Jump to content

इडन गार्डन्स

Coordinates: 22°33′52″N 88°20′36″E / 22.56444°N 88.34333°E / 22.56444; 88.34333
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईडन गार्डन या पानावरून पुनर्निर्देशित)
ईडन गार्डन्स
ইডেন গার্ডেন্স
मैदान माहिती
स्थान कोलकाता
गुणक 22°33′52″N 88°20′36″E / 22.56444°N 88.34333°E / 22.56444; 88.34333
स्थापना १८६४
आसनक्षमता ६६,०००
मालक भारतीय लष्कर[]
प्रचालक क्रिकेट असोशिएशन बंगाल
यजमान बंगाल क्रिकेट संघ
कोलकाता नाईट रायडर्स
भारतीय क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ५-८ जानेवारी १९३४:
भारत  वि. इंग्लंड
अंतिम क.सा. ३० सप्टें-३ ऑक्टो २०१६:
भारत  वि. न्यू झीलंड
प्रथम ए.सा. १८ फेब्रुवारी १९८७:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम ए.सा. २२ जानेवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
प्रथम २०-२० २९ ऑक्टोबर २०११:
भारत वि. इंग्लंड
अंतिम २०-२० ३ एप्रिल २०१६:
इंग्लंड वि. वेस्ट इंडीज
यजमान संघ माहिती
बंगाल क्रिकेट संघ (१९०८-सद्य)
कोलकाता नाईट रायडर्स (२००८ - सद्य)
शेवटचा बदल २ डिसेंबर २०१६
स्रोत: ईडन गार्डन्स, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)
इडन गार्डन्स is located in Kolkata
इडन गार्डन्स
इडन गार्डन्स
इडन गार्डन्स (Kolkata)

इडन गार्डन्स (बंगाली: ইডেন গার্ডেন্স) हे कोलकाता, भारत येथील क्रिकेटचे मैदान आहे. बंगाल क्रिकेट संघ आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे ते घरचे मैदान असून कसोटी क्रिकेट आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.[] ६६,००० आसनक्षमतेनुसार ते भारतातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून मेलबर्न क्रिकेट मैदाना खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. इडन गार्डनला "कलोसियमला क्रिकेटचे उत्तर" म्हणून संबोधले जाते आणि ते जगातील एक सर्वात आयकॉनिक मैदान मानले जाते.[] क्रिकेट विश्वचषक, ट्वेंटी २० क्रिकेट विश्वचषक, आशिया चषक यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तसेच भारतीय प्रीमियर लीगचे अनेक सामने ह्या मैदानावर झाले आहेत. १९८७ मध्ये, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्याचे आयोजन करणारे हे जगातील दुसरे मैदान ठरले, याआधी तीन विश्वचषक अंतिम सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळवणाऱ्या लॉर्ड्सचा क्रमांक लागतो.

मैदानावर झालेल्या ४० कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहे तर ९ सामने गमावले आहेत, उर्वरित १९ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे.[]

इतिहास आणि क्षमता

[संपादन]
Ground of the Calcutta Cricket Club, 15th Jan'y. 1861 H.M. 68th L.I. from Rangoon, versus the Calcutta Cricket Club

१८४१ मध्ये आराखडा तयार केलेल्या कोलकत्त्यातील एक उद्यान इडन गार्डन्स वरुण मैदानाचे नाव ठेवले गेले. इडन गार्डन्स उद्यानाला हे नाव त्यावेळचे भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड ह्यांच्या मुली इडन भगिनींच्या नावावरून दिले गेले होते.[] मैदान शहराच्या बी. बी. डी. बाग क्षेत्रात, राज्य सचिवालयाजवळ आणि कलकत्ता उच्च न्यायालयासमोर आहे. सुरुवातीस मैदानाला 'ऑकलंड सर्कस गार्डन्स’ असे नाव दिले गेले होते परंतु नंतर बायबल मधील इडन गार्डनवरून प्रेरणा घेऊन त्याचे नामकरण 'इडन गार्डन' असे करण्यात आले.[] मैदानाची स्थापना १८६४ साली झाली आणि क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी मैदानाचे नूतनीकरण केल्यानंगतर सध्या मैदानाची क्षमता ६६,३४९ इतकी आहे.[][]; नूतनीकरणाआधी मैदानाची आसनक्षमता १,००,००० इतकी होती. १९८७ विश्वचषकाआधी, मैदानाची क्षमता १,२०,००० इतकी होती असे म्हणले जाते, परंतु त्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नाही. तथापि, ह्या मैदानावर सहा सामने खेळले गेले आहेत, ज्यावेळी एका दिवशी १,००,००० प्रेक्षकांनी सामन्याला हजेती लावलेली आहे.[]

मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याची नोंद १९३४ साली केली गेली तर पहिला एकदिवसीय सामना १९८७ साली खेळवला गेला.[] इडन गार्डनवर खेळवले गेलेले हिरो चषक स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये खेळवला गेलेला पहिला सामना हा ह्या मैदानावर प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता.[] इडन गार्डन हे त्याच्या मोठ्या संख्येने जमा होणाऱ्या आणि गलका करणाऱ्या प्रेक्षकांबद्दल ओळखले जाते. असे म्हणले जाते की "गच्च भरलेल्या इडन गार्डन्स मध्ये खेळल्याशिवाय क्रिकेटपटूचे क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण होत नाही."[१०][११] बी. सी. रॉय क्लब हाऊसचे नाव पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांच्या नावावरून दिले गेले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय मैदानाच्या आवारात आहे. आयपीएलचे सामने सुद्धा ह्या मैदानावर होतात आणि हे मैदान कोलकाता नाईट रायडर्स संघाचे होम ग्राउंड आहे.

उल्लेखनीय घटना

[संपादन]
  • १९४६ साली, फॉर्मात असलेल्या मुश्ताक अलीला ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस XI विरुद्धच्या अनधिकृत कसोटीमधून वगळण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनी ("नो मुश्ताक,नो टेस्ट" अशा घोषणांसह) केलेल्या निषेधामुळे, निवड समितीने त्याला पुन्हा संघात घेतले.[१२]
  • १९६६/६७ वेस्ट इंडीज आणि १९६९/७० ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मैदानावर दंगली घडल्य होत्या.[]
  • १६ ऑगस्ट १९८० च्या पूर्व बंगाल आणि मोहन बागान संघादरम्यानच्या डर्बी लीग सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १६ फुटबॉल चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.[१३]
  • क्रिकेट विश्वचषक, १९८७ च्या संस्मरणीय अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.
  • हिरो चषक, १९९३-९४ मधील भारत वि दक्षिण अफ्रिका, पहिल्या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकरने टाकलेल्या, शेवटच्या निर्णायक षटकांत दक्षिण आफ्रिकेला ६ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना, फक्त ३ धावा देऊन भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.[१४]
  • भारतीय फलंदाजी कोसळल्याने प्रेक्षकांनी व्यत्यय आणलेला, क्रिकेट विश्वचषक, १९९६ मधील भारत वि. श्रीलंका उपांत्य सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला.[]
  • पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७च्या दुसऱ्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाच्या सर्व कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारांनी, संपूर्ण मैदानावर एक सन्मान फेरी दिली.
  • १९९९ मध्ये, भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा धक्का लागल्याने धावचीत झाला. अख्तरने तेंडुलकरच्या मार्गात अडथळा आणला आणि गर्दीचा क्षोभ झाला, त्यामुळे पोलिसांन प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढावे लागले. सामना रिकाम्या मैदानात सुरू राहिला.[१५]
  • कपिल देवने त्याची पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक १९९१ साली श्रीलंकेविरुद्ध ह्याच मैदानावर घेतली.[१६]
  • हरभजन सिंगने २०००/०१ मध्ये ह्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.[१७]
  • व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०००/०१ मध्ये २८१ धावा केल्या. इडन गार्डन्सवरील ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. बहुतांश सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला हा सामना गमवावा लागला. २०००-०१ मधील बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतील ही दुसरी कसोटी म्हणजे कसोटी इतिहासातील अशी केवळ तिसरी वेळ आहे, जेव्हा फॉलो-ऑन मिळालेल्या संघाने कसोटी सामना जिंकला.[१८][१९]
  • इडन गार्डनवर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक १९९वा सामना ६-१० नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध झाला. भारताने सामना ३ दिवसात एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला.
  • १३ नोव्हेंबर २०१४ रोजी मैदानाच्या १५०व्या वर्धापनदिनी, इडन गार्डन्स एकदिवसीय इतिहासातील फलंदाजाच्या सर्वोच्च धावसंख्येचे साक्षीदार होते. श्रीलंकेविरुद्ध चवथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने १७३ चेंडूंत २६४ धावा करून इतिहास रचला.[२०]
  • ३ एप्रिल २०१६ रोजी, ह्याच मैदानावर, काही तासांच्या अंतराने, आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुष स्पर्धा वेस्ट इंडीजच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकल्या.

विक्रम

[संपादन]

नूतनीकरण

[संपादन]
कोलकाता मधील इमारतींमध्ये मैदानावरचे प्रकाशझोत
क्रिकेट विश्वचषक, २०११ नूतनीकरणाआधी मैदान

क्रिकेट विश्वचषक, २०११ आधी इडन गार्डन्सच्या नूतनीकरणाचे काम घेतले गेले.[२९] क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेली मानदंड पूर्ण करण्यासाठी नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बंगाल क्रिकेट असोसिएशनने मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी बर्ट हिल आणि व्हिएमएस यांच्या गटाला कायम ठेवले. नूतनीकरणाच्या योजनेमध्ये नवीन क्लबहाऊस आणि खेळाडूंसाठी सुविधा, मैदानाला नवीन स्वरूप देण्यासाठी बाह्य भिंतीमधील सुधारणा, विद्यमान छताला नवे धातूचे अच्छादन, नवीन/सुधारीत संरक्षण सुविधा आणि माहिती फलक तसेच इतर सामान्या पायाभूत सविधांमधील सुधारणा यांचा समावेश होता. त्याशिवाय अंदाजे १,००,००० इतकी असलेली प्रेक्षकक्षमता कमी करून ६६,००० वर आणणे हा सुद्धा सुधारणांचा एक भाग होता.

नूतनीकरणाच्या अपुऱ्या राहिलेल्या कामामुळे उद्भवलेल्या असुरक्षित स्थितीमुळे, आयसीसीने इंग्लंड वि. भारत सामना इडन गार्डन्सवर न खेळवण्याचे ठरवले. २७ फेब्रुवारी २०११ रोजी नियोजित असलेला सदर सामना एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.[३०]

मैदानावर १५, १८ आणि २० मार्च २०११ रोजी आयोजित केलेले सामने वेळापत्रकानुसार पार पडले. नियोजित सामन्यांपैकी केन्या वि झिम्बाब्वे या शेवटच्या सामन्यासाठी फक्त १५ प्रेक्षकांनी तिकीटे विकत घेतली. विकल्या गेलेल्या ति किटांच्या मैदानावरील नोंदींपैकी ही सर्वात कमी आकडेवारी आहे.[३१]

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

[संपादन]

कसोटी

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
५-८ जानेवारी १९३४ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
३१ डिसेंबर १९४८ - ४ जानेवारी १९४९ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
३० डिसेंबर १९५१ - ४ जानेवारी १९५२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
१२ - १५ डिसेंबर १९५२ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
२८ डिसेंबर १९५५ - २ जानेवारी १९५६ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड अनिर्णित धावफलक
२ - ६ नोव्हेंबर १९५६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९४ धावा धावफलक
३१ डिसेंबर १९५८ - ४ जानेवारी १९५९ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३३६ धावा धावफलक
२३ - २८ जानेवारी १९६० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
३० डिसेंबर १९६० - ४ जानेवारी १९६१ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
३० डिसेंबर १९६१ - ४ जानेवारी १९६२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत १८७ धावा धावफलक
२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९६४ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
१७ - २२ ऑक्टोबर १९६४ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
५ - ८ मार्च १९६५ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड अनिर्णित धावफलक
३१ डिसेंबर १९६६ - ५ जानेवारी १९६७ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ४५ धावा धावफलक
१२ - १६ डिसेंबर १९६९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी धावफलक
३० डिसेंबर १९७२ - ४ जानेवारी १९७३ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत २८ धावा धावफलक
२७ डिसेंबर १९७४ - १ जानेवारी १९७५ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ८५ धावा धावफलक
१ - ६ जानेवारी १९७७ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी धावफलक
२९ डिसेंबर १९७८ - ३ जानेवारी १९७९ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
२६ - ३१ ऑक्टोबर १९७९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९८० भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
१ - ६ जानेवारी १९८२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
१० - १४ डिसेंबर १९८३ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ४६ धावा धावफलक
३१ डिसेंबर १९८४ - ५ जानेवारी १९८५ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
११ - १६ फेब्रुवारी १९८७ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
२६ - ३१ डिसेंबर १९८७ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
२९ जानेवारी - २ फेब्रुवारी १९९३ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ८ गडी धावफलक
२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९९६ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३२९ धावा धावफलक
१८ - २१ मार्च १९९८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत १ डाव आणि २१९ धावा धावफलक
१६ - २० फेब्रुवारी १९९९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४६ धावा धावफलक
११ - १५ मार्च २००१ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत १७१ धावा धावफलक
३० ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर २००२ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर २००४ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत ८ गडी धावफलक
१६ - २० मार्च २००५ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत १९५ धावा धावफलक
३० नोव्हेंबर - ४ डिसेंबर २००७ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
१४ - १८ फेब्रुवारी २०१० भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत १ डाव आणि ५७ धावा धावफलक
१४ - १७ नोव्हेंबर २०११ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत १ डाव आणि १५ धावा धावफलक
५ - ९ डिसेंबर २०११ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी धावफलक
६ - ८ नोव्हेंबर २०१३ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत १ डाव आणि ५१ धावा धावफलक
३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०१६ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १७८ धावा धावफलक

एकदिवसीय

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३२]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१८ फेब्रुवारी १९८७ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ गडी धावफलक
२३ ऑक्टोबर १९८७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी धावफलक
८ नोव्हेंबर १९८७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ धावा धावफलक
२ जानेवारी १९८८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ५६ धावा धावफलक
२८ ऑक्टोबर १९८९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७७ धावा धावफलक
१ नोव्हेंबर १९८९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी धावफलक
३१ डिसेंबर १९९० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७१ धावा धावफलक
४ जानेवारी १९९१ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
१० नोव्हेंबर १९९१ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत ३ गडी धावफलक
२४ नोव्हेंबर १९९३ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत २ धावा धावफलक
२५ नोव्हेंबर १९९३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी धावफलक
२७ नोव्हेंबर १९९३ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत १०२ धावा धावफलक
५ नोव्हेंबर १९९४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ७२ धावा धावफलक
१३ मार्च १९९६ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बहाल धावफलक
२७ मे १९९७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८५ धावा धावफलक
३१ मे १९९८ भारतचा ध्वज भारत केन्याचा ध्वज केन्या भारतचा ध्वज भारत ९ गडी धावफलक
१९ जानेवारी २००२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत २२ धावा धावफलक
१८ नोव्हेंबर २००३ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३७ धावा धावफलक
१३ नोव्हेंबर २००४ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी धावफलक
२५ नोव्हेंबर २००५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० गडी धावफलक
८ फेब्रुवारी २००७ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनिर्णित धावफलक
२४ डिसेंबर २००९ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
१५ मार्च २०११ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३१ धावा धावफलक
१८ मार्च २०११ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी धावफलक
२० मार्च २०११ केन्याचा ध्वज केन्या झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १६१ धावा धावफलक
२५ ऑक्टोबर २०११ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ९५ धावा धावफलक
३ जानेवारी २०१३ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८५ धावा धावफलक
२० ऑक्टोबर २०१४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज रद्द धावफलक
१३ नोव्हेंबर २०१४ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १५३ धावा धावफलक
२२ जानेवारी २०१७ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ धावा धावफलक

टी२०

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३३]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२९ ऑक्टोबर २०११ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी धावफलक
८ ऑक्टोबर २०१५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका रद्द धावफलक
१६ मार्च २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५५ धावा धावफलक
१७ मार्च २०१६ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी धावफलक
१९ मार्च २०१६ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
२६ मार्च २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७५ धावा धावफलक
३ एप्रिल २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी धावफलक

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "ऐतिहासिक इडन गार्डन्स बीसीसीआयसाठी: सीएबी अध्यक्ष". इंडिया.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "इडन गार्डन्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "इंडिया कीप विनिंग – बट क्राऊड स्टे अवे". बीबीसी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ a b "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ बॅग, शमिक. "इडनच्या सावलीमध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "इडन गार्डन्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ इडन गार्डन्स | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो. इएसपीएनक्रिकइन्फो.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "कोलकाताचे इडन गार्डन, क्रिकेट विश्वचषकाची अंतिम मुदत चुकवणार". इकॉनॉमिक टाइम्स. 2016-04-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "हीरो चषक, १९९३-९४" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "इडन गार्डन्स हेरिटेज प्लॉट ऑफ रेकॉर्ड्स रोमान्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "हॅज इडन गार्डन्स लॉस्ट इट्स आयकॉनिक ग्लोरी" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "दुर्दैवाने, ते आज प्रतिभावान खेळाडूकडे पाहत नाहीत: रेडीफची मुश्ताक अली सोबत मुलाखत" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "१६ ऑगस्ट १९८० च्या आठवणी: भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ "सचिन टाईज देम डाऊन". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ "द रन-आऊट दॅट स्पार्क्ड अ रायट" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "नोंदी / कसोटी सामने / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "फोर्स्ड टू फॉलो-ऑन येट वन". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  19. ^ "बॉर्डर गावस्कर चषक – २री कसोटी". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  20. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी / एका डावात सर्वात जास्त धावा". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वोत्तम धावसंख्या" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वात जास्त वैयक्तिक धावा" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वात जास्त बळी" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सर्वोत्तम धावसंख्या" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सर्वात जास्त वैयक्तिक धावा" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  26. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / एकदिवसीय सामने / सर्वात जास्त बळी" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  27. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / गड्यानुसार सर्वोत्कृष्ट भागीदारी" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  28. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / एकदिवसीय सामने / गड्यानुसार सर्वोत्कृष्ट भागीदारी" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  29. ^ क्रिकेट विश्वचषक २०११ साठी कोलकत्याचे इडन गार्डन्स नवीन रुपडे घेणार. वर्ल्ड इंटेरियर डिझाइन नेटवर्क. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ "भारत-इंग्लंड विश्वचषक सामना इडन गार्डन्सवर होणार नाही" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ बसू, रिथ. "एम्प्टी एंड टू इडन्स कप – ॲंड द रोअर डाइड: जस्ट १५ मॅच-डे टिकेट्स सोल्ड फॉर झिम्बाब्वे-केन्या टाय" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.