काराकास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काराकास
Caracas
व्हेनेझुएला देशाची राजधानी
Flag of Caracas.svg
ध्वज
Coat of arms of Caracas.svg
चिन्ह
काराकास is located in व्हेनेझुएला
काराकास
काराकास
काराकासचे व्हेनेझुएलामधील स्थान

गुणक: 10°30′N 66°55′W / 10.5°N 66.91667°W / 10.5; -66.91667गुणक: 10°30′N 66°55′W / 10.5°N 66.91667°W / 10.5; -66.91667

देश व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला
राज्य व्हेनेझुएला राजधानी जिल्हा
स्थापना वर्ष २५ जुलै इ.स. १५६७
क्षेत्रफळ १,९३० चौ. किमी (७५० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,९३५ फूट (८९५ मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १८,१५,६७९
  - घनता १,४३२ /चौ. किमी (३,७१० /चौ. मैल)
  - महानगर ४१,९६,५१४
www.alcaldiamayor.gob.ve


काराकास (स्पॅनिश: Santiago de León de Caracas, सांतियागो दे लिओन दे काराकास; इंग्लिश उच्चारः केरकस) ही दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. काराकास शहर व्हेनेझुएलाच्या उत्तर भागात आन्देस पर्वतरांगेच्या ईशान्येकडील कॅरिबियन समुद्र किनार्‍याजवळ पसरलेल्या पर्वतराजींमध्ये वसले आहे.

काराकास शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ४१ लाख आहे. काराकास महानगर क्षेत्रामध्ये व्हेनेझुएला राजधानी जिल्हा (काराकास शहर) व मिरांदा राज्यातील चार महानगरपालिकांचा समावेश होतो.

इतिहास[संपादन]

काराकासची स्थापना करणारा दियेगो दे लोसादा

काराकास खोर्‍यामध्ये स्थानिक लोक अनेक शतके वसले होते. १५६२ साली दक्षिण अमेरिकेत दाखल स्पॅनिश लोकांनी येथे वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक लोकांनी तो हाणून पाडला. ५ वर्षांनंतर २५ जुलै १५६७ रोजी दियेगो दे लोसादा ह्या स्पॅनिश योद्ध्याने तामांको ह्या स्थानिक अदिवासी नेत्याच्या सैन्याला पराभूत केले व सांतियागो दे लिओन दे काराकासची स्थापना केली. १८व्या शतकात येथील कोकोच्या शेतीमुळे काराकासची भरभराट झाली व १७७७ साली काराकासला व्हेनेझुएला स्पॅनिश वसाहतीचे (Capitanía General de Venezuela) राजधानीचे शहर बनवण्यात आले. फ्रांसिस्को दे मिरांदा व सिमोन बॉलिव्हार ह्या काराकासमध्ये जन्मलेल्या क्रांतिकार्‍यांच्या मदतीने ५ जुलै १८११ रोजी व्हेनेझुएलाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली.

विसाव्या शतकात व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध लागल्यानंतर दक्षिण अमेरिकेचे काराकास हे मोठे आर्थिक केंद्र बनले ज्यामुळे काराकासचा विकास झपाट्याने झाला.

भूगोल[संपादन]

काराकास शहर व्हेनेझुएलाच्या सागरी पर्वतरांगेच्या खोर्‍यात वसले आहे. कॅरिबियन समुद्र जवळ असून देखील काराकासची समुद्रसपाटीपासूनची साधारण उंची २,८५४ - ३४२२ फूट इतकी आहे. काराकास खोरे अतिशय उंचसखल असल्यामुळे शहराची वाढ भौगोलिक रचनेला अनुसरून झाली आहे.

हवामान[संपादन]

क्योपेन हवामान वर्गीकरणानुसार काराकासचे हवामान उष्णकटिबंधी असून येथे वर्षाकाठी ९०० ते १,३०० मिमी पाउस पडतो. उंचावर वसले असल्यामुळे काराकासमधील तापमान ह्या भागातील इतर स्थानांपेक्षा सौम्य असते.

काराकास साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 32
(90)
35
(95)
35
(95)
37
(99)
36
(97)
35
(95)
37
(99)
36
(97)
36
(97)
33
(91)
32
(90)
32
(90)
37
(99)
सरासरी कमाल °से (°फॅ) 29.0
(84.2)
31.0
(87.8)
31.7
(89.1)
31.1
(88)
31.8
(89.2)
30.3
(86.5)
31.0
(87.8)
29.3
(84.7)
30.1
(86.2)
29.7
(85.5)
29.6
(85.3)
28.4
(83.1)
30.3
(86.5)
दैनंदिन °से (°फॅ) 21.1
(70)
22.8
(73)
23.5
(74.3)
23.7
(74.7)
25.0
(77)
24.2
(75.6)
24.0
(75.2)
23.0
(73.4)
23.5
(74.3)
23.1
(73.6)
22.7
(72.9)
21.3
(70.3)
23.1
(73.6)
सरासरी किमान °से (°फॅ) 13.1
(55.6)
14.5
(58.1)
15.3
(59.5)
16.2
(61.2)
18.2
(64.8)
18.1
(64.6)
16.9
(62.4)
16.6
(61.9)
16.8
(62.2)
16.4
(61.5)
15.7
(60.3)
14.2
(57.6)
16.0
(60.8)
विक्रमी किमान °से (°फॅ) 8
(46)
8
(46)
7
(45)
11
(52)
11
(52)
12
(54)
11
(52)
12
(54)
12
(54)
12
(54)
11
(52)
7
(45)
7
(45)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 15.3
(0.602)
13.2
(0.52)
11.4
(0.449)
59.2
(2.331)
81.7
(3.217)
134.1
(5.28)
118.4
(4.661)
123.8
(4.874)
115.4
(4.543)
126.3
(4.972)
72.6
(2.858)
41.4
(1.63)
912.8
(35.937)
सरासरी पर्जन्य दिवस 6 4 3 7 13 19 19 18 15 15 13 10 142
स्रोत #1: World Meteorological Organisation (UN) [१]
स्रोत #2: weather.com[२]

जुळी शहरे[संपादन]

काराकासचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ[संपादन]


हे सुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: