वर्झावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्झावा
Warszawa
पोलंड देशाची राजधानी
Flag of Warsaw.svg
ध्वज
POL Warszawa COA.svg
चिन्ह
वर्झावा is located in पोलंड
वर्झावा
वर्झावा
वर्झावाचे पोलंडमधील स्थान

गुणक: 52°13′56.28″N 21°00′30.36″E / 52.2323, 21.0084333गुणक: 52°13′56.28″N 21°00′30.36″E / 52.2323, 21.0084333

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत माझोव्येत्स्का
स्थापना वर्ष १३वे शतक
क्षेत्रफळ ५१६.९ चौ. किमी (१९९.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३२८ फूट (१०० मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १७,१६,८५५
  - घनता ३,३११ /चौ. किमी (८,५८० /चौ. मैल)
  - महानगर २६,३१,९०२
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
warszawa.pl


वर्झावा (पोलिश: Pl-Warszawa.ogg Warszawa , इंग्लिश लेखनभेदः Warsaw, वॉर्सा) ही मध्य युरोपातील पोलंड देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. वर्झावा शहर पोलंडच्या मध्य-पूर्व भागात बाल्टिक समुद्रापासून २६० कि.मी. अंतरावर व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. इ.स. २०१० साली वर्झावा शहराची लोकसंख्या १७.१७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २६.३१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने युरोपियन संघात वर्झाव्याचा नववा क्रमांक लागतो.

इतिहास[संपादन]

इ.स. १४११ साली बांधलेले सेंट मेरी चर्च

इ.स.च्या १३व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन करण्यात आलेले वर्झावा शहर इ.स. १४१३ साली माझोव्हिया प्रदेशाची राजधानी बनले. मध्यवर्ती स्थानामुळे इ.स. १५९६ साली वर्झव्याला पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची राजधानी बनवण्यात आले. त्यानंतरच्या अनेक शतकांदरम्यान वर्झाव्याचा वेगाने विकास झाला व पोलिश कला व संस्कृतीचे वर्झावा माहेरघर बनले. इ.स. १७९५ साली वर्झावा प्रशियाच्या राजतंत्रात विलीन करण्यात आले; परंतु इ.स. १८०६ साली नेपोलियनच्या सैन्याने वर्झाव्याची मुक्तता केली व त्यानंतरच्या नवनिर्मित पोलंड देशाची राजधानी येथेच राहिली.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस नाझी जर्मनीने इ.स. १९३९ साली पोलंडवर कब्जा मिळवला व पोलिश ज्यूंनां डांबुन ठेवण्यासाठी वर्झावा येथे पूर्व युरोपातील सर्वांत मोठी छळछावणी उघडली. सुमारे चार लाख ज्यू केवळ ३.४ चौरस किमी इतक्या जागेत कोंबून ठेवले गेले होते. ह्यांपैकी अनेक ज्यू हत्यासत्रामध्ये मारले गेले. जुलै, इ.स. १९४४ मध्ये भूमिगत झालेल्या पोलिश सेनेने नाझी जर्मनीविरुद्ध बंड पुकारले व तेव्हा झालेल्या ६३ दिवसांच्या लढाईमध्ये वर्झाव्यातील १.५ ते २ लाख नागरिक मृत्युमुखी पडले. ह्या बंडामुळे खवळलेल्या अ‍ॅडॉल्फ हिटलरने संपूर्ण वर्झावा शहर जमीनदोस्त करण्याचा व संग्रहालयांमधील वस्तू जर्मनीमध्ये हलवण्याचा आदेश दिला. त्यानुसार जर्मन सैन्याने शिस्तबद्धरीत्या येथील सर्व इमारती पाडल्या किंवा जाळून टाकल्या. ह्या विध्वंसादरम्यान तत्कालीन शहराचा ८५ टक्के नष्ट झाला.

युद्ध संपल्यानंतर पोलंडमधील साम्यवादी राजवटीने वर्झावा शहर पुन्हा उभे केले व अनेक ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी केली. इ.स. १९८० साली वर्झाव्याच्या ऐतिहासिक नगरकेंद्राला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले. इ.स. २००४ साली पोलंड युरोपियन संघात सामील झाल्यानंतर वर्झावा झपाट्याने विकसत आहे.

भूगोल[संपादन]

वर्झावा शहर पोलंडच्या मध्य-पूर्व भागात बाल्टिक समुद्रापासून २६० कि.मी. अंतरावर व्हिस्चुला नदीच्या काठावरील सपाट पठारावर वसले असून येथील सरासरी समुद्रसपाटीपासूनची उंची ३३० फूट आहे.

हवामान[संपादन]

वर्झाव्यामधील हवामान आर्द्र असून येथील हिवाळे शीत, तर उन्हाळे सौम्य असतात.

हवामान तपशील: वर्झावा
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) style="background:#FFC790;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12.5
(54.5)

style="background:#FFB061;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|15.9
(60.6)

style="background:#FF7D00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|23.3
(73.9)

style="background:#FF5500;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|29.1
(84.4)

style="background:#FF3C00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|32.7
(90.9)

style="background:#FF2E00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|34.8
(94.6)

style="background:#FF2500;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|36.0
(96.8)

style="background:#FF2300;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|36.4
(97.5)

style="background:#FF3A00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|33.0
(91.4)

style="background:#FF6A00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|26.1
(79)

style="background:#FF9832;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|19.3
(66.7)

style="background:#FFAF5F;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|16.1
(61)

style="background:#FF2300;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|३६.४
सरासरी कमाल °से (°फॅ) style="background:#E7E7FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|0.1
(32.2)

style="background:#EBEBFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|0.9
(33.6)

style="background:#FFFDFC;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|4.7
(40.5)

style="background:#FFC994;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12.2
(54)

style="background:#FF9831;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|19.4
(66.9)

style="background:#FF8811;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|21.7
(71.1)

style="background:#FF7900;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|23.8
(74.8)

style="background:#FF7F00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|23.0
(73.4)

style="background:#FF9F40;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|18.3
(64.9)

style="background:#FFC58B;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12.9
(55.2)

style="background:#FFFBF8;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|5.0
(41)

style="background:#F2F2FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|2.1
(35.8)

style="background:#FFCB97;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|१२.०१
(५३.६२)
रोजची सरासरी °से (°से) style="background:#D6D6FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−3.0
(27)

style="background:#DADAFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−2.3
(27.9)

style="background:#F0F0FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|1.7
(35.1)

style="background:#FFE5CB;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|8.2
(46.8)

style="background:#FFBD7C;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|14.0
(57.2)

style="background:#FFA44A;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|17.6
(63.7)

style="background:#FF9832;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|19.3
(66.7)

style="background:#FF9F40;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|18.3
(64.9)

style="background:#FFBD7C;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|14.0
(57.2)

style="background:#FFE5CB;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|8.2
(46.8)

style="background:#F6F6FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|2.9
(37.2)

style="background:#E4E4FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−0.5
(31.1)

style="background:#FFE5CB;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|८.२
(४६.८)
सरासरी किमान °से (°फॅ) style="background:#C5C5FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−6.1
(21)

style="background:#C9C9FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−5.5
(22.1)

style="background:#DFDFFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−1.3
(29.7)

style="background:#FDFDFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|4.2
(39.6)

style="background:#FFE2C6;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|8.6
(47.5)

style="background:#FFC082;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|13.5
(56.3)

style="background:#FFB770;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|14.8
(58.6)

style="background:#FFC081;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|13.6
(56.5)

style="background:#FFDBB7;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|9.7
(49.5)

style="background:#F9F9FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3.5
(38.3)

style="background:#EBEBFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|0.8
(33.4)

style="background:#D6D6FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−3.1
(26.4)

style="background:#FEFEFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|४.३९
(३९.९१)
विक्रमी किमान °से (°फॅ) style="background:#4141FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|−30.7
(-23.3)

style="background:#4242FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|−30.4
(-22.7)

style="background:#6767FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|−23.5
(-10.3)

style="background:#B0B0FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−10.1
(13.8)

style="background:#D3D3FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−3.6
(25.5)

style="background:#E8E8FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|0.3
(32.5)

style="background:#FDFDFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|4.2
(39.6)

style="background:#F1F1FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|2.0
(35.6)

style="background:#CDCDFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−4.7
(23.5)

style="background:#B6B6FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−9.0
(16)

style="background:#8484FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|−18.2
(-0.8)

style="background:#5252FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|−27.4
(-17.3)

style="background:#4141FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|-३०.७
वर्षाव मिमी (इंच) 21
(0.83)
25
(0.98)
24
(0.94)
33
(1.3)
44
(1.73)
62
(2.44)
73
(2.87)
63
(2.48)
42
(1.65)
37
(1.46)
38
(1.5)
33
(1.3)
४९५
(१९.४९)
% आर्द्रता style="background:#0000C8;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|81

style="background:#0000C4;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|82

style="background:#0000D3;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|78

style="background:#0000EE;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|71

style="background:#0000FD;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|67

style="background:#0000F9;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|68

style="background:#0000EA;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|72

style="background:#0000E2;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|74

style="background:#0000DF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|75

style="background:#0000D7;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|77

style="background:#0000CB;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|80

style="background:#0000B5;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|86

style="background:#0000DB;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|७५.९
वर्षावाचे दिवस style="background:#4545FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|15

style="background:#4141FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|14

style="background:#5E5EFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|13

style="background:#6666FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|12

style="background:#6A6AFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12

style="background:#5959FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|13

style="background:#5E5EFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|13

style="background:#6A6AFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12

style="background:#6666FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|12

style="background:#5E5EFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|13

style="background:#4C4CFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|14

style="background:#3939FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|16

style="background:#5858FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|१५९
सूर्यप्रकाश (तास) style="background:#4E4E4E;color:#FFFFFF; font-size:85%;

"|43

style="background:#767676; font-size:85%;

"|59

style="background:#B4B46F; font-size:85%;

"|115

style="background:#C6C600; font-size:85%;

"|150

style="background:#DADA00; font-size:85%;

"|211

style="background:#E1E100; font-size:85%;

"|237

style="background:#DDDD00; font-size:85%;

"|226

style="background:#DADA00; font-size:85%;

"|214

style="background:#C7C700; font-size:85%;

"|153

style="background:#ACAC9C; font-size:85%;

"|99

style="background:#494949;color:#FFFFFF; font-size:85%;

"|39

style="background:#2D2D2D;color:#FFFFFF; font-size:85%;

"|25

style="background:#BCBC3C; font-size:85%;
border-left-width:medium"|१,५७१
संदर्भ: [१]

शहर रचना[संपादन]

वर्झावाचे जिल्हे

वर्झावा ही माझॉव्येत्स्की प्रांतामधील एक काउंटी असून ती एकूण १८ जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे. वर्झाव्याचे स्थापत्य ऐतिहासिक गॉथिक ढंगाचे होते. त्यापैकी बऱ्याचशा वास्तू दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त करण्यात आल्या. युद्धोत्तर काळात अनेक जुन्या इमारती पुन्हा बांधण्यात आल्या, तर काही इमारती आधुनिक स्थापत्यात बांधल्या गेल्या. त्यामुळे येथे आज ऐतिहासिक व आधुनिक अश्या दोन्ही ढंगांच्या इमारती आढळतात. येथील स्थापत्यकलेची तुलना काही वेळा पॅरिससोबत केली जाते.

अर्थव्यवस्था[संपादन]

पोलिश अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या वर्झावामध्ये अनेक शासकीय संस्था तसेच खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत. पोलंडचे १२ % उत्पन्न वर्झाव्यातून उपजते व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीबाबत वर्झावा मध्य युरोपात अव्वल स्थानावर आहे. इ.स. २००८ साली येथील वार्षिक दरडोई उत्पन्न सुमारे २३,००० युरो होते.[२] येथील बेरोजगारी केवळ ३ टक्के आहे.

एक मोठे जागतिक शहर असलेले वर्झावा इ.स. २००८ साली जगातील ३५वे महागडे शहर होते.[३] मास्टरकार्ड कंपनीने बनवलेल्या विकसनशील बाजारांच्या जागतिक यादीमध्ये वर्झाव्याचा ६५मध्ये ८वा क्रमांक आहे.

लोकसांख्यिकी[संपादन]

ऐतिहासिक काळापासून पोलंड तसेच मध्य व पूर्व युरोपामधून स्थलांतर करणाऱ्या लोकांचे वर्झावा हे आकर्षण राहिले आहे. पोलिश वंशाच्या लोकांसोबत येथे अनेक शतके ज्यू लोक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. इ.स.च्या १९व्या शतकाच्या अखेरीस वर्झाव्यातले ३४ % नागरिक ज्यू वंशाचे होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वर्झाव्यात मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडला. युद्धपूर्व काळात इ.स. १९३९ साली १३ लाख लोकसंख्या असलेल्या वर्झाव्यात इ.स. १९४५ साली केवळ ४.२ लाख लोक उरले होते.

आजच्या घडीला (इ.स. २०१५) येथील लोकसंख्या १७,१६,८५५ इतकी आहे. ऱ्या

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १७०० ३०,०००
इ.स. १७९२ १,२०,००० +३००%
इ.स. १८०० ६३,४०० −४७%
इ.स. १८३० १,३९,७०० +१२०%
इ.स. १८५० १,६३,६०० +१७%
इ.स. १८८२ ३,८३,००० +१३४%
इ.स. १९०१ ७,११,९८८ +८५%
इ.स. १९०९ ७,६४,०५४ +७%
इ.स. १९२५ १०,०३,००० +३१%
इ.स. १९३३ ११,७८,९१४ +१७%
इ.स. १९३९ १३,००,००० +१०%
इ.स. १९४५ ४,२२,००० −६७%
इ.स. १९५० ८,०३,८०० +९०%
इ.स. १९६० ११,३६,००० +४१%
इ.स. १९७० १३,१५,६०० +१५%
इ.स. १९८० १५,९६,१०० +२१%
इ.स. १९९० १६,५५,७०० +३%
इ.स. २००० १६,७२,४०० +१%
इ.स. २००२ १६,८८,२०० +०%
इ.स. २००६ १७,०२,१०० +०%
इ.स. २००९ १७,१४,४६६ +०%
Note: 2006[४]

वाहतूक[संपादन]

वर्झाव्यातील एक मोठा चौक

गेल्या काही दशकांपासून वर्झाव्यामधील वाहतूक सुविधा वेगाने सुधारत आहेत. येथे अनेक नवे रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल बांधले जात आहेत. नागरी वाहतुकीसाठी अनेक बसमार्ग, तसेच ट्राम व मेट्रो रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. इ.स. १९९५ साली बांधण्यात आलेली वर्झावा मेट्रो २३.१ कि.मी. लांबीच्या मार्गांवर धावते व रोज सुमारे ५.५ लाख प्रवासी वाहून नेते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी रेल्वे व विमानसेवा उपलब्ध आहेत.

वर्झावा चोपिन विमानतळ हा पोलंडमधील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ वर्झावा महानगरामध्ये स्थित आहे. एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. ह्या विमानतळाद्वारे वर्झावा युरोप व जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडले गेले आहे.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा वर्झाव्यामधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. लेगिया वर्झावा व पोलोनिया वर्झावा हे पोलिश फुटबॉल लीगमधील दोन लोकप्रिय संघ येथेच स्थित आहेत. युएफा यूरो २०१२ स्पर्धेचा पहिला व इतर अनेक सामने वर्झाव्यातल्या ५६,००० आसनक्षमतेच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळवले गेले.

कला[संपादन]

कला व विज्ञानाचे प्रासाद ही वर्झाव्यातली सर्वांत उंच इमारत आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेल्या विध्वंसामुळे वर्झाव्याच्या कलाजीवनाला मोठा तडा गेला. येथील अनेक ऐतिहासिक संग्रहालये जमीनदोस्त केली गेली व त्यांमधील दुर्मिळ वस्तू लुप्त झाल्या. परंतु आजही येथे काही लोकप्रिय संग्रहालये अस्तित्वात आहेत. तसेच अनेक संगीत परिषदा, तसेच नाटके वर्झाव्यात भरवली जातात.

इ.स. २०१६ सालच्या युरोपियन सांस्कृतिक राजधानी किताबासाठी वर्झावा एक स्पर्धक आहे.

शिक्षण[संपादन]

पोलंडमधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी अनेक संस्था वर्झाव्यात आहेत. चार मोठी विद्यापीठे व ६१ उच्चशिक्षण संस्था येथे असून त्यांत एकूण ५ लाख विद्यार्थी शिकतात. इ.स. १८१६ साली स्थापलेले वर्झावा विद्यापीठ हे पोलंडमधील सर्वांत जुने, सर्वांत मोठे व सर्वोत्तम श्रेणीचे विद्यापीठ आहे. तसेच वर्झावा स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, फ्रेदरिक शोपें संगीत संस्था, वर्झावा वैद्यकीय विद्यापीठ, वर्झावा तांत्रिक विद्यापीठ इत्यादी अनेक नावाजलेल्या व युरोपातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था वर्झाव्यात आहेत.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

आंतरराष्ट्रीय संबंध[संपादन]

जगभरातील खालील शहरांसोबत वर्झाव्याचे सांस्कृतिक व वाणिज्यीय संबंध आहेत.[५]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
 1. [http://www.imgw.pl/index.php?option=com_content&view=article&id=147&Itemid=180 इन्स्टिट्यूट ऑफ मिटिऑरॉलॉजी अँड वॉटर मॅनेजमेंट]. www.imgw.pl. (इंग्लिश मजकूर)
 2. दरडोई सकल वार्षिक उत्पन्न. www.stat.gov.pl. २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
 3. "इकनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट अहवाल", द इकनॉमिस्ट, १५ मार्च, इ.स. २००७. १५ जून, इ.स. २००७ रोजी तपासले. (इंग्लिश मजकूर) 
 4. डेमोग्राफिक इयरबुक्स ऑफ पोलंड १९३९-१९७९, १९८०-१९९४. www.stat.gov.pl. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, पोलंड. २९ ऑगस्ट, इ.स. २००८ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
 5. म्यास्ता पार्तनेर्स्कीये वर्झावी. ब्य्रॉ प्रोमोस्झी म्यास्ता (४ मे, इ.स. २००५). २९ ऑगस्ट, इ.स. २००८ रोजी पाहिले.
 6. Berlin's international city relations. Berlin and Warsaw’s agreement on friendship and cooperation and a corresponding supporting program was signed in Berlin on 12 August 1991.
 7. Twin Towns.
 8. Sister Cities of Istanbul.
 9. "İstanbul'a 49 kardeş". 
 10. Madrid city council webpage Mapa Mundi de las ciudades hermanadas.
 11. Partners – Oslo kommune
 12. Twin cities of Riga.
 13. Saint Petersburg in figures – International and Interregional Ties [मृत दुवा].
 14. Online Directory: California, USA.
 15. International Cooperation: Sister Cities.
 16. Sister city list (.DOC)
 17. Tel Aviv sister cities.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: