विकिपीडिया:विकिप्रकल्प जलबोध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाणी व नदी संदर्भात काम करणाऱ्या संस्था नद्यांचा इतिहास, नद्यांचे वास्तव, संबंधीत सामाजिक व सांस्कृतिक घटना यावर ज्ञान निर्मिती करण्यास पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग असणार आहे. कौशल्य प्रशिक्षण व चर्चा होण्यासाठी काही संपादन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.

जीवित नदी सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली व दुसरी कार्यशाळा २८ मे व २५ जुलै २०१८ मध्ये आयोजित केली गेली.

जल बिरादरी ही संस्था अगणी नदी खोऱ्यात कार्यरत आहे. या संस्थेने पुढाकार घेवून ७ डिसेंबर २०१८ रोजी डफळापूर या गावात कार्यशाळा आयोजित केली होती.

जल बिरादरी व तरुण भारत संघ या संस्थांनी देश पातळीवरील कार्यशाळा राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील भीकमपुरा येथे २२ ते २५ डिसेंबर २०१८ दरम्यान आयोजित केली.

इंटॅक-पुणे व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने जलबोध या प्रकल्पांतर्गत 'पुणे शहरातील नद्या' या विषयावर ज्ञान निर्मितीसाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा २९ व ३० जुलै रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत नदी लेखाचा आराखडा तयार करण्यात आला.

सूची विकिपीडिया प्रकल्पांची सूची

 

प्रकल्प मध्यवर्ती केंद्र विकिपीडिया प्रकल्प मध्यवर्ती केंद्र

 

मार्गदर्शक विकिपीडिया प्रकल्पांसाठी मार्गदर्शक