इस्रायलचे पंतप्रधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इस्रायलचे पंतप्रधान
Flag of the Prime Minister of Israel.svg
इस्रायलचे पंतप्रधानांचा ध्वज
Benjamin Netanyahu portrait.jpg
पदस्थ
बिन्यामिन नेतान्याहू

३१ मार्च २००९ पासून
शैली महामहिम
नियुक्ती कर्ता इस्रायलचे राष्ट्रपती
कालावधी ४ वर्ष (कमाल)
निर्मिती १४ मे १९४८
पहिले पदधारक डेव्हिड बेन-गुरियन
संकेतस्थळ pmo.gov.il

इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायल देशाचे शासनप्रमुख आहेत व इस्रायली राजकारणात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. पंतप्रधानांची नियुक्ती इस्रायलचे राष्ट्रपती करतात. १४ मे १९४८ला इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणे नंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून पंतप्रधान झाले व पहिल्या निवडणुकीत तेच निवडुन आले. गोल्डा मायर या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. ३१ मार्च २००९ पासुन बिन्यामिन नेतान्याहू सध्याचे पदस्त पंतप्रधान आहेत. पंतप्रधान असताना लेव्हि एश्कॉल यांचे निधन झाले (१९६९) व यित्झाक राबिन यांची हत्या (१९९५) करण्यात आली.

पात्रता, अधिकार आणि कर्तव्ये[संपादन]

इस्त्रायलची लिखीत राज्यघटना नाही; पण अनेक मूलभूत कायदे आहेत जे एखाद्या देशाच्या राज्यघटने सारखे महत्त्वाचे आहेत. इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायलचे नागरीक असणे व ते क्नेसेट मध्ये निवडुन यावे गरजेचे आहे. पंतप्रधान व इतर मंत्रीमंडळ मिळुन इस्रायलचे सरकार बनते. उपपंतप्रधान या पदाची पण सोय पण मूलभूत कायद्यात आहे. निवडणुकी नंतर पंतप्रधान होण्यासाठी बहुसंख्य पाठींबा असलेला व्यक्ति इस्रायलच्या राष्ट्रपतींकडे आपली उमेदवारी देतो आणि निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्या नंतर सात दिवसाच्या आत राष्ट्रपती पंतप्रधान जाहिर होतो. पंतप्रधानांच्या मृत्युच्या वेळी हा कालावधी चौदा दिवसांचा असतो ज्यात नव्या अथवा प्रभारी पंतप्रधानाची नियुक्ती होते.[१]

यादी[संपादन]

एकूण बारा लोक इस्रायलचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणापत्र वर १४ मे १९४८ ला स्वाक्षरी करण्यात आले. त्यानंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून १४ मे १९४८ ते १० मार्च १९४९ पंतप्रधान होते. पंतप्रधानांच्या पहिल्या निवडणुकीत बेन-गुरियन निवडले गेले. पुढे अनेक वेळा ते निवडुन आले. २६ जानेवारी १९५४ पदभार सांभाळणारे मोशे शॅरेड हे इस्रायलचे दुसरे पंतप्रधान ठरले. ३ नोव्हेंबर १९५५ ला बेन-गुरियन पुन्हा विजयी ठरले. व एकुण १३ वर्ष आणि १२७ दिवस ते पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. इस्रायलचे पंतप्रधान म्हणून पदस्त असण्याचा हा सर्वात जास्त कालावधी आहे. तिसरे पंतप्रधान लेव्हि एश्कॉल २६ जून १९६३ पासुन त्यांच्या मृत्यू पर्यंत, २६ फेब्रुवारी १९६९, पदस्त होते. त्यांच्या निधनानंतर यिगाल एलोन हे प्रभारी पंतप्रधान झाले ज्यानंतर गोल्डा मायर ह्या १७ मार्च १९६९ला देशाच्या चौथ्या पंतप्रधान झाल्या. मायर देशाच्या पहिल्या व आजतागायत एकमेव महिला पंतप्रधान होत्या. १९९५ मध्ये यित्झाक राबिन पंतप्रधान पदी असताना तेल अवीवला एका शांतता रॅली मध्ये त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली.[२]

खालील नमुद केलेली पंतप्रधानांची यादी आहे:[३]

रंग दल
मपई / इस्रायली लेबर पार्टी / अलाइनमेंट (इस्रायल)
लिकुड
कदिमा
क्र. नाव
(जन्म–मृत्यू)
चित्र राजकीय पक्ष कार्यकाल नियुक्त
(क्नेसेट)
डेव्हिड बेन-गुरियन
(१८८६–१९७३)
Ben-Gurion.jpg मपई १४ मे १९४८ १० मार्च १९४९
१० मार्च १९४९ १ नोव्हेंबर १९५० १९४९ (१वा)
१ नोव्हेंबर १९५० ८ ऑक्टोबर १९५१
८ ऑक्टोबर १९५१ २४ डिसेंबर १९५२ १९५१ (२वा)
२४ डिसेंबर १९५२ २६ जानेवारी १९५४
मोशे शॅरेड
(१८९४-१९६५)
Moshe Sharett (1948).jpg मपई २६ जानेवारी १९५४ २९ जून १९५५
२९ जून १९५५ ३ नोव्हेंबर १९५५
() डेव्हिड बेन-गुरियन
(१८८६-१९७३)
Ben-Gurion.jpg मपई ३ नोव्हेंबर १९५५ ७ जानेवारी १९५८ १९५५ (३वा)
७ जानेवारी १९५८ १७ डिसेंबर १९५९
१७ डिसेंबर १९५९ २ नोव्हेंबर १९६१ १९५९ (४वा)
२ नोव्हेंबर १९६१ २६ जून १९६३ १९६१ (५वा)
लेव्हि एश्कॉल
(१८९५-१९६९)
Levi Eshko portrait 1964.jpg मपई २६ जून १९६३ २२ डिसेंबर १९६४
२२ डिसेंबर १९६४ १२ जानेवारी १९६६
अलाइनमेंट (इस्रायल)
मपई/इस्रायली लेबर पार्टी
१२ जानेवारी १९६६ २६ फेब्रुवारी १९६९ १९६५ (६वा)
यिगाल एलोन
(प्रभारी)
(१९१८–१९८०)
Yigal Allon.jpg अलाइनमेंट (इस्रायल)
इस्रायली लेबर पार्टी
२६ फेब्रुवारी १९६९ १७ मार्च १९६९
गोल्डा मायर
(१८९८-१९७८)
Golda Meir 03265u.jpg अलाइनमेंट (इस्रायल)
इस्रायली लेबर पार्टी
१७ मार्च १९६९ १५ डिसेंबर १९६९
१५ डिसेंबर १९६९ १० मार्च १९७४ १९६९ (७वा)
१० मार्च १९७४ ३ जून १९७४ १९७३ (८वा)
यित्झाक राबिन
(१९२२-१९९५)
Flickr - Israel Defense Forces - Life of Lt. Gen. Yitzhak Rabin, 7th IDF Chief of Staff in photos (11).jpg अलाइनमेंट (इस्रायल)
इस्रायली लेबर पार्टी
३ जून १९७४ २० जून १९७७
मेनाकेम बेगिन
(१९१३-१९९२)
Menachem Begin, Andrews AFB, 1978.JPG लिकुड २० जून १९७७ ५ ऑगस्ट १९८१ १९७७ (९वा)
५ ऑगस्ट १९८१ १० ऑक्टोबर १९८३ १९८१ (१०वा)
यित्झाक शामिर
(१९१५-२०१२)
Yitzhak Shamir (1980).jpg लिकुड १० ऑक्टोबर १९८३ १३ सप्टेंबर 1984
शिमॉन पेरेझ
(१९२३-२०१६)
Shimon Peres, WJC Plenary Assembly, 2009.jpg अलाइनमेंट (इस्रायल)
इस्रायली लेबर पार्टी
१३ सप्टेंबर १९८४ २० ऑक्टोबर १९८६ १९८४ (११वा)
() यित्झाक शामिर
(१९१५-२०१२)
Yitzhak Shamir (1980).jpg लिकुड २० ऑक्टोबर १९८६ २२ डिसेंबर १९८८
२२ डिसेंबर १९८८ ११ जून १९९० १९८८ (१२वा)
११ जून १९९० १३ जुलै १९९२
() यित्झाक राबिन
(१९२२-१९९५)
Flickr - Israel Defense Forces - Life of Lt. Gen. Yitzhak Rabin, 7th IDF Chief of Staff in photos (11).jpg इस्रायली लेबर पार्टी १३ जुलै १९९२ ४ नोव्हेंबर १९९५[२] १९९२ (१३वा)
() शिमॉन पेरेझ
(१९२३-२०१६)
Shimon Peres, WJC Plenary Assembly, 2009.jpg इस्रायली लेबर पार्टी (प्रभारी, ४ नोव्हेंबर १९९५)
२२ नोव्हेंबर १९९५
१८ जून १९९६
बिन्यामिन नेतान्याहू
(१९४९–)
Benjamin Netanyahu 2012.jpg लिकुड १८ जून १९९६ ६ जुलै १९९९ १९९६ १४वा
१० एहूद बराक
(१९४२–)
Ehud Barak official.jpg वन इस्रायल
इस्रायली लेबर पार्टी
६ जुलै १९९९ ७ मार्च २००१ १९९९ १५वा


११
एरियेल शॅरन
(१९२८-२०१४)
Ariel Sharon, by Jim Wallace (Smithsonian Institution).jpg लिकुड ७ मार्च २००१ २८ फेब्रुवारी २००३ २००१
२८ फेब्रुवारी २००३ २१ नोव्हेंबर २००५ २००३ (१६वा)
कदिमा २१ नोव्हेंबर २००५ (४ जानेवारी २००६)
१४ एप्रिल २००६
१२ एहूद ओल्मर्ट
(१९४५–)
Ehud Olmert 2006May23.jpg कदिमा (प्रभारी, ४ जानेवारी २००६)
१४ एप्रिल २००६
४ मे २००६
४ मे २००६ ३१ मार्च २००९ २००६ (१७वा)
() बिन्यामिन नेतान्याहू
(१९४९–)
Benjamin Netanyahu 2012.jpg लिकुड ३१ मार्च २००९ १८ मार्च २०१३ २००९ (१८वा)
१८ मार्च २०१३ ६ मे २०१५ २०१३ (१९वा)
६ मे २०१५[४] पदस्त २०१५ (२०वा)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Basic Law: The Government (2001)" (इंग्रजी मजकूर). ७ मार्च २००१. १४ नोवेंबर २०१७ रोजी पाहिले. 
  2. a b "Yitzhak Rabin assassinated" (इंग्रजी मजकूर). हिस्ट्री.कॅम. १६ नोवेंबर २०१७ रोजी पाहिले. 
  3. ^ "All Prime Ministers of Israel" (इंग्रजी मजकूर). १४ नोवेंबर २०१७ रोजी पाहिले. 
  4. ^ जोडी रॅडरेन (६ मे २०१५). "Netanyahu Forms an Israeli Government, With Minutes to Spare" (इंग्रजी मजकूर). न्यू यॉर्क टाइम्स. १६ नोवेंबर २०१७ रोजी पाहिले.