पाटणा मेट्रो (हिंदी: पटना मेट्रो ) भारतातील बिहारमधील पाटणा शहरातील एक जलद परिवहन व्यवस्था आहे. [२][३] ही प्राणी राज्य मालकीच्या पाटणा मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मालकी आहे आणि या महामंडळाद्वारेच संचालित असेल. [४] ही प्रणाली सार्वजनिक खाजगी भागीदारी मोड अंतर्गत बांधले जात आहे आणि यासाठी ₹१३,४११.७७ कोटी खर्च अपेक्षित आहे. [५][६] २०२४ पर्यंत, पाटणा मेट्रो तीन मार्गांवर चालणे अपेक्षित आहे. [५] पहिला टप्प्यात पूर्व-पश्चिम मार्गिका आणि उत्तर-दक्षिण मार्गिका - म्हणजे, दानापूर ते मीठापूर आणि पाटणा रेल्वे स्थानक ते पाटलीपुत्र बस टर्मिनल ISBT,असेल ज्यात २३.३० किलोमीटर (१४.४८मैल) उन्नत ट्रॅक आणि १६.३० किलोमीटर (१०.१३मैल) भूमिगत ट्रॅक असेल. [७][८]
दुसऱ्या टप्प्यात, बायपास चौक मीठापूर ते दीदरगंज पर्यंत ट्रान्सपोर्ट नगर मार्गे, राष्ट्रीय महामार्ग ३० बायपासला लागून १६.७५ किलोमीटर (१०.४१मैल); ते बायपास रोडच्या बाजूने उंचावलेला मेट्रो मार्ग असेल. तिसरा टप्पा, बायपास चौक मीठापूर ते फुलवारी शरीफ एम्स पर्यंत अनीसाबाद राष्ट्रीय महामार्ग ३० बायपास रोडच्या बाजूने १८.७५ किलोमीटर (११.६५मैल), उन्नत केले जाईल. [९] चौथा टप्पा दिदरगंग ते फतुहा जंक्शन पर्यंत आहे.
↑IANS (17 जून 2014). "Patna gets nod for metro train". Business Standard India. 5 ऑक्टोबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 एप्रिल 2018 रोजी पाहिले– Business Standard द्वारे.