सुरत (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुरत हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सुरत शहरासह सुरत जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचे वरिष्ठ नेते काशीराम राणा हे सुरतमधून सलग ६ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

खासदार[संपादन]

भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई सुरतमधून सलग ५ वेळा निवडून आले होते.
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ नानाभाई देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ मोरारजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ मोरारजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ मोरारजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ मोरारजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ)
सहावी लोकसभा १९७७-८० मोरारजी देसाई जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ सी.डी. पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ सी.डी. पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ काशीराम राणा भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ काशीराम राणा भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ काशीराम राणा भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ काशीराम राणा भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ काशीराम राणा भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ काशीराम राणा भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ दर्शनाबेन जरदोश भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]