Jump to content

विकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडिया समुदायाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत महिला स्वास्थ्य या विषयावर संपादन अभियान राबविले जात आहे. हे अभियान एका राष्ट्रीय अभियानाचा भाग आहे. सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या-त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी होत आहेत. यानिमित्ताने विविध भारतीय भाषा आणि मराठी विकीवर महिला संपादकांची संख्या वाढावी असाही हेतू आहे. या अभियानाच्या कालावधीत महिला स्वास्थ्यविषयक लेखांची भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते वर्ग/उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे इ. कामे करण्याचे योजले आहे. लेख लिहिण्यासाठी आवश्यक अशा संदर्भ संसाधनांची तपशीलात यादीसुद्धा केली जाईल, जेणेकरून विश्वसनीय, उचित व योग्य संदर्भ संपादकांना सहज उपलब्ध होऊ शकतील.

या कालावधीत विविध ठिकाणी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्याची योजना आहे.यामधे महिला संपादकांना प्रोत्साहन देणे, त्यांना या व्यासपीठाचा परिचय करून देणे, स्त्री अभ्यास या विषयावर काम करीत असलेल्या तसेच अभ्यासक व्यक्तीना मराठी विकीवर संपादन करण्यास प्रोत्साहन देणे असा या कार्यशाळांचा हेतू आहे.

या विषयावर अनेक व्यक्ती, संस्था विविध भागात काम करत आहेत. त्यांनी तयार केलेले प्रशिक्षण साहित्य, फिल्म्स, पुस्तके इ. विकिस्रोत या मुक्त ग्रंथालयासाठी मिळविण्याचा प्रयत्न आहे. तसेच विषयाशी संबंधित छायाचित्रे, चित्र पट्टीका, इ. लेखात वापरण्यासाठी विकिमिडिया कॉमन्सवर मुक्त परवान्याखाली उपलब्ध करण्याचे आवाहन करत आहोत.

ठळक विषय[संपादन]

महिलांचे स्वास्थ्य या विषय लेखांचे संपादन होत असताना ते सामान्यत: पुढील तीन विभागात नोंदविले जाईल. त्यासाठी आवश्यक वाटल्यास नवीन वर्ग आणि उपवर्गांची निर्मिती केली जाईल.

 • महिलांचे शारीरिक स्वास्थ्य
 • महिलांचे मानसिक स्वास्थ्य
 • महिलांचे सामाजिक स्वास्थ्य

कालावधी[संपादन]

 • सोमवार १ ऑक्टोबर ते बुधवार ३१ ऑक्टोबर २०१८

कार्यशाळा[संपादन]

 1. महिला स्वास्थ्य संपादन कार्यशाळा - ज्ञान प्रबोधिनी, पुणे - मंगळवार दि. ९ ऑक्टोबर २०१८, वेळ दु.१२ ते ४ ; स्थान : संत्रिका सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, सदाशिव पेठ, पुणे
 2. महिला स्वास्थ्य लेख संपादन कार्यशाळा - विज्ञान आश्रम,पाबळ - सोमवार दि.१५ ऑक्टोबर २०१८, वेळ दु.१२ ते ४ ; स्थान : विज्ञान आश्रम,पाबळ

विकिप्रकल्प[संपादन]

 1. विकिपीडिया:महिला
 2. विकिपीडिया:स्त्री अभ्यास

वर्ग आराखडा सूचना[संपादन]

उपवर्ग आराखडा सूचना[संपादन]

माहितीचौकट साचे[संपादन]

या अभियानातील लेखांशी निगडीत माहितीचौकट साचे याठिकाणी एकत्रितपणे उपलब्ध आहेत. योग्य ते साचे निवडून आपण ते वापरू शकता.

 1. मुख्य वर्ग - वर्ग:माहितीचौकट साचे

सध्या असलेले/नसलेले/सुधारणा करावयाचे लेख आणि सद्यस्थिती[संपादन]

महिलांचे शारीरिक स्वास्थ्य[संपादन]

 1. मासिक पाळी- विकिकरणाची आवश्यकता
 2. सॅनिटरी नॅपकिन्स- एका ओळीचा लेख
 3. अस्मिता योजना- अद्ययावत करण्याजोगा लेख
 4. स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया - विकिकरणाची आवश्यकता असणारा संदर्भरहीत लेख
 5. निरोध- विकिकरणाची आवश्यकता असणारा संदर्भरहीत लेख
 6. कुटुंबनियोजन - एका परिच्छेदाचा लेख, असायला हवा पण विस्तार व विकिकरणाची आवश्यकता
 7. संततीनियमन - विस्तार व विकिकरणाची आवश्यकता असणारा लेख
 8. संयुक्त गर्भनिरोधक गोळी - विकिकरणाची आवश्यकता असणारा लेख - संततिनियमनकडे पुनर्निर्देशित करावा
 9. गोळ्यांच्या साहाय्याने गर्भपात - दोन ओळींचा संदर्भविरहीत लेख
 10. स्तन - मानवी स्तनाविषयी आहे, असावा.
 11. स्तनग्रंथी - सर्व सस्तन प्राण्यांच्या स्तनाविषयी असावा
 12. स्तनमंडल – "स्तन" कडे पुनर्निर्देशित करावा
 13. स्तनाग्र – "स्तन" कडे पुनर्निर्देशित करावा
 14. शुक्रजंतू- तीन ओळींचा अपूर्ण आणि संदर्भरहित लेख
 15. स्त्रीबीज - पारिभाषिक शब्दांच्या सुसंगतीच्या दृष्टीने नाव बदलून "बीजांड" असे करावे.
 16. गर्भपात-विकीकरण आवश्यक असलेला लेख
 17. अवटु ग्रंथि(थायरॉईड) - एका परिच्छेदाचा संदर्भरहीत लेख
 18. प्रसूती - सुधारणा व विकिकरणाची आवश्यकता असणारा लेख
 19. सीजेरियन सेक्शन शस्त्रक्रिया - लेखाचे नाव सीझेरियन सेक्शन शस्त्रक्रिया असे हवे
 20. चिमटा वापरुन प्रसूती - तीन ओळी (इंग्रजीत आहे)
 21. व्हॅक्युम वापरुन प्रसूती - अपुरा, संदर्भाविना (इंग्रजीत आहे)
 22. जुळे- दोन ओळींचा अपूर्ण लेख - (इंग्रजीत आहे)
 23. पायाळू- दोन ओळींचा अपूर्ण लेख - (इंग्रजीत आहे)
 24. स्तनाचा कर्करोग- विकिकरणाची आवश्यकता असणारा लेख
 25. गर्भाशयाचा कर्करोग- एका ओळीचा लेख
 26. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग - विस्तार व विकीकरणाची आवश्यकता असणारा लेख, नावबदल - "गर्भाशयग्रीवेचा कर्करोग"
 27. कुपोषण - अतिशय छोटा लेख
 28. अर्धशिशी - अपुरा, संदर्भाविना (इंग्रजीत आहे)
 29. ऑटो इम्यून आजार - लेख नाही (इंग्रजीत आहे)
 30. लूपस - लेख नाही (इंग्रजीत आहे)
 31. वंध्यत्व
 32. तारुण्यपीटिका
 33. प्रघ्राणग्रंथी
 34. गर्भारपण (सध्या हा लेख गर्भारपणा या नावाने आहे. नाव बदलायला हवे. "गर्भारपण" हेच योग्य आहे. सुधारणाही आवश्यक.)
 35. पंडुरोग
 36. रजोदर्शन - (महिलांचे मानसिक स्वास्थ्य)
 37. स्थूलता
 38. एंडोमेट्रिओमा
 39. पॅप स्मिअर टेस्ट - लेख नाही (इंग्रजीत आहे)
 40. स्त्रियांमधील जननांग अंगच्छेदन
 41. सुंता
 42. अंडाशयचा कॅन्सर

महिलांचे सामाजिक स्वास्थ्य[संपादन]

 1. विवाह-विकिकरणाची आवश्यकता असणारा लेख
 2. घटस्फोट-एका परिच्छेदाचा संदर्भरहीत लेख
 3. पोटगी- अतिशय छोटा लेख
 4. बलात्कार-एका परिच्छेदाचा संदर्भरहीत लेख
 5. कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक (२०१२) - अपूर्ण लेख. हा व "विशाखा मार्गदर्शक तत्त्वे" या लेखांचे एकत्रीकरण
 6. विनयभंग- एका ओळीचा लेख
 7. लैंगिक शोषण
 8. विटाळ- विकिकरणाची आवश्यकता असणारा लेख
 9. सवाष्ण-विकिकरणाची आवश्यकता असणारा लेख
 10. विशाखा मार्गदर्शक तत्त्वे
 11. माहेर (संस्था) - विस्तार व विकीकरणाची आवश्यकता असणारा लेख / या लेखात नमूद केलेल्या तीन संस्थांवर स्वतंत्र लेख करणे शक्य
 12. लैंगिक शिक्षण - विस्तार व विकीकरणाची आवश्यकता
 13. पुनर्विवाह
 14. सामूहिक बलात्कार
 15. महिलांसाठीचे कायदे लेख आहे. विस्तार व विकीकरण आवश्यक
 16. पोक्सो कायदा
 17. सुकन्या समृद्धी योजना - विस्तार आवश्यक
 18. स्त्री सक्षमीकरण
 19. राष्ट्रीय महिला आयोग - विस्तार आवश्यक
 20. महिला व बाल कल्याण समिती
 21. ट्रिपल तलाक
 22. बुरखा पद्धत

महिलांचे मानसिक स्वास्थ्य[संपादन]

 1. रजोनिवृत्ती- विकीकरणाची आवश्यकता

सध्या नसलेले लेख[संपादन]

 1. धूम्रपान
 2. मद्यपान
 3. लैंगिक आरोग्य

लेखांची स्थूल वर्गवारी व लेखांतील मुद्द्यांचा आराखडा/साचे[संपादन]

लेख कोणत्या स्थूल गटात आहे हे निश्चित करावे. लेखाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या, या सारिणीतील, त्या गटातील मुद्द्यांच्या आधारे लेखाची रचना करावी. या मुद्द्यांनुसार व या क्रमाने लेखांची रचना केल्यास सुसूत्रता येईल, यथावकाश इतर संपादकांना नवीन भर घालत राहाणे सोयीचे होईल व लेखांना पूर्णत्व येण्याची प्रक्रिया चालू राहील. पुढील सारिणीत आवश्यकता वाटल्यास लेखाच्या नवीन वर्गांची व मुद्द्यांची भर घालावी. म्हणजे ही सारिणी सर्वांना उपयुक्त होईल.

गट क्र. क्र. शास्त्र संस्था शरीरातील अवयव रोग/विकार प्रक्रिया/क्रिया संकल्पना घटना
उदाहरणार्थ :- स्त्रीआरोग्यशास्त्र, प्रसूतीशास्त्र, पचनसंस्था, प्रजननसंस्था, चेतासंस्था गर्भाशय, बीजांड, स्तन, बीजांडकोश डेंग्यू ताप, मलेरिया, स्तनांचा कर्करोग मासिक पाळी, प्रसूती, गर्भपात, शस्त्रक्रिया लग्न, लैंगिकता, लैंगिक शिक्षण, गर्भनिरोधन लैंगिक छळ, बलात्कार, विनयभंग
साचा साचा साचा साचा साचा साचा साचा
प्रमुख आकृती प्रमुख आकृती प्रमुख आकृती प्रमुख आकृती प्रमुख आकृती प्रमुख आकृती प्रमुख आकृती
ओळख/प्रस्तावना ओळख/प्रस्तावना ओळख/प्रस्तावना ओळख/प्रस्तावना ओळख/प्रस्तावना ओळख/प्रस्तावना ओळख/प्रस्तावना
इतर प्राणी इतर प्राणी इतर प्राणी इतर प्राणी
मानव मानव मानव मानव मानव ठळक/प्रातिनिधिक घटना
रचना (शरीररचनाशास्त्र) रचना (शरीररचनाशास्त्र) कारणे व प्रसार व्याख्या व अर्थ व्याख्या व अर्थ व्याख्या व अर्थ
क्षेत्र / आवाका कार्य (शरीरक्रियाशास्त्र) कार्य (शरीरक्रियाशास्त्र) लक्षणे-चिन्हे लक्षणे-चिन्हे कार्य / प्रक्रिया आढळ/संख्याशास्त्रीय माहिती
विकास विकास शरीरविकृतीशास्त्रीय माहिती मूळ प्रक्रिया हेतू
महत्त्वाचे टप्पे महत्त्वाचे टप्पे कारणे
विभाग प्रकार प्रकार/पर्यायी प्रक्रिया/भिन्न प्रक्रिया प्रकार/पर्यायी प्रक्रिया परिणाम (समाविष्ट घटकांनुसार)
(अंतर्भूत) रोग रोग (थोडक्यात माहिती) रोग (थोडक्यात माहिती) आनुषंगिक प्रक्रिया आनुषंगिक प्रक्रिया
तपासणी तपासणी निदान नियंत्रण नियंत्रण
तपासण्या तपासण्या (सर्वसाधारण) व्यवस्थापन तपासण्या
उपचारपद्धती उपचारपद्धती उपचार उपचार उपचार उपचार
आरोग्य व काळजी आरोग्य व काळजी काळजी/प्रतिबंधक उपाय/सुरक्षिततेचे उपाय काळजी/सुरक्षिततेचे उपाय काळजी/प्रतिबंधक उपाय/सुरक्षिततेचे उपाय काळजी/प्रतिबंधक उपाय/सुरक्षिततेचे उपाय
गुंतागुंती/बिघाड गुंतागुंती/बिघाड गुंतागुंती/बिघाड
वैद्यकीय महत्त्व वैद्यकीय महत्त्व वैद्यकीय महत्त्व वैद्यकीय महत्त्व वैद्यकीय महत्त्व वैद्यकीय महत्त्व वैद्यकीय महत्त्व
प्रशिक्षण/विशेषज्ञता प्रशिक्षण प्रशिक्षण/विशेषज्ञता प्रशिक्षण प्रशिक्षण/विशेषज्ञता प्रशिक्षण
मानसिक महत्त्व मानसिक महत्त्व मानसिक महत्त्व मानसिक महत्त्व
सामाजिक महत्त्व सामाजिक महत्त्व सामाजिक महत्त्व सामाजिक महत्त्व सामाजिक महत्त्व सामाजिक महत्त्व सामाजिक महत्त्व
सांस्कृतिक महत्त्व सांस्कृतिक महत्त्व सांस्कृतिक महत्त्व सांस्कृतिक महत्त्व सांस्कृतिक महत्त्व सांस्कृतिक महत्त्व सांस्कृतिक महत्त्व
धार्मिक महत्त्व धार्मिक महत्त्व धार्मिक महत्त्व धार्मिक महत्त्व धार्मिक महत्त्व
कायदेशीर बाबी कायदेशीर बाबी कायदेशीर बाबी कायदेशीर बाबी
इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास
संशोधन संशोधन संशोधन संशोधन संशोधन संशोधन संशोधन
अधिक आकृती अधिक आकृती अधिक आकृती अधिक आकृती अधिक आकृती अधिक आकृती अधिक आकृती
हे पहा हे पहा हे पहा हे पहा हे पहा हे पहा हे पहा
बाह्य दुवे बाह्य दुवे बाह्य दुवे बाह्य दुवे बाह्य दुवे बाह्य दुवे बाह्य दुवे
संदर्भ संदर्भ संदर्भ संदर्भ संदर्भ संदर्भ संदर्भ

उदाहरणार्थ: -

प्रजननसंस्था हा लेख संस्था या गटातील मुद्द्यांच्या आधारे लिहिलेला असेल. या लेखात प्रजनन संस्थेत अंतर्भाव असलेल्या सर्व अवयवांची (उदाहरणार्थ - गर्भाशय) थोडक्यात माहिती (रचना व कार्य) असेल. प्रत्येक अवयवासंबंधी जास्त माहितीसाठी त्या अवयवाचा दुवा दिलेला असेल (मुख्य लेख - दुवा).

गर्भाशय हा लेख अवयव या गटातील मुद्द्यांच्या आधारे लिहिलेला असेल. (एखाद्या अवयवासाठी काही मुद्दे गैरलागू असल्यास वगळावे लागण्याची व काही मुद्यांची भर घालावी लागण्याची शक्यता.)

गर्भाशय:

 1. साचा: अवयव साचा (असल्यास). नसल्यास तयार करावा लागेल.
 2. प्रमुख आकृती: मराठीत शीर्षक व नावे दिलेली
 3. प्रस्तावना/सर्वसाधारण/ओळख:

 1. इतर प्राणी: उदाहरणार्थ पिल्लांना जन्म देणार्‍या प्राण्यांत गर्भाशय हा अवयव कशा प्रकारे आढळतो व त्याचे महत्त्व यांविषयी थोडक्यात माहिती. (पिल्लांना जन्म देणारे प्राणी हा वेगळा, त्याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख असेल.)
 2. मानव: मानवात गर्भाशय हा अवयव कशा प्रकारे आढळतो व त्याचे महत्त्व यांविषयी थोडक्यात माहिती.

 1. रचना: विस्तृत व संपूर्ण शरीरशास्त्रीय माहिती.
 2. कार्य: विस्तृत व संपूर्ण शरीरक्रियाशास्त्रीय माहिती
 3. शरीरविकृतीशास्त्रीय माहिती: विस्तृत व संपूर्ण माहिती (असल्यास)
 4. रोग: या अवयवाला होणार्‍या सर्व विकारांची व रोगांची (उदा.- गर्भाशयाच्या अनैसर्गिक रचना, गर्भाशयातील गाठी/अर्बुदे, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशयग्रीवेचा कर्करोग, गर्भाशय स्खलन, इ.) सर्वसाधारण, ढोबळ आणि थोडक्यात माहिती येथे असेल. सर्वसाधारण वाचकाला तेवढी पुरेशी आहे. विशिष्ट रोगाच्या जास्त माहितीसाठी त्या रोगावर (त्या रोगासाठी दुवा) वेगळा लेख असेल.
 5. तपासणी: सर्वसाधारण माहिती

 1. आरोग्य व काळजी:
 2. वैद्यकीय महत्त्व:
 3. प्रशिक्षण/विशेषज्ञता प्रशिक्षण: विशिष्ट अवयवासाठी वेगळी तज्ञता आवश्यक असल्यास (उदाहरणार्थ - डोळ्यासाठी नेत्ररोगतज्ञ) त्यासाठी प्रशिक्षण. गर्भाशयासाठी वेगळी तज्ञता आवश्यक नाही. ती तज्ञता स्त्री-आरोग्य तज्ञाकडे आहे.

 1. सामाजिक महत्त्व: असल्यास
 2. सांस्कृतिक महत्त्व: असल्यास
 3. धार्मिक महत्त्व: असल्यास
 4. इतिहास: असल्यास
 5. संशोधन: असल्यास

खालील चार मुद्दे सर्व लेखांसाठी आवश्यक आहेत

 1. अधिक आकृती:
 2. हे पहा:
 3. बाह्य दुवे:
 4. संदर्भ:

याप्रमाणे व या क्रमाने लेख लिहिल्यास महत्त्वाचे लेख आधी लिहिले जातील. इतर लेख महत्त्वाचे नाहीत असे नाही. पण प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी वरील सारिणी उपयोगी पडावी. उदाहरणार्थ "पॅप स्मीअर" हा लेख लिहिल्यास तो ज्यासंबंधी आहे (गर्भाशयग्रीवेच्या कर्करोगाच्या लवकर निदानासाठी चाळणी तपासणी) त्यासंबंधीच्या जादा माहितीसाठी (गर्भाशय, गर्भाशयग्रीवा, गर्भाशयग्रीवेचा कर्करोग, इ.) दुवे दिल्यावर तिथे पुरेशी माहिती उपलब्ध असायला हवी.

संदर्भ संसाधने[संपादन]

संदर्भ ग्रंथ[संपादन]

ऑनलाईन संदर्भ दुवे[संपादन]

 • आरोग्यविद्या - मराठी संकेतस्थळ - ह्या संकेतस्थळावरील सर्व माहिती ब्लोगसदृश्यस्वरुपात लिहिली गेलेली आहे त्यामुळे याचा वापर संदर्भासाठी करता येणार नाही.
 • लैंगिकतेवर बोलू या - मराठी संकेतस्थळ - ह्या संकेतस्थळावरील सर्व माहिती ब्लोगसदृश्यस्वरुपात लिहिली गेलेली आहे त्यामुळे याचा वापर संदर्भासाठी करता येणार नाही. फ़क्त काही भाषांतरीत लेखांना मूळ इंग्रजी लेखांचे किंवा पुस्तकांचे संदर्भ आहेत, त्या संदर्भांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत घेता येईल.
 • सेहत - इंग्रजी संकेतस्थळ - या संस्थेने केलेल्या अभ्यासांचे अहवाल आणि संशोधन प्रबंध नक्कीच उत्तम संदर्भ म्हणून वापरता येतील.
 • आलोचना संसाधन केंद्र - इंग्रजी संकेतस्थळ - जरी प्रत्यक्षात ह्या संस्थेने प्रचंड संशोधनाचे काम केलेले असले तरीही दुर्दैवाने संकेतस्थळावर काहीही उल्लेख नसल्याने जर प्रत्यक्ष जाऊन कुणाला संदर्भ वापराचे असतील तर आलोचना मधे आपल्या विषयासाठी भयंकर मोठा खजीना उपलब्ध आहे.
 • मासूम - इंग्रजी संकेतस्थळ - मासूमनेही अनेक महत्वाची प्रकाशने उपलब्ध केली आहेत त्यापैंकी ही काही आणि काही संशोधन प्रबंधही संदर्भ म्हणून उपयोगात आणता येतील.
 • सर्च,गडचिरोली - इंग्रजी संकेतस्थळ - यावरील आदिवासींच्या आरोग्यावरील, ध्येय धोरणांवरील , इतर विषयावरील संशोधन प्रबंध हे संदर्भ म्हणून वापरता येतील.
 • Museum of Menstruation and Women's Health - इंग्रजी संकेतस्थळ
 • या शिवाय जर आपण स्त्रोत शोधा साचा वापरून एखादा संशोधन प्रबंध किंवा पुस्तक शोधत असाल आणि ते तुम्हांला हवे असल्यास आपण आर्या जोशी किंवा सुरेश खोले यांना संपर्क साधू शकता. यांकडे अनेक संशोधन साहित्यांपर्यंत पोहोचण्याची सोय विकिपीडिया लायब्ररीच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

चित्रे,ध्वनी/चित्रफिती[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर उपलब्ध असलेली छायाचित्रे.

अभियान संपादन प्रगती फलक[संपादन]

 • अभियानाचा संपादन नोंद फलक
 • आपले नाव, योगदान व लेख वरील फलकातील Articles या विभागात दिसत आहेत न हे पहावे. नसल्यास चर्चा पानावर संदेश टाकावा.

अभियान समन्वयक[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

 1. आर्या जोशी (चर्चा) १९:५२, २० सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
 2. Pooja Jadhav (चर्चा) १९:५६, २० सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
 3. राजेंद्र प्रभुणे (चर्चा) ०९:०७, २१ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
 4. सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४८, २१ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
 5. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:२५, २२ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
 6. रोहिणी भगत (चर्चा) १५:०४, २५ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
 7. करिश्मा गायकवाड (चर्चा) १०:३२, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
 8. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:४०, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
 9. कल्याणी कोतकर (चर्चा) १६:०५, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]


संदर्भ[संपादन]