अनंत भवानीबावा घोलप
अनंत घोलप ऊर्फ अनंतफंदी (जन्म : शा.श. १६६६ / इ.स. १७४४; - शा.श. १७४१ / इ.स. १८१९) हे एक मराठी कवी, शाहीर होते.
जीवन
[संपादन]अनंत फंदी हे संगमनेर येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले.
अनंतफंदींच्या आईचे नाव राऊबाई आणि पत्नीचे म्हाळसाबई. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर त्यांनीं तमाशा आरंभिला व नंतर तमाशा सोडला. त्यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी.
अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरून यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हणले जाते[१]. शंकराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.
साहित्य
[संपादन]अनंदफंदीवरील पुस्तके
[संपादन]- अनंतफंदीकृत लावण्या, अनेक भाग (चित्रशाळा प्रकाशन)
संदर्भ
[संपादन]- ^ डॉ. विद्यासागर पाटंगणकर. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. p. १७२.
बाह्य दुवे
[संपादन]