स्त्री अभ्यास
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्त्रीवादी परिप्रेक्षातून इतिहास, माध्यमे, समाज, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इ. क्षेत्रां | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
प्रकार | आंतरविद्याशाखीय, शैक्षणिक ज्ञानशाखा | ||
उपवर्ग | लिंगभाव अभ्यास | ||
चा आयाम | स्त्रीवादी सिद्धांकन | ||
| |||
![]() |
स्त्री अभ्यास ही एक नव्याने घडत असलेली, आंतरशाखीय स्वरूपाचा आशय विकसित करू पाहणारी अशी ज्ञान शाखा आहे.[१] स्त्री अभ्यास हे आंतर विद्याशाखीय विद्यापीठीय क्षेत्र आहे ज्यात स्त्री-वादी दृष्टीकोनातून समाजाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासाचा बहुसांस्कृतिक अभ्यास केला जातो' आणि ज्यात लिंगभाव, वर्ण, वर्ग, जात, लैंगिकता आणि इतर सामाजिक विषमतांची स्त्रीवादी चिकित्सा केली जाते.
विद्यापिठ अनुदान आयोग अनुदानीत स्त्री अभ्यास केन्द्रे, विविध ज्ञानशाखांमधील लिंगभाव परिप्रेक्ष्यातून संशोधन आणि अध्यापन करणारे अभ्यासक तसेच स्त्री चळवळींतील कार्यकर्ते हे सर्व स्त्री अभ्यास ज्ञान क्षेत्रात योगदान करणारे घटक मानले जातात.[ संदर्भ हवा ]
भारतातील स्त्री अभ्यास: उगम आणि विकास[संपादन]
भारतातील स्त्री अभ्यासाचा प्रारंभ हा १९७० च्या मध्यावर झाला असे मानले जाते.[ संदर्भ हवा ] १९७१ साली शिक्षणमंत्रालय आणि समाजकल्याण यांच्या कायद्याप्रमाणे भारतीय स्त्रियांचा दर्जा यावर समिती स्थापन करण्यात आली. ह्या समितीचा 'समानतेच्या दिशेने' हा अहवाल भारतातील स्त्री अभ्यासाच्या प्रवासातील महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.[ संदर्भ हवा ] भारतातील पहिले स्त्री अभ्यास केंद्र हे एस. एन. डी. टी विद्यापीठात १९७४ साली सुरू झाले. त्याचा उद्देश स्त्रियांच्या स्थितीचा अभ्यास व विश्लेषण करणे हा होता. भारतात स्त्री अभ्यास स्त्री चळवळीचे अंग म्हणून पुढे येऊन उच्च शिक्षणाच्या अवकाशामध्ये स्थिरावला.[२]
संदर्भ[संपादन]
- ^ भागवत, विद्युत. २००९. स्त्री अभ्यास क्षेत्र: स्वरूप व व्याप्ती. 'स्त्री-प्रश्ना'ची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने. प्रतिमा प्रकाशन: पुणे.
- ^ देसाई नीरा, वीणा मुझुमदार आणि कमलिनी भन्साळी. २००९. स्त्रियांच्या शिक्षणापासून ते स्त्री अभ्यास: कायदेशीर मान्यतेसाठी प्रदीर्घ संघर्ष. स्वैर अनुवाद सरिता देहादराय. भारतातील स्त्रीअभ्यास: संस्था आणि व्यवहारांचा वेध. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र:पुणे