दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९१-९२
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९१-९२ | |||||
वेस्ट इंडीज | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ७ – २३ एप्रिल १९९२ | ||||
संघनायक | रिची रिचर्डसन | केप्लर वेसल्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने एप्रिल १९९२ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिका देखील वेस्ट इंडीजने ३-० ने जिंकली.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यामधील ही पहिली द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका होती. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन झाल्यानंतरचा हा पहिला कसोटी सामना होता. याआधी दक्षिण आफ्रिकेने तब्बल २१ वर्षांपूर्वी ५ मार्च १९७० रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकी संघ बहिष्कार होण्याच्या आधी केवळ श्वेतवर्णीय देशांच्या बरोबरच क्रिकेट खेळायचा. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा हा वेस्ट इंडीज दौरा खऱ्या अर्थाने वर्णभेदाच्या मुद्द्याला कठोर उत्तर होते.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ७ एप्रिल १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- कोरी व्हान झिल (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]१८-२३ एप्रिल १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका मधील पहिला कसोटी सामना.
- दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला.
- वेस्ट इंडीजने कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- दक्षिण आफ्रिकेचा ५ मार्च १९७० नंतरचा पहिला वहिला कसोटी सामना.
- डेव्हिड विल्यम्स, जिमी ॲडम्स, केनी बेंजामिन (वे.इं.), ॲड्रायन कुइपर, ॲलन डोनाल्ड, अँड्रु हडसन, डेव्ह रिचर्डसन, हान्सी क्रोन्ये, मार्क रशमियर, मेरिक प्रिंगल, पीटर कर्स्टन, रिचर्ड स्नेल, टेर्टियस बॉश (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळल्यानंतर या सामन्याद्वारे केपलर वेसल्स याने दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटी पदार्पण केले.