पोटगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोटगी हे वैवाहिक विभक्तपणा किंवा घटस्फोटापूर्वी किंवा नंतर आपल्या जोडीदारास आर्थिक सहाय्य देण्याकरीता एखाद्या व्यक्तीवर असलेले कायदेशीर बंधन आहे. ही कर्तव्ये प्रत्येक देशाच्या घटस्फोट कायदा किंवा कौटुंबिक कायद्या मध्ये नमूद केलेली असतात. पोटगीला जगामध्ये वेगळे वेगळे शब्द आहेत - आल्मेट (स्कॉटलंड) मेन्टेनंस (इंग्लंड, आयर्लंड, उत्तर आयर्लंड, वेल्स, कॅनडा), स्पाउसल सपोर्ट (यू.एस., कॅनडा) आणि स्पाउसल मेन्टनन्स (ऑस्ट्रेलिया).[ संदर्भ हवा ]

व्युत्पत्ती[संपादन]

पोटगीसाठीचा इंग्लिश शब्द ॲलिमोनी हा एलिमेंटरी (अन्न, पोषण संबंधित) आणि आहार, सल्फोन कायदा संकल्पना एलिमेंटरी पासून, तसेच लॅटिन शब्द एलिमोनिआ ("पोषण, अन्नधान्य", "पोषण करणे") आलेला आहे आणि घटस्फोटानंतर पत्नीची राहण्याची, अन्नपदार्थ, कपडे आणि इतर गरजा भागवण्याकरता आवश्यक त्या अन्नपदार्थाची तरतूद करणे असा होतो.[ संदर्भ हवा ]

इतिहास[संपादन]

हम्मूराबीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाच्या मुलांना जन्म दिला तर अशा स्त्रीला अन्न पुरवणे ही त्या पुरुषाची जबाबदारी आहे, जेणेकरून ती स्त्री त्यांना वाढवू शकेल. ही आचारसंहिता इ.स.पू. १७५४पासून लागू होती.[ संदर्भ हवा ] पूर्वी पासूनचा पोटगी या विषयाला आता नवीन स्वरूप प्राप्त झाले आहे .