विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण
Appearance
(विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण या पानावरून पुनर्निर्देशित)
वर्ग
[संपादन]वर्ग (Category) हे विविध लेखांचे विषयानुरूप वर्गीकरण करण्याकरता पाडलेले विभाग आहेत. मराठी विकिपीडियावरील सर्व वर्गांची यादी येथे दिली आहे. वर्गांचा शाखाविस्तार येथे पाहता येईल.
मराठी विकिपीडियावरील सर्वोच्च वर्ग मूळ हा असून, त्याच्या शाखांमध्ये इतर सर्व वर्ग विभागले आहेत.
अधिक विशेष माहितीकरिता उजवीकडील सुचालन साचातून उपपाने अभ्यासा.
उद्देश
[संपादन]- वाचकांना लेख विषयानुरूप सुलभतेने शोधता आणि वाचता येणे.एखादा विषय एका पेक्षा अधिक लेखातून अथवा वाचकाच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या नावाने असेल तर ते त्या विषयास अनुलक्षून असलेल्या वर्गीकरणात किंवा उपवर्गात शोधता येणे.
- एकाच लेखविषयाची वेगवेगळ्या ठिकाणी अथवा वेगवेगळ्या नावाने होऊ शकणारी पुनरूक्ती टाळणे व नि:संदिग्धीकरणास सहाय्यभूत ठरणे.
- एकाच विषयास अनुसरून असलेल्या लेखात एकजिनसीपणा आणणे
- विषय गटानुसार लेखांत लेखन योगदान तसेच मुल्यमापन करू इच्छिणार्या व्यक्तींना विषयानुरूप लेख शोधता येणे.
- एखाद्या विषय गटास/वर्गवारीतील लेखात योगदान करणार्या व्यक्तींमध्ये समन्वय साधण्याकरिता विशेष विकिपीडीया प्रकल्प उपलब्ध नसेल तर तसा समन्वय संबधीत वर्गपानाच्या चर्चा पानावरून साधण्याचा प्रयत्न करणे.
- वर्गवारीतील एखादा लेख प्रमूख लेख असेल तर त्या बद्दल निर्देश करणे.
प्रस्ताव
[संपादन]- प्रस्तावित वर्गशाखाविस्तार - वर्गीकरणासाठी प्रस्तावित शाखाविस्तार येथे लिहावा.
आढावा
[संपादन]| दिनांक | अवर्गीकृत वर्ग | न वापरलेले वर्ग | पाहिजे असलेले वर्ग | अवर्गीकृत पाने | अवर्गीकृत चित्रे |
|---|---|---|---|---|---|
| ऑगस्ट, २००९ | ३४२ | ६७२ | ३३२४ | ३८४ | १,६२४ |
