लिस्बन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिस्बन
Lisboa
पोर्तुगाल देशाची राजधानी

Lisbon set of images.jpg

Flag of Lisboa.svg
ध्वज
Crest of Lisboa.svg
चिन्ह
लिस्बन is located in पोर्तुगाल
लिस्बन
लिस्बन
लिस्बनचे पोर्तुगालमधील स्थान

गुणक: 38°42′50″N 09°08′22″W / 38.71389°N 9.13944°W / 38.71389; -9.13944गुणक: 38°42′50″N 09°08′22″W / 38.71389°N 9.13944°W / 38.71389; -9.13944

देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
जिल्हा लिस्बन
स्थापना वर्ष इ.स. ७१९
महापौर आंतोनियो कोस्ता
क्षेत्रफळ ८४.८ चौ. किमी (३२.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,४७,६३१
  - घनता ६,४५८ /चौ. किमी (१६,७३० /चौ. मैल)
  - महानगर ३०.३५ लाख
प्रमाणवेळ यूटीसी±००:००
http://www.cm-lisboa.pt/


लिस्बन (पोर्तुगीज: Lisboa; लिस्बोआ) ही पोर्तुगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्याताहो नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे ५.४७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३० लाख होती. युरोपियन संघामधील ११व्या क्रमांकाचे मोठे महानगर असलेल्या व ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७ टक्के लोकवस्ती एकवटली आहे.

लिस्बन हे पोर्तुगालचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९४ साली लिस्बन युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती.

इतिहास[संपादन]

प्रागैतिहासिक काळापासून रोमन साम्राज्याचा भाग असलेले लिस्बन इ.स. ७११ साली उत्तर आफ्रिकेमधील मुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. पुढील ४०० वर्षे अरबांच्या शासनाखाली घालवल्यानंतर इ.स. ११०८ साली नॉर्वेजियन क्रुसेडने लिस्बनवर ताबा मिळवला. इ.स. ११४७ साली पहिल्या अल्फोन्सोच्या नेतृत्वाखालील सैन्याने लिस्बनवर कब्जा करून ह्या भूभागावर ख्रिश्चन धर्म पुन्हा आणला. १२५५ साली लिस्बन नव्या पोर्तुगीज प्रदेशाची राजधानी बनली.

१५व्या शतकामध्ये सुरू झालेल्या शोध युगामध्ये पोर्तुगीज शोधक आघाडीवर होते व ह्यांपैकी अनेक शोध मोहिमांची सुरूवात लिस्बनमधूनच झाली. १४९७ साली येथूनच वास्को दा गामाने भारताकडे प्रयाण केले होते. १८व्या शतकाच्या मध्यात लिस्बन युरोपामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते. परंतु १ नोव्हेंबर १७५५ रोजी येथे झालेल्या एका प्रलयंकारी भूकंपामध्ये लिस्बनमधील सुमारे ३०,००० व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या व जवळजवळ पूर्ण शहराची पडझड झाली. भूकंपानंतर पंतप्रधान सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो ह्याच्या मार्गदर्शनाखाली लिस्बन पुन्हा बांधले गेले.

भूगोल[संपादन]

ताहो नदीच्या मुखाजवळ वसलेले लिस्बन हे युरोपातील सर्वात पश्चिमेकडील राजधानीचे शहर आहे. लिस्बन शहराचे क्षेत्रफळ ८४.९४ चौरस किमी (३२.८० चौ. मैल) इतके आहे.

हवामान[संपादन]

लिस्बनमधील हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात. संपूर्ण युरोपामध्ये लिस्बन येथे हिवाळ्यादरम्यान सर्वात उबदार हवामान अनुभवायला मिळते.

लिस्बन साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 22.6
(72.7)
24.8
(76.6)
29.4
(84.9)
32.2
(90)
34.8
(94.6)
41.5
(106.7)
40.6
(105.1)
41.8
(107.2)
37.3
(99.1)
32.6
(90.7)
25.3
(77.5)
23.2
(73.8)
41.8
(107.2)
सरासरी कमाल °से (°फॅ) 14.8
(58.6)
16.2
(61.2)
18.8
(65.8)
19.8
(67.6)
22.1
(71.8)
25.7
(78.3)
27.9
(82.2)
28.3
(82.9)
26.5
(79.7)
22.5
(72.5)
18.2
(64.8)
15.3
(59.5)
21.34
(70.41)
दैनंदिन °से (°फॅ) 11.6
(52.9)
12.7
(54.9)
14.9
(58.8)
15.9
(60.6)
18.0
(64.4)
21.2
(70.2)
23.1
(73.6)
23.5
(74.3)
22.1
(71.8)
18.8
(65.8)
15.0
(59)
12.4
(54.3)
17.43
(63.38)
सरासरी किमान °से (°फॅ) 8.3
(46.9)
9.1
(48.4)
11.0
(51.8)
11.9
(53.4)
13.9
(57)
16.6
(61.9)
18.2
(64.8)
18.6
(65.5)
17.6
(63.7)
15.1
(59.2)
11.8
(53.2)
9.4
(48.9)
13.46
(56.23)
विक्रमी किमान °से (°फॅ) 1.0
(33.8)
1.2
(34.2)
0.2
(32.4)
5.5
(41.9)
6.8
(44.2)
10.4
(50.7)
14.1
(57.4)
14.7
(58.5)
12.1
(53.8)
9.2
(48.6)
4.3
(39.7)
2.1
(35.8)
0.2
(32.4)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 99.9
(3.933)
84.9
(3.343)
53.2
(2.094)
68.1
(2.681)
53.6
(2.11)
15.9
(0.626)
4.2
(0.165)
6.2
(0.244)
32.9
(1.295)
100.8
(3.969)
127.6
(5.024)
126.7
(4.988)
774
(30.472)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 0.1 mm) 15.0 15.0 13.0 12.0 8.0 5.0 2.0 2.0 6.0 11.0 14.0 14.0 117
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 142.6 156.6 207.7 234.0 291.4 303.0 353.4 344.1 261.0 213.9 156.0 142.6 २,८०६.३
स्रोत: [१], [२] for data of avg. precipitation days & sunshine hours

अर्थव्यवस्था[संपादन]

सध्या लिस्बन पोर्तुगालमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून लिस्बन क्षेत्र पोर्तुगालच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. येथील बंदर युरोपामधील सर्वात वर्दळीच्या बंदरांपैकी एक आहे. २०१० सालापासून पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे लिस्बनची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत.

वाहतूक[संपादन]

लिस्बनमधील शहरी वाहतूक रेल्वे, रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी लिस्बन मेट्रो तसेच पारंपारिक परिवहनासाठी ट्राम सेवा जबाबदार आहे. १९९८ साली खुला करण्यात आलेला येथील वास्को दा गामा पूल युरोपामधील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. लिस्बन पोर्तेला विमानतळ हा पोर्तुगालमधील सर्वात मोठा विमानतळ लिस्बन शहरामध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जातो. टी.ए.पी. पोर्तुगाल ह्या पोर्तुगालमधील राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा लिस्बनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. येथील एस्तादियो दा लुझ ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २००४ तसेच २०१४ युएफा चँपियन्स लीग ह्या स्पर्धांचे अंतिम सामने खेळवले गेले होते. एस्तादियो होजे अल्वालादे हे लिस्बनमधील दुसरे प्रमुख फुटबॉल स्टेडियम आहे. पोर्तुगीज प्रिमेइरा लीगा ह्या लीगमध्ये खेळणारे एस.एल. बेनफीका, स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगालसी.एफ. ओस बेलेनेन्सेस हे तीन प्रमुख क्लब लिस्बनमध्ये स्थित आहेत. पोर्तुगाल फुटबॉल संघ आपले सामने लिस्बन महानगरामधूनच खेळतो.

आंतरराष्ट्रीय संबंध[संपादन]

लिस्बन शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

शहर देश तारीख
बिसाउ[३][४] गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ 1983-05-31
झाग्रेब[३] क्रोएशिया ध्वज क्रोएशिया 1977-03-05
काराकास[३][४] व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला 1992-10-07
बुडापेस्ट[३][४] हंगेरी ध्वज हंगेरी 1992-09-28
गिमार्येस[३][४] पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल 1993-06-29
साओ टोमे[३][४] साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप 1983-05-26
प्राग[३][४] Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 2011-06-13
लुआंडा[३][४] अँगोला ध्वज अँगोला 1988-10-11
वॉटरबरी Flag of the United States अमेरिका 1996-07-14
काचेउ[३][४] गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ 1988-11-14
मकाओ[३][४] मकाओ ध्वज मकाओ 1982-05-20
माद्रिद[३][४] स्पेन ध्वज स्पेन 1979-05-31
मलाक्का[३][४] मलेशिया ध्वज मलेशिया 1984-01-19
मापुतो[३][४] मोझांबिक ध्वज मोझांबिक 1982-03-20
मेक्सिको सिटी[५] मेक्सिको ध्वज मेक्सिको 1982-10-12
ब्राझिलिया[३] ब्राझील ध्वज ब्राझील 1985-06-28
प्राईया[३][४] केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे 1983-05-26
रबात[३][४] मोरोक्को ध्वज मोरोक्को 1980-06-10
रियो दि जानेरो[३] ब्राझील ध्वज ब्राझील 1985-04-03
ला पाझ[३] बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया 1983-08-02
साल्व्हादोर दा बाईया[३][४] ब्राझील ध्वज ब्राझील 2007-07-10
साओ पाउलो[३][४] ब्राझील ध्वज ब्राझील 2007-07-10

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Wikivoyage-Logo-v3-icon.svg विकिव्हॉयेज वरील लिस्बन पर्यटन गाईड (इंग्रजी)