ठाणे मेट्रो
| ठाणे मेट्रो | |
|---|---|
|
| |
| प्रकार | मेट्रो |
| प्रदेश | ठाणे, महाराष्ट्र, भारत |
| स्थानके | २२ |
| नियोजित उद्घाटन | २०२९ (नियोजित) |
| चालक | महा मेट्रो |
| तांत्रिक माहिती | |
| मार्गाची लांबी | १९ किमी (१२ मैल) |
| ट्रॅकची संख्या | २ |
ठाणे मेट्रो ही ठाणे, महाराष्ट्र येथे सेवा देणारी एक निर्माणाधीन मेट्रो सेवा आहे. मुंबई मेट्रोच्या बांधकामाधीन हिरवी मार्गिका ४ आणि केशरी मार्गिका ५ नंतर ठाण्यातून धावणारी ही तिसरी मेट्रो मार्गिका असेल. या मार्गिकेची लांबी २९ किमी इतकी प्रस्तावित आहे आणि या मार्गिकेवर २२ स्थानके असल्याचे सांगितले आहे. प्रस्तावित २९ पैकी, ३ किमी (१.९ mi) आणि २ स्थानके भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे तर उर्वरित स्थानके उन्नत करण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेशातील इतर मेट्रो मार्गांपेक्षा वेगळे, ही मार्गिका ठाणे जंक्शनपासून वागळे इस्टेट, मानपाडा, वाघबीळ, बाळकुम, राबोडी आणि ठाणे रेल्वे स्थानक मार्गे ठाणे जंक्शनपर्यंत जाणारा एक वर्तुळ तयार करते. [१] या मार्गाला केंद्र सरकारने १४ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिली होती आणि ही मार्गिका २०२९ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. [२]
इतिहास
[संपादन]प्रस्ताव
[संपादन]ही मारिका सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेने प्रस्तावित केली होती. त्यावेळी ठाण्याच्या मुख्य भागातून जाणारी २९ किमी लांबीची मार्गिका प्रस्तावित करण्यात आली. सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेने हा मार्ग एक अवजड रेल्वे प्रकल्प म्हणून प्रस्तावित केला होता. डिसेंबर २०१८ मध्ये ठाणे महानगरपालिकेने सुरुवातीचा मसुदा मंजूर केला होता आणि त्यानंतर तो पुढील महिन्यात राज्य सरकारला सादर करण्यात आला. राज्य सरकारने ६ रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली. [३] त्यानंतर, आर्थिक अडचणींमुळे ही लाईन स्थगित करण्यात आली. नंतर डिसेंबर २०२० मध्ये, महानगरपालिकेने अनेक बदलांसह प्रस्ताव सुधारित केला. यावेळी अवजड रेल्वे मार्ग तयार करण्या ऐवजी, खर्च कमी करण्यासाठी या मार्गिकेचे लघुभर रेल्वेमध्ये रूपांतर करण्यात आले. प्रत्येक गाडीत डब्यांचीसंख्या ६ वरून ३ डब्यांपर्यंत कमी करण्यात आली. [४] ठाणे सारख्या शहरासाठी लघुभर रेल्वे प्रकल्प पुरेसा नाही, असे म्हणत या सुधारित प्रस्तावावर जनतेकडून टीका झाली. तथापि, २०२३ मध्ये, ठाणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा लघुभर रेल्वेचा प्रस्ताव रद्द केला आणि ही मार्गिका पुन्हा अवजड रेल्वेमध्ये बदलली गेली. अंतिम मसुद्यात मुंबई मेट्रोच्या बांधकामाधीन मार्गिका ४ आणि मार्गिका ५ सह प्रस्तावित अदलाबदल सुविधा होत्या. [५] ठाणे रेल्वे स्थानक आणि सिडको बस टर्मिनलजवळ ही मार्गिका भुयारी करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
१२,२०० कोटी (US$२.७१ अब्ज) चा खर्च येणाऱ्या या मार्गिकेला अखेर केंद्र सरकारने १४ ऑगस्ट २०२४ रोजी आणि राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२४ रोजी मान्यता दिली. [६] [७] सुरुवातीला हा प्रकल्प ठाणे महानगरपालिकेकडून राबवला जाणार होता. पण त्यानांतर, महा मेट्रोला या मार्गाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले. [८] अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी या मार्गाचा पाया घातला. [९] [१०] [११] [१२]
खर्च आणि निधी
[संपादन]या प्रकल्पासाठी लागणारा खर्च
१२,२००.१० कोटी (US$२.७१ अब्ज) असण्याचा अंदाज आहे. या साठी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही समान समभागाने योगदान देण्याची अपेक्षा आहे. [१३] [१४]
| निधी | ||
|---|---|---|
| स्रोत | रक्कम | % |
| केंद्र सरकारकडून इक्विटी[मराठी शब्द सुचवा] | ९.५१ | |
| राज्य सरकारकडून इक्विटी[मराठी शब्द सुचवा] | ९.५१ | |
| केंद्र सरकारकडून उपकर्ज | २.९२ | |
| राज्य सरकारकडून उपकर्ज | २.९२ | |
| स्थानिक संस्थांकडून योगदान | १.६५ | |
| राज्य सरकारकडून जमीन आणि संशोधन आणि पुनर्विकासासाठी उपकर्ज | २८.२२ | |
| राज्य सरकारकडून राज्य कर | ५.०८ | |
| राज्य सरकारकडून बांधकामादरम्यानचा रस | २.५८ | |
| द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कर्जे | ३७.३२ | |
| पीपीपी घटक | १.०८ | |
| एकूण | १०० | |
स्थानके
[संपादन]या मार्गावर २२ स्थानके प्रस्तावित आहेत. ठाणे मेट्रोची ही मार्गिका वर्तुळाकार वलयी म्हणून कार्यरत करण्याचा प्रस्ताव आहे. २२ प्रस्तावित स्थानकांपैकी २० स्थानके उन्नत करण्याचे, तर ठाणे रेल्वे स्थानकाजवळील २ स्थानके भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गिकेत मुंबई मेट्रोच्या बांधकामाधीन मार्गिका ४ आणि मार्गिका ५ सोबत अदलाबादल प्रस्तावित आहेत. [१५] [१६]
अदलाबदल
[संपादन]खालील स्थानकांवर इतर रेल्वे मार्गांना जोडणाऱ्या प्रवासी अदलाबदलीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील: [१७] [१८]
- ठाणे जंक्शन ( ठाणे रेल्वे स्थानक आणि सिडको बस अंत्यस्थानकाला जोडते);
- रैला देवी ( गायमुख आणि भक्ती पार्क (वडाळा) दरम्यान जाणाऱ्या बांधकामाधीन मार्गिका ४ ला जोडते);
- लोकमान्य नगर बस आगार (टीएमटी बस अंत्यस्थानकाला जोडतो);
- डोंगरीपाडा ( गायमुख आणि भक्ती पार्क (वडाळा) दरम्यान जाणाऱ्या बांधकामाधीन मार्गिका ४ ला जोडते);
- बाळकुम नाका ( कापूरबावडी आणि कल्याण एपीएमसी दरम्यान जाणाऱ्या मारिका ५ ला जोडतो)
| ठाणे मेट्रो | ||||
|---|---|---|---|---|
| क्र | स्थानकाचे नाव | प्रस्तावित उदघाट्न | अदलाबदल | स्थानकांची मांडणी |
| १ | ठाणे जंक्शन | २०२९ | भुयारी | |
| २ | नवीन ठाणे | २०२९ | भुयारी | |
| ३ | रायला देवी | २०२९ | मुंबई मेट्रो मार्गिका ४
(निर्माणाधीन) |
उन्नत |
| ४ | वाघा सर्कल | २०२९ | उन्नत | |
| ५ | लोकमान्य नगर बस डेपो | २०२९ | उन्नत | |
| ६ | शिवाई नगर | २०२९ | उन्नत | |
| ७ | नीलकंठ टर्मिनल | २०२९ | उन्नत | |
| ८ | गांधी नगर | २०२९ | उन्नत | |
| ९ | डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यग्रह | २०२९ | उन्नत | |
| १० | मानपाडा | २०२९ | उन्नत | |
| ११ | डोंगरीपाडा | २०२९ | मुंबई मेट्रो मार्गिका ४
(निर्माणाधीन) |
उन्नत |
| १२ | विजय नगरी | २०२९ | उन्नत | |
| १३ | वाघबिल | २०२९ | उन्नत | |
| १४ | वॉटर फ्रंट | २०२९ | उन्नत | |
| १५ | पाटलीपाडा | २०२९ | उन्नत | |
| १६ | आझाद नगर बस स्टॉप | २०२९ | उन्नत | |
| १७ | मनोरमा नगर | २०२९ | उन्नत | |
| १८ | कोलशेत औद्योगिक क्षेत्र | २०२९ | उन्नत | |
| १९ | बाळकुम नाका | २०२९ | मुंबई मेट्रो मार्गिका ५
(निर्माणाधीन) |
उन्नत |
| २० | बाळकुंपडा | २०२९ | उन्नत | |
| २१ | राबोडी | २०२९ | उन्नत | |
| २२ | शिवाजी चौक | २०२९ | उन्नत | |
आधारभूत संरचना
[संपादन]आगार
[संपादन]या मार्गावर कासारवडवली येथे प्रस्तावित आगार आहे. [१९] या आगारचा आकार १८ हेक्टर एवढा मोठा असण्याची अपेक्षा आहे आणि या आगारासाठी तपशीलवार संकल्पना सल्लागारांना जानेवारी २०२५ मध्ये T1-011/DDC-02/2025 या कराराखाली आमंत्रित करण्यात आले होते. [२०]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Thane metro project attracts five consultants for initial design phase". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2024-09-03. 2024-09-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "Cabinet approves Thane integral Ring Metro Rail Project". www.pib.gov.in (इंग्रजी भाषेत). 2024-11-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ Deshpande, Alok (2019-03-05). "State clears internal Metro for Thane". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "Thane may get 'Chhota Metro' with 26 stations". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2020-12-19. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ Ramnani, Vandana (2024-08-17). "Cabinet's approval of three metro projects in Maharashtra and Bengaluru expected to lead to growth of real estate sector". Hindustan Times.
- ↑ "Cabinet approves Thane integral Ring Metro Rail Project". Press Information Bureau of India. 2024-08-16.
- ↑ www.ETInfra.com. "Maha Cabinet clears over Rs 12,200 cr Thane circular metro rail project - ET Infra". ETInfra.com (इंग्रजी भाषेत). 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ Shaikh, Ateeq (2024-10-03). "Thane metro project attracts five consultants for initial design phase". Hindustan Times.Shaikh, Ateeq (3 October 2024). "Thane metro project attracts five consultants for initial design phase". Hindustan Times.
{{cite web}}: CS1 maint: url-status (link) - ↑ "Prime Minister Shri Narendra Modi inaugurates and lays foundation stone for various projects worth over Rs 32,800 crore in Thane, Maharashtra". www.pib.gov.in. 2025-05-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "PM Modi lays foundation stone of Thane ring metro project, inaugurates Mumbai Metro Line 3". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ Bureau, द हिंदू (2024-08-16). "Union Cabinet gives approval to three new Metro projects". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2025-05-18 रोजी पाहिले.
- ↑ "Union Cabinet approves Thane ring metro project". The Times of India. 2024-08-17. ISSN 0971-8257. 2025-05-18 रोजी पाहिले.
- ↑ Shaikh, Ateeq (2024-10-03). "Thane metro project attracts five consultants for initial design phase". Hindustan Times.
- ↑ "Maha Metro". www.mahametro.org. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "Thane Ring Metro Project: MahaMetro Finalises Tender For Designing 6 Stations, Progresses With Key Surveys". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "Maha Metro". www.mahametro.org. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ Empty citation (सहाय्य)
- ↑ "Maha Metro". www.mahametro.org. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "Maha Metro". www.mahametro.org. 2025-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "NMRCL - Tenders". www.metrorailnagpur.com. 2025-05-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-05-19 रोजी पाहिले.