Jump to content

वॉर्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वर्झावा या पानावरून पुनर्निर्देशित)
वॉर्सा
Warszawa
पोलंड देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह

गुणक: 52°13′56.28″N 21°00′30.36″E / 52.2323000°N 21.0084333°E / 52.2323000; 21.0084333

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत माझोव्येत्स्का
स्थापना वर्ष १३वे शतक
क्षेत्रफळ ५१६.९ चौ. किमी (१९९.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३२८ फूट (१०० मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १७,१६,८५५
  - घनता ३,३११ /चौ. किमी (८,५८० /चौ. मैल)
  - महानगर २६,३१,९०२
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
warszawa.pl


वॉर्सा (पोलिश: Pl-Warszawa.ogg Warszawa , इंग्लिश लेखनभेदः Warsaw, वर्झावा) ही मध्य युरोपातील पोलंड देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. वॉर्सा शहर पोलंडच्या मध्य-पूर्व भागात बाल्टिक समुद्रापासून २६० कि.मी. अंतरावर व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. इ.स. २०१० साली वॉर्सा शहराची लोकसंख्या १७.१७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २६.३१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने युरोपियन संघात वॉर्साचा नववा क्रमांक लागतो.

इतिहास

[संपादन]
इ.स. १४११ साली बांधलेले सेंट मेरी चर्च

इ.स.च्या १३व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन करण्यात आलेले वॉर्सा शहर इ.स. १४१३ साली माझोव्हिया प्रदेशाची राजधानी बनले. मध्यवर्ती स्थानामुळे इ.स. १५९६ साली वॉर्साला पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची राजधानी बनवण्यात आले. त्यानंतरच्या अनेक शतकांदरम्यान वर्झाव्याचा वेगाने विकास झाला व पोलिश कला व संस्कृतीचे वॉर्सा माहेरघर बनले. इ.स. १७९५ साली वॉर्सा प्रशियाच्या राजतंत्रात विलीन करण्यात आले; परंतु इ.स. १८०६ साली नेपोलियनच्या सैन्याने वॉर्साची मुक्तता केली व त्यानंतरच्या नवनिर्मित पोलंड देशाची राजधानी येथेच राहिली.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस नाझी जर्मनीने इ.स. १९३९ साली पोलंडवर कब्जा मिळवला व पोलिश ज्यूंनां डांबून ठेवण्यासाठी वॉर्सा येथे पूर्व युरोपातील सर्वात मोठी छळछावणी उघडली. सुमारे चार लाख ज्यू केवळ ३.४ चौरस किमी इतक्या जागेत कोंबून ठेवले गेले होते. ह्यांपैकी अनेक ज्यू हत्यासत्रामध्ये मारले गेले. जुलै, इ.स. १९४४ मध्ये भूमिगत झालेल्या पोलिश सेनेने नाझी जर्मनीविरुद्ध बंड पुकारले व तेव्हा झालेल्या ६३ दिवसांच्या लढाईमध्ये वॉर्सातील १.५ ते २ लाख नागरिक मृत्युमुखी पडले. ह्या बंडामुळे खवळलेल्या ॲडॉल्फ हिटलरने संपूर्ण वॉर्सा शहर जमीनदोस्त करण्याचा व संग्रहालयांमधील वस्तू जर्मनीमध्ये हलवण्याचा आदेश दिला. त्यानुसार जर्मन सैन्याने शिस्तबद्धरीत्या येथील सर्व इमारती पाडल्या किंवा जाळून टाकल्या. ह्या विध्वंसादरम्यान तत्कालीन शहराचा ८५ टक्के नष्ट झाला.

युद्ध संपल्यानंतर पोलंडमधील साम्यवादी राजवटीने वॉर्सा शहर पुन्हा उभे केले व अनेक ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी केली. इ.स. १९८० साली वॉर्साच्या ऐतिहासिक नगरकेंद्राला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले. इ.स. २००४ साली पोलंड युरोपियन संघात सामील झाल्यानंतर वॉर्सा झपाट्याने विकसत आहे.

भूगोल

[संपादन]

वॉर्सा शहर पोलंडच्या मध्य-पूर्व भागात बाल्टिक समुद्रापासून २६० कि.मी. अंतरावर व्हिस्चुला नदीच्या काठावरील सपाट पठारावर वसले असून त्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ३३० फूट आहे.

हवामान

[संपादन]

वॉर्सातील हवामान आर्द्र असून येथील हिवाळे शीत, तर उन्हाळे सौम्य असतात.

वॉर्सा साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 12.5
(54.5)
15.9
(60.6)
23.3
(73.9)
29.1
(84.4)
32.7
(90.9)
34.8
(94.6)
36.0
(96.8)
36.4
(97.5)
33.0
(91.4)
26.1
(79)
19.3
(66.7)
16.1
(61)
36.4
(97.5)
सरासरी कमाल °से (°फॅ) 0.1
(32.2)
0.9
(33.6)
4.7
(40.5)
12.2
(54)
19.4
(66.9)
21.7
(71.1)
23.8
(74.8)
23.0
(73.4)
18.3
(64.9)
12.9
(55.2)
5.0
(41)
2.1
(35.8)
12.01
(53.62)
दैनंदिन °से (°फॅ) −3
(27)
−2.3
(27.9)
1.7
(35.1)
8.2
(46.8)
14.0
(57.2)
17.6
(63.7)
19.3
(66.7)
18.3
(64.9)
14.0
(57.2)
8.2
(46.8)
2.9
(37.2)
−0.5
(31.1)
8.2
(46.8)
सरासरी किमान °से (°फॅ) −6.1
(21)
−5.5
(22.1)
−1.3
(29.7)
4.2
(39.6)
8.6
(47.5)
13.5
(56.3)
14.8
(58.6)
13.6
(56.5)
9.7
(49.5)
3.5
(38.3)
0.8
(33.4)
−3.1
(26.4)
4.39
(39.91)
विक्रमी किमान °से (°फॅ) −30.7
(−23.3)
−30.4
(−22.7)
−23.5
(−10.3)
−10.1
(13.8)
−3.6
(25.5)
0.3
(32.5)
4.2
(39.6)
2.0
(35.6)
−4.7
(23.5)
−9
(16)
−18.2
(−0.8)
−27.4
(−17.3)
−30.7
(−23.3)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 21
(0.83)
25
(0.98)
24
(0.94)
33
(1.3)
44
(1.73)
62
(2.44)
73
(2.87)
63
(2.48)
42
(1.65)
37
(1.46)
38
(1.5)
33
(1.3)
495
(19.49)
सरासरी पर्जन्य दिवस 15 14 13 12 12 13 13 12 12 13 14 16 159
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 81 82 78 71 67 68 72 74 75 77 80 86 75.9
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 43 59 115 150 211 237 226 214 153 99 39 25 १,५७१
स्रोत: []

शहर रचना

[संपादन]
वॉर्साचे जिल्हे

वॉर्सा ही माझॉव्येत्स्की प्रांतामधील एक काउंटी असून ती एकूण १८ जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे. वॉर्साचे स्थापत्य ऐतिहासिक गॉथिक ढंगाचे होते. त्यापैकी बऱ्याचशा वास्तू दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त करण्यात आल्या. युद्धोत्तर काळात अनेक जुन्या इमारती पुन्हा बांधण्यात आल्या, तर काही इमारती आधुनिक स्थापत्यात बांधल्या गेल्या. त्यामुळे येथे आज ऐतिहासिक व आधुनिक अश्या दोन्ही ढंगांच्या इमारती आढळतात. येथील स्थापत्यकलेची तुलना काही वेळा पॅरिससोबत केली जाते.

अर्थव्यवस्था

[संपादन]

पोलिश अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या वॉर्सात अनेक शासकीय संस्था तसेच खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत. पोलंडचे १२ % उत्पन्न वॉर्सातून उपजते व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीबाबत वॉर्सा मध्य युरोपात अव्वल स्थानावर आहे. इ.स. २००८ साली येथील वार्षिक दरडोई उत्पन्न सुमारे २३,००० युरो होते.[] येथील बेरोजगारी केवळ ३ टक्के आहे.

एक मोठे जागतिक शहर असलेले वॉर्सा इ.स. २००८ साली जगातील ३५वे महागडे शहर होते.[] मास्टरकार्ड कंपनीने बनवलेल्या विकसनशील बाजारांच्या जागतिक यादीमध्ये वॉर्साचा ६५मध्ये ८वा क्रमांक आहे.

लोकसंख्या

[संपादन]

ऐतिहासिक काळापासून पोलंड तसेच मध्य व पूर्व युरोपामधून स्थलांतर करणाऱ्या लोकांचे वॉर्सा हे आकर्षण राहिले आहे. पोलिश वंशाच्या लोकांसोबत येथे अनेक शतके ज्यू लोक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. इ.स.च्या १९व्या शतकाच्या अखेरीस वॉर्सातले ३४ % नागरिक ज्यू वंशाचे होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वॉर्सात मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडला. युद्धपूर्व काळात इ.स. १९३९ साली १३ लाख लोकसंख्या असलेल्या वॉर्सात इ.स. १९४५ साली केवळ ४.२ लाख लोक उरले होते.

सध्या (इ.स. २०१५) येथील लोकसंख्या १७,१६,८५५ इतकी आहे.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १७०० ३०,०००
इ.स. १७९२ १,२०,००० +३००%
इ.स. १८०० ६३,४०० −४७%
इ.स. १८३० १,३९,७०० +१२०%
इ.स. १८५० १,६३,६०० +१७%
इ.स. १८८२ ३,८३,००० +१३४%
इ.स. १९०१ ७,११,९८८ +८५%
इ.स. १९०९ ७,६४,०५४ +७%
इ.स. १९२५ १०,०३,००० +३१%
इ.स. १९३३ ११,७८,९१४ +१७%
इ.स. १९३९ १३,००,००० +१०%
इ.स. १९४५ ४,२२,००० −६७%
इ.स. १९५० ८,०३,८०० +९०%
इ.स. १९६० ११,३६,००० +४१%
इ.स. १९७० १३,१५,६०० +१५%
इ.स. १९८० १५,९६,१०० +२१%
इ.स. १९९० १६,५५,७०० +३%
इ.स. २००० १६,७२,४०० +१%
इ.स. २००२ १६,८८,२०० +०%
इ.स. २००६ १७,०२,१०० +०%
इ.स. २००९ १७,१४,४६६ +०%
Note: 2006[]

वाहतूक

[संपादन]
वॉर्सातील एक मोठा चौक

गेल्या काही दशकांपासून वॉर्सातील वाहतूक सुविधा वेगाने सुधारत आहेत. येथे अनेक नवे रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल बांधले जात आहेत. नागरी वाहतुकीसाठी अनेक बसमार्ग, तसेच ट्राम व मेट्रो रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. इ.स. १९९५ साली बांधण्यात आलेली वॉर्सा मेट्रो २३.१ कि.मी. लांबीच्या मार्गांवर धावते व रोज सुमारे ५.५ लाख प्रवासी वाहून नेते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी रेल्वे व विमानसेवा उपलब्ध आहेत.

वॉर्सा चोपिन विमानतळ हा पोलंडमधील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ वॉर्सा महानगरामध्ये स्थित आहे. एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. ह्या विमानतळाद्वारे वॉर्सा युरोप व जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडले गेले आहे.

फुटबॉल हा वॉर्सातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. लेगिया वॉर्सा व पोलोनिया वॉर्सा हे पोलिश फुटबॉल लीगमधील दोन लोकप्रिय संघ येथेच स्थित आहेत. युएफा यूरो २०१२ स्पर्धेचा पहिला व इतर अनेक सामने वर्झाव्यातल्या ५६,००० आसनक्षमतेच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळवले गेले.

कला व विज्ञानाचे प्रासाद ही वॉर्सातील सर्वात उंच इमारत आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेल्या विध्वंसामुळे वॉर्साच्यि कलाजीवनाला मोठा तडा गेला. येथील अनेक ऐतिहासिक संग्रहालये जमीनदोस्त केली गेली व त्यांमधील दुर्मिळ वस्तू लुप्त झाल्या. परंतु आजही येथे काही लोकप्रिय संग्रहालये अस्तित्वात आहेत. तसेच अनेक संगीत परिषदा, तसेच नाटके वॉर्सात भरवली जातात. इ.स. २०१६ सालच्या युरोपियन सांस्कृतिक राजधानी किताबासाठी वॉर्सा एक स्पर्धक होता.

शिक्षण

[संपादन]

पोलंडमधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी अनेक संस्था वॉर्सात आहेत. चार मोठी विद्यापीठे व ६१ उच्चशिक्षण संस्था येथे असून त्यात एकूण ५ लाख विद्यार्थी शिकतात. इ.स. १८१६ साली स्थापलेले वॉर्सा विद्यापीठ हे पोलंडमधील सर्वात जुने, सर्वात मोठे व सर्वोत्तम श्रेणीचे विद्यापीठ आहे. तसेच वॉर्सा स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, फ्रेदरिक शोपें संगीत संस्था, वॉर्सा वैद्यकीय विद्यापीठ, वॉर्सा तांत्रिक विद्यापीठ, इत्यादी अनेक नावाजलेल्या व युरोपातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था वॉर्सात आहेत.

प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]

आंतरराष्ट्रीय संबंध

[संपादन]

जगभरातील खालील शहरांसोबत वॉर्साचे सांस्कृतिक व वाणिज्यीय संबंध आहेत.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "इन्स्टिट्यूट ऑफ मिटिऑरॉलॉजी अँड वॉटर मॅनेजमेंट". www.imgw.pl (इंग्लिश भाषेत). line feed character in |title= at position 29 (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "दरडोई सकल वार्षिक उत्पन्न" (PDF). www.stat.gov.pl (इंग्लिश भाषेत). २७ ऑक्टोबर २०१० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "इकनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट अहवाल". द इकॉनॉमिस्ट (इंग्लिश भाषेत). १५ जून २००७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "डेमोग्राफिक इयरबुक्स ऑफ पोलंड १९३९-१९७९, १९८०-१९९४". www.stat.gov.pl (इंग्लिश भाषेत). २९ ऑगस्ट २००८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "म्यास्ता पार्तनेर्स्कीये वर्झावी/um.warszawa.pl". 2007-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ ऑगस्ट २००८ रोजी पाहिले.
  6. ^ "Berlin's international city relations". Berlin Mayor's Office. 2013-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 July 2009 रोजी पाहिले. Berlin and Warsaw’s agreement on friendship and cooperation and a corresponding supporting program was signed in Berlin on 12 August 1991.
  7. ^ "Twin Towns". www.amazingdusseldorf.com. 2014-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 October 2009 रोजी पाहिले.
  8. ^ "Sister Cities of Istanbul". 2009-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 September 2007 रोजी पाहिले.
  9. ^ Erdem, Selim Efe (3 November 2003). "İstanbul'a 49 kardeş" (Turkish भाषेत). Radikal. 49 sister cities in 2003CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ Madrid city council webpage "Mapa Mundi de las ciudades hermanadas" Check |दुवा= value (सहाय्य). Ayuntamiento de Madrid.
  11. ^ "Partners – Oslo kommune". 2009-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-11 रोजी पाहिले.
  12. ^ "Twin cities of Riga". Riga City Council. 2008-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2009 रोजी पाहिले.
  13. ^ "Online Directory: California, USA". Sister Cities International. 2008-01-16 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 April 2009 रोजी पाहिले.
  14. ^ Seul Metropolitan Government. "International Cooperation: Sister Cities". 2007-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-11 रोजी पाहिले.
  15. ^ Sister city list Archived 2014-04-10 at the Wayback Machine. (.DOC)
  16. ^ "Tel Aviv sister cities" (Hebrew भाषेत). Tel Aviv-Yafo Municipality. 2009-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 July 2009 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: