विमान वाहतूक कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जेट एअरवेज ही भारतामधील एक आघाडीची प्रवासी विमान वाहतूक कंपनी आहे.
ब्ल्यू डार्ट एव्हीएशन ही भारतामधील एक आघाडीची माल विमान वाहतूक कंपनी आहे.

विमान वाहतूक कंपनी ही प्रवासी व मालाची हवाई वाहतूक करणारी कंपनी आहे.

नोव्हेंबर १९०९ मध्ये स्थापन झालेली डेलाग (जर्मन: Deutsche Luftschiffahrts-Aktiengesellschaft) ही फायदेतत्त्वावर हवाई वाहतूक करणारी जगातील सर्वात पहिली कंपनी होती. १९१९ सालापासून सतत सेवेत असणारी के.एल.एम. ही जगातील सर्वात जुनी कंपनी आहे. सध्या अनेक देशांमध्ये विमान कंपन्यांवर पूर्णपणे त्या देशातील सरकारचे नियंत्रण असून खाजगी कंपन्यांना परवानगी नाही. भारतासह बव्हंशी देशांमध्ये नागरी उड्डाण खुले असून अनेक कंपन्या विमान वाहतूक चालवू शकतात.

आय.ए.टी.ए.आय.सी.ए.ओ. ह्या दोन आंतरराष्ट्रीय संस्था जगातील हवाई वाहतूक नियंत्रित करतात. एअरबसबोइंग ह्या विमान उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख कंपन्या आहेत.

जगातील मोठ्या विमान वाहतूक कंपन्या[संपादन]

महसूलानुसार[संपादन]

फोर्ब्ज मासिकामधील माहितीनुसार:[१]

क्रम कंपनी देश महसूल ($B) नफा ($B) मालमत्ता ($B) बाजार मूल्य ($B)
1 अमेरिकन एअरलाइन्स अमेरिका 40.4 1.9 42.3 35.8
2 लुफ्तान्सा जर्मनी 39.9 0.4 40.1 12.3
3 युनायटेड एअरलाइन्स अमेरिका 38.3 0.6 36.8 23.6
4 डेल्टा एअरलाइन्स अमेरिका 37.7 2.7 59.4 39.9
5 एअर फ्रान्स-के.एल.एम. फ्रान्स नेदरलँड्स 34 -2.4 35 4.7
6 ब्रिटिश एअरवेज-आयबेरिया युनायटेड किंग्डम स्पेन 24.7 0.2 28.6 14.3
7 साउथवेस्ट एअरलाइन्स अमेरिका 17.7 0.8 19.3 16.8
8 ऑल निप्पॉन एअरवेज जपान 16 0.2 20.5 7.6
9 चायना सदर्न एअरलाइन्स चीन 15.9 0.3 27.3 3.7
10 क्वांटास ऑस्ट्रेलिया 14.9 -0.3 17.9 2.2

प्रवासी संख्येनुसार (दशलक्ष)[संपादन]

क्रम कंपनी 2013 2012 2011 2010 2009 संदर्भ
1 अमेरिका अमेरिकन एअरलाइन्स1 193.7 107.8 107.2 105.2 104.5
[२]
2 अमेरिका डेल्टा एअरलाइन्स2 164.6 164.6 163.8 162.6 161.1
[३]
3 अमेरिका युनायटेड एअरलाइन्स3 139.2 140.4 141.8 145.6 81.4
[४]
4 अमेरिका साउथवेस्ट एअरलाइन्स4 133.1 133.9 135.2 106.2 101.3
[५]
5 आयर्लंडचे प्रजासत्ताक रायनएअर 81.4 79.3 75.8 72.1 66.5
[६]
6 चीन चायना ईस्टर्न एअरलाइन्स 79.1 73.1 68.7 64.9 44.0
[७]
7 जर्मनी लुफ्तान्सा 76.3 74.7 65.5 58.9 55.6
[८]
8 चिली लाताम एअरलाइन्स 66.7 65.0 19.7 17.3 15.4
[९]
9 चीन चायना सदर्न एअरलाइन्स 64.5 61.8 58.7 57.7 49.4
[१०]
10 युनायटेड किंग्डम इझीजेट 61.3 59.2 55.5 49.7 46.1
[११]
टीपा

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Global 2000 Leading Companies". Forbes.
 2. ^ "American Airlines Group Reports December Traffic Results". American Airlines. 2014-03-19 रोजी पाहिले.
 3. ^ "Delta Reports Financial and Operating Performance for December 2013". news.delta.com. 2014-03-19 रोजी पाहिले.
 4. ^ "United Reports December 2013 Operational Performance". United Continental Holdings. 2014-03-19 रोजी पाहिले.
 5. ^ "Southwest Airlines Reports Record Fourth Quarter And Full Year Profit; 41st Consecutive Year Of Profitability". 2014-03-19 रोजी पाहिले.
 6. ^ "About Us". ryanair.com. 2014-03-19 रोजी पाहिले.
 7. ^ "Annual Report 2013" (PDF). CEAIR. 2014-05-09 रोजी पाहिले.
 8. ^ "Lufthansa Group - Traffic Figures". Lufthansa Group. 2014-03-19 रोजी पाहिले.
 9. ^ "Investor Relations". LATAM AirlinesGroup. 2015-01-09 रोजी पाहिले.
 10. ^ "Investor Relations". csair.com. 2014-05-07 रोजी पाहिले.
 11. ^ "Monthly traffic statistics". easyJet plc. 2014-03-31 रोजी पाहिले.