शीतल महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
शीतल महाजन
शीतल महाजन
जन्म शीतल
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा पॅरॅशूट जम्पिंग
कारकिर्दीचा काळ २००४ पासून पुढे
धर्म हिंदू
जोडीदार वैभव राणे
वडील कमलाकर महाजन
नातेवाईक बहिणाबाई चौधरी
पुरस्कार पद्मश्री


शीतल महाजन ही पॅरॅशूट जम्पिंग करणारी स्त्री असून तिच्या नावावर अनेक विक्रम जमा झाले आहेत.

बालपण[संपादन]

मूळची जळगावमधील असलेली शीतल महाजन-राणे ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरीचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या. बालपणापासूनच शीतलला काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता. यातच तिला जम्पिंगची आवड निर्माण झाली. खरे तर हा तसा महागडा क्रीडाप्रकार आहे. मात्र शीतलचे पालक तिच्या पाठीशी उभे राहिले. पुणे येथील एनडीए या संस्थेतील कमलसिंग ओबेरॉय यांच्या मार्गदर्शनाखाली शीतलचे प्रशिक्षण सुरु झाले.

कारकीर्द[संपादन]

शीतल महाजन यांनी १४ एप्रिल २००४ रोजी, कोणताही पूर्वानुभव नसताना, आयुष्यात कधीही साध्या विमानात पाऊलही टाकलेले नसताना हिने ३००० फूटांवरून, उणे ३७ डीग्री तापमानात पॅरॅशूटच्या साहाय्याने चक्क उत्तर धृवावर उडी मारली आहे. अशी उडी तिने याआधी सरावासाठीही मारलेली नव्हती. पहिली मारली ती थेट उत्तर धृवावरच! अर्थातच हा विश्वविक्रम झाला शीतलच्या नावावर. ती इथेच थांबली नाही. उत्तर धृवावरून ती परतही आली नसेल, तोवर तिने मनाशी निश्चयही केला की पुढची उडी दक्षिण धृवावर! आणि तीही ’फ्रीफॉल जम्प’- म्हणजेच ज्यामधे तब्बल १५,००० फुटांवरून हवेत स्वतःला झोकून द्यायचं आणि ४००० फुटावर आल्यावरच पॅरॅशूट उघडायचं! ही उडीही तिने यशस्वीपणे पूर्ण केली.

१७ डिसेंबर २००६ रोजी १२००० फूट उंचीवरून आधी फ्री फॉल व त्यानंतर पॅराशूटचे साहाय्याने दक्षिण ध्रुवावर उडी मारून एक गौरवास्पद जागतिक विक्रम केला. अशा प्रकारची उडी मारणारी ती जगातील पहिली महिला ठरली. १९ एप्रिल २००८ रोजी अत्यंत अनोख्या या विवाह सोहळ्यात शीतल महाजन आणि वैभव राणे एका हॉट एर बलूनमधील धगधगत्या अग्नीच्या साक्षीने विवाहबद्ध झाले. तर दुसऱ्या बलूनमध्ये व-हाडी मंडळी आणि मीडियाचे प्रतिनिधींनी होते.

त्यानंतर १९ सप्टें २०१० रोजी तिने १३००० फुटांवरून बर्ड जम्पिंग केले. हा नवीन विक्रमही तिच्या नावावर लागला.

२६ ऑक्टो. २०११ रोजी शीतल महाजन हिने अमेरिकेतील स्कायड्राईव्ह अँरिझोना येथे ५८00 फुटावरून हॉट एर बलूनमधून उडी घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला. अशी उडी घेणार ती पहिली भारतीय महिला ठरली असून, तिची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे.

तिच्या आतापर्यंत ४४५ पॅराशूट उड्या झाल्या आहेत. शीतलने याआधी पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवावरून पॅराशूट जंप घेतली असून, ती जगातील कमी वयात कोणत्याही सरावाशिवाय कामगिरी करणारी महिला आहे.

गौरव[संपादन]

भारत सरकारने तिला पद्मश्री किताब देऊन गौरविले आहे.

संदर्भ[संपादन]