मराठी भाषेतीलविकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून हा ज्ञानकोश आपण घडवू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या ९०,७९३ आहे. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी मदतीचा लेख पाहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
१ मे, २०१३ मराठी विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिन निमीत्ताने मराठी विकिपीडियाच्या सर्व आजी माजी वाचक,संपादक, आणि चहात्यांना स्मृतीचिन्ह विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण मराठी विकिपीडिया वरील सहभाग,सहवास आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल अर्पण करण्यात येत आहे.आपल्या आवडीचे वाचन,लेखन संपादन असेच सदैव घडत राहो हि शुभेच्छा!!
२०२० मधील महाराष्ट्रातीलकोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरस (साथीचा रोग) च्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. राज्यात ४ एप्रिल २०२० पर्यंत ६३५ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले आहेत.
या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. भारतभर लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बसणे आवश्यक आहे. पर्यटनावर याचा मोठा परिणाम झालेला असून अजिंठा, वेरुळ, घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया यांसह राज्यभरातील पर्यटनस्थळांवरील गर्दी नाहीशी झाली आहे. होटेल, भाड्याच्या गाड्यांचे गिऱ्हाईकांनी आपल्या यात्रा बव्हंश रद्द केल्या आहे.
राज्यातील ५० टक्के पेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. एमएमआर- पुणे जिल्ह्याचा पट्टा हा देशातील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावासाठी एक 'हॉटस्पॉट' बनला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ११ मार्चपासून अंदाजे २०,००० बसफेऱ्या रद्द केल्या तर भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातून निघणाऱ्या २३ गाड्या रद्द केल्या. याशिवाय मुंबई उपनगरी रेल्वेच्या सगळ्या फेऱ्या २२ मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या. यात मुंबई मेट्रोचाही समावेश होता. २२ मार्च होजी राज्य सरकारच्या आणि खाजगी सगळ्या बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या. तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाणाऱ्या लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी सीमेवर चार केंद्रे उभारली आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करुनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला दिलेली सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरु नये या साठी पोलिस यंत्रणा यंत्रणा झटत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात व्यस्त आहे. मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे व्यक्त केले.
...की हेलिपॅडवर एका वर्तुळात रोमन लिपीत H अक्षर काढून हेलिकॉप्टर उतरण्याचे नेमके स्थान दर्शविले जाते?
...की सेल्लप्पन रामनाथन हा तमिळवंशीय सिंगापुरी नागरिक इ.स. १९९९ ते इ.स. २०११ या काळात तेथील राष्ट्राध्यक्ष होता?
...की हिंडेनबर्ग या हायड्रोजन वायूने भरलेल्या विमानाला आग लागूनही त्यातील दोन तृतीयांश प्रवासी वाचले?
...की दुसरे महायुद्ध संपल्यावर जर्मनीतीलन्युर्नबर्ग (न्युरेम्बर्ग) शहरात जर्मन व नाझी अधिकार्यांवर ज्यूंचे शिरकाण करण्याबद्दल व इतर युद्धगुन्ह्यांबद्दल खटले चालविले गेले?
मराठी विकिपीडियाचीप्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
"अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.