हैदराबाद मेट्रो
Appearance
(हैद्राबाद मेट्रो या पानावरून पुनर्निर्देशित)
हैदराबाद मेट्रो | |||
---|---|---|---|
मालकी हक्क |
लार्सन अँड टूब्रो (९० टक्के) तेलंगणा सरकार (१० टक्के) | ||
स्थान | हैद्राबाद, तेलंगणा | ||
वाहतूक प्रकार | जलद परिवहन | ||
मार्ग | ३ | ||
मार्ग लांबी | ६७ कि.मी. | ||
एकुण स्थानके | ५७ | ||
दैनंदिन प्रवासी संख्या | ४.९ लाख (फेब्रुवारी २०२०) | ||
सेवेस आरंभ | २९ नोव्हेंबर २०१७ | ||
|
हैदराबाद मेट्रो (तेलुगू: హైదరాబాద్ మెట్రో) ही भारताच्या हैद्राबाद शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. दिल्ली मेट्रोखालोखाल भारतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या ह्या मेट्रोच्या ३ मार्गिका असून ५७ स्थानके कार्यरत आहेत. सार्वजनिक-खाजगी भागेदारी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या ह्या मेट्रोचे उद्घाटन २८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते केले गेले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत