दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१ | |||||
वेस्ट इंडीज | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १० जून – ३ जुलै २०२१ | ||||
संघनायक | क्रेग ब्रेथवेट (कसोटी) कीरॉन पोलार्ड (ट्वेंटी२०) |
डीन एल्गार (कसोटी) टेंबा बवुमा (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जर्मेन ब्लॅकवूड (८८) | क्विंटन डी कॉक (२३७) | |||
सर्वाधिक बळी | केमार रोच (९) | कागिसो रबाडा (११) | |||
मालिकावीर | क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इव्हिन लुईस (१७८) | क्विंटन डी कॉक (२५५) | |||
सर्वाधिक बळी | ड्वेन ब्राव्हो (१०) | कागिसो रबाडा (७) तबरेझ शम्सी (७) | |||
मालिकावीर | तबरेझ शम्सी (दक्षिण आफ्रिका) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून - जुलै २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने २०१० नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविली गेली.
कसोटी सामने सेंट लुसिया मधील डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले तर सर्व ट्वेंटी२० सामने ग्रेनेडा मधील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकत दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. दुसरी कसोटी देखील १५८ धावांच्या फरकाने जिंकत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने विजय नोंदवला. २ऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज ने हॅट्रीक घेतली. केशव हा कसोटीमध्ये हॅट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू ठरला. या आधी जॉफ ग्रिफिन ने २४ जून १९६० रोजी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध हॅट्रीक घेतली होती.
वेस्ट इंडीजने पहिली ट्वेंटी२० जिंकत मालिकेत आघाडी घेतली खरी पण दुसऱ्या ट्वेंटी२०त दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणून ठेवली. २९ जून २०२१ रोजी तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे दिवंगत व्यवस्थापक गुलाम राजा यांच्या स्मरणार्थ दक्षिण आफ्रिका संघ काळ्या पट्ट्या दंडाला बांधून मैदानात उतरला. दोन्ही संघांनी दोन मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तोच सामना दक्षिण आफ्रिकेने १ धावेने जिंकला. तबरेझ शम्सी याने दक्षिण आफ्रिकेचा विजय गुलाम राजांना समर्पित केला. लागोपाठ दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने २-१ ने आघाडी मिळवली. चौथा सामना वेस्ट इंडीजने जिंकत मालिका पुन्हा २-२ अश्या बरोबरीच्या टप्प्यात आणून ठेवली. पाचव्या आणि निर्णायक ट्वेंटी२० सामन्यात एडन मार्करम याच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जेडन सील्स (वे.इं.), कीगन पीटरसन आणि काइल व्हेरेइन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- वेस्ट इंडीजचा कीरन पॉवेलने नक्रुमा बॉनरच्या जागी पूर्णवेळ बदली खेळाडू म्हणून उर्वरीत सामना खेळला.
- २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका - ६०, वेस्ट इंडीज - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
- २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका - ६०, वेस्ट इंडीज - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- अकिल होसीन (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.