नवी मुंबई मेट्रो
नवी मुंबई मेट्रो | |
---|---|
![]() | |
स्थान | नवी मुंबई |
वाहतूक प्रकार | जलद वाहतूक |
मार्ग | ६ (प्रस्तावित) |
मार्ग लांबी | कि.मी. |
एकुण स्थानके | १७ |
सेवेस आरंभ | डिसेंबर 3०१4 |
नवी मुंबई मेट्रो ही भारताच्या नवी मुंबई शहरामध्ये बांधली जात असलेली एक रेल्वे जलद वाहतूक आहे. हा प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) हाती घेतला असून ह्या प्रकल्पात एकूण ११७.३ किमी लांबीच्या ६ मार्गांची प्रस्तावना करण्यात आली आहे. ह्यांपैकी सी.बी.डी. बेलापूर- खारघर- तळोजा- पेंधर- खांदेश्वर- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या मार्गाच्या बेलापूर ते पेंधर ह्या ११.१ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम सुरू असून डिसेंबर २०१४ सालापर्यंत हा मार्ग खुला होईल असा अंदाज बांधला गेला आहे. ह्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १,९८५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- मराठी भाषेमधील अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-10-29 at the Wayback Machine.