नोएडा मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नोएडा मेट्रो
मालकी हक्क नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन
स्थान नोएडाग्रेटर नोएडा, गौतम बुद्ध नगर जिल्हा, उत्तर प्रदेश
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी २९.७ कि.मी.
एकुण स्थानके २१
सेवेस आरंभ २५ जानेवारी २०१९
मार्ग नकाशा

Noida Metro Map.svg

नोएडा मेट्रो ही भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामधील नोएडाग्रेटर नोएडा ह्या शहरांतील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. सध्या नोएडा मेट्रोची १ मार्गिका कार्यरत असून ती नोएडा सेक्टर ५१ मधील दिल्ली मेट्रोच्या निळ्या मार्गिकेपासून सुरू होते. सुमारे ३० किमी लांबीची व २१ स्थानके असणारी ही मार्गिका साधारणपणे नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्गाला समांतर धावते.

नोएडा मेट्रोचे उद्घाटन २५ जानेवारी २०१९ रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

बाहय् दुवे[संपादन]