारी निश्कर्ष,गूढवादाकडे झूकणे,इतरांकडून मिळालेला शहाणपणा (विसडम),अधिकार,परंपरा या बद्दल प्रश्न उपस्थित न करण्याच्या प्रवृत्ती,इत्यादी पासून दूर नेतो.

चिकित्सामक विचार बौद्धीक शिस्त ,संकल्पनांची सुस्पष्ट अभिव्यक्ती,स्वतःच्या विचारांबद्दल स्वतः जबाबदारी घेण्याची वृत्ती अंगिकारण्यात साहाय्यभूत ठरतो. असे समाज ज्यातील व्यक्ती चांगल्या ज्ञान आणि सुसंगत तर्कांचा वापर सर्व क्षेत्रात करतात आणि स्वत:च्या विचारातील विसंगती आणि उणीवा स्विकारून दूर करण्यात तत्पर असतात, ते आपल्यापुढील आणि सहजीवनातील आव्हानांना सखोल आणि परिणामकारक उत्तरे शोधण्यात अधिक सूसज्ज असतात.

आपण जेव्हा तर्क सुसंगत चिकित्सामक विचार करण्यास प्रोत्साहन देतो आणि शिकवतो तेव्हा आपण व्यक्तींना सक्षम करतो आणि समूदायाच्या चांगल्या भविष्यात गुंतवणूक करत असतो.


येथून खाली अजून थोडे लिहून पहा[संपादन]

  • उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::::::>::::::::::>::::::::::::>::::::>::::::::>::::::::::::::>:::::::::::::१) इथे उजव्या कोपऱ्यातटिचकी मारा (क्लिक करा)
  • उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::::::>::::::::::>::::::::::::::::::::::::२अ) या उजव्या कोपऱ्यात,इथेवर किबोर्डचे अतीछोटे चित्र येईल त्यावर क्लिककरा
  • उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::>२ब) हे वाचताना क्लिक करण्याच्या आत चित्रचिन्ह गेले तर पुन्हा क्लिक करा,आठवणीने चित्रचिन्हावर क्लिककरा
  • उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::>:::::>::::::::::>:::::::::::: ३) आणि मग अक्षरांतरण पर्याय निवडा,इन्स्क्रिप्टची सवय असल्यास मराठी लिपी निवडा


    • हि ":>:" बाण चिन्हे तुमचे उजवी कडे लक्ष जावे आणि चिन्हावर चटकन टिचकी मारता यावी म्हणून उजवी कडे टिचकवण्यास सांगते.टायपींग साठी या :>: बाण चिन्हांची आवश्यकता नाही.
    • कंट्रोल + एम ने सुद्धा मराठी निवडू शकता; अथवा आपण आपल्या आवडीची इतर युनिकोड टंकन पद्धती वापरू शकता.


  • मराठीत लिहिणे जमले नाही तर :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::४)तुमची नेमकी कन्फ्युजन्स आम्हाला सांगा

येथून खाली अजून थोडे लिहून पहा[संपादन]