वासुदेव वामन पाटणकर
वासुदेव वामन पाटणकर, अर्थात "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर (२९ डिसेंबर इ.स. १९०८- २० जून, इ.स. १९९७) हे मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी होते.
जीवन
[संपादन]वासुदेव वामन पाटणकर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते.
इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला [१]. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत [१].
उमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता व सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते [२].
शायरी व कार्यक्रम
[संपादन]पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली [२].
रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त दरवर्षी२९ डिसेंबरला गझलेमध्ये उत्तम योगदान देण्याऱ्याला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.[३]
भाऊसाहेब पाटणकर यांचे प्रकाशित साहित्य
[संपादन]पुस्तकाचे नाव | प्रकाशनवर्ष (इ.स.) | साहित्यप्रकार | प्रकाशन |
---|---|---|---|
जिंदादिल | |||
दोस्तहो | इ.स. २००५ | काव्यसंग्रह | अरुण प्रकाशन |
मराठी मुशायरा | |||
मराठी शायरी | |||
मैफिल | उत्कर्ष प्रकाशन |
सत्कार
[संपादन]ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या रंगत संगत प्रतिष्ठानने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा यवतमाळ येथे आणि एकदा पुण्यात भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते.
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ a b "भाऊसाहेबांच्या पत्नी इंदूताई पाटणकर कालवश". २० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ a b गंधे, आरती. "दोस्तहो..." २० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ "पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |